25/04/2023
Coming soon...
आदिवासी इतिहासातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक संशोधन म्हणजे या पुस्तकाच्या माध्यमातून क्रांतिवीर हैबती खाडे हे इंग्रजांविरुद्ध लढताना शहीद झालेल्या ठिकाणाचा ब्रिटिशकालीन नकाशा उपलब्ध झालेला आहे. ही बाब आजच्या पिढीसाठीच नव्हे तर येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी गौरवाची ठरणार आहे. इतिहासाची अशीच पाने आपण चाळली तर असे अनेक क्रांतिकारक आपण सापडतील हा विश्वास हे पुस्तक आपणास देत आहे.
अकोले तालुक्याच्या इतिहासात व संपूर्ण आदिवासी आणि भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात भर टाकणाऱ्या ऐतिहासिक नोंदी आपणास या पुस्तकाच्या माध्यमातून अभ्यासायला मिळणार आहेत.
या पुस्तकाच्या माध्यमातून क्रांतिवीर रामजी भांगरे, रामा किरवे, राघोजी भांगरे, होनाजी केंगले, दादू दाते, बाळू पिचड, हैबती खाडे, भागोजी नाईक, काजीसिंग नाईक, भीमा नाईक, तंट्या भिल्ल, गंगाजी ठाकूर, नाग्या कातकरी, सत्तू मराडे अशा अनेक क्रांतिकारकांचा इतिहास डॉ.विलास गवारी यांनी मांडला आहे. आदिवासींच्या इतिहासावर हे एक महत्वपूर्ण असे संशोधन आहे.
पुस्तकाचे नाव : वासाहतिक महाराष्ट्रातील आदिवासींचे उठाव
लेखक : डॉ. विलास दुंदा गवारी
प्रकाशक : हरीती प्रकाशन
मुखपृष्ठ : राजू ठोकळ
मूल्य : 500 रुपये
प्रकाशनपूर्व नोंदणीवर पोस्टल चार्जेस नाहीत.
फोन पे +91 90282 62534
फोन पे केल्यानंतर आपला पत्ता दिलेल्या नंबरवर पाठवा. मे महिन्यात आपणास पुस्तक आपण दिलेल्या पत्त्यावर पाठवले जाईल.
आपला इतिहास....आपली जबाबदारी
राजू ठोकळ
Aboriginal Voices
95 95 95 93 57