05/06/2026
आज आपण जागतिक पर्यावरण दिन साजरा करत आहोत. निसर्ग हा आपल्या जीवनाचा आधार आहे. स्वच्छ हवा, पाणी, अन्न आणि निवारा हे सर्व आपल्याला निसर्गाकडून मिळते.
यावर्षीची थीम आहे —
“निसर्गातून प्रेरणा… हवामानासाठी… आपल्या भविष्यासाठी.”
आज हवामान बदल, जंगलतोड आणि प्रदूषण ही मोठी आव्हाने आपल्या समोर आहेत. या समस्यांवर मात करण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखणे गरजेचे आहे.