Suhas Malekar Photography & Author

Suhas Malekar Photography & Author A professional photographer & also an author with an experience in interviewing celebrities, writing

नरिमन पॉईंट...मुंबईचा मासेमारू😀
19/11/2021

नरिमन पॉईंट...मुंबईचा मासेमारू😀

'शब्दझपूर्झा' दिवाळी विशेषांक २०२१ मध्ये प्रकाशित माझी कथा[थोडासा बदल करून इथे पोस्ट केलीय]पोटाची खळगी चौकात मधोमध असलेल...
19/11/2021

'शब्दझपूर्झा' दिवाळी विशेषांक २०२१ मध्ये प्रकाशित माझी कथा
[थोडासा बदल करून इथे पोस्ट केलीय]

पोटाची खळगी

चौकात मधोमध असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या सुशोभित गार्डनजवळ कॅमे-याची बॅग खांद्याला अडकवून तो उभा होता. आऊटडोअर फोटोग्राफीसाठी दिवसभर उनाडल्यामुळे थकलेला त्याचा सहकारी आत फ्रेश व्हायला गेला होता.

त्याने पाहिलं.
शौचालयाचं गेट सोडून थोडं पुढे डाव्या बाजूला भिंतीलगत बरीचशी मोकळी जागा होती. वरती मोठं होर्डिंग लावलं होतं. ते विमा कंपनीचं होर्डींग होतं, 'जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी'...
मात्र आयुर्विम्याचा काडीचाही संबंध नसलेलं एक कुटुंब त्याच्याखाली त्या मोकळ्या जागेत उघड्यावर संसार थाटून होतं.
वातावरणात संधीप्रकाश भरून राहिला होता.
त्यात संध्याकाळी लागलेल्या होर्डिंगच्या दिव्यांमुळे प्रकाश पसरला.

त्या मिणमिण प्रकाशात एक 'तरूणी' तीसपस्तीशीतली आणि तिची तीन मुलं...पाचवं सदस्य दाताचं बोळकं झालेली एक म्हातारी. ते बहुधा, जोडलेलं भावनिक नातं असावं.
कुटुंबाच्या पाचातला एकमेव पुरूष दोन-तीन वर्षाचा...
खेळण्यातली लंगडी मोडकी चारचाकी गाडी ओरखडत इकडून तिकडे चालवत होता.
छोटुश्या दोन बहिणी आपआपल्या खेळात गर्क होत्या.

थोड्याच अंतरावर बरेच उनाड पुरूष पत्ते खेळत होते. चारजण खेळत होते, चारजण डोकावत होते.
यातच त्या कुटुंबाचा पराक्रमी पुरूषही असेल कदाचित असा विचार त्याच्या डोक्यात चमकून गेला.

एक गोल आरसा भिंतीला टेकवून त्यात बघून ती तरूणी तल्लीन होऊन तोंड रंगवत होती. तिच्या त्या दोन छोट्या मुली पावडर लिपस्टीकच्या उघड्या डब्यांशी खेळत होत्या.
छोट्या मुलाची गाडी जाणाऱ्या येणाऱ्या वाटसरूंना चुकवत होती. वाटसरू चरफडत गाडी चुकवून पुढे जात होते.

सतत धावणाऱ्या मुंबईत एका ठिकाणी निवांत उभं राहून निरीक्षण केलं की अनेक तफावती लक्षात येतात. तो पुटपुटला.
कुणाला अजिबात वेळ नसतो, कुणाकडे चिक्कार वेळ असतो.

पोटाची खळगी सगळ्यांची सारखीच...ती भरण्याच्या तऱ्हा मात्र वेगवेगळ्या.

म्हातारी उरलेलं भविष्य डोळ्यांत साठवून होती.

तरुणीने पावडर-लिपस्टिक आवरून पुन्हा आरशात पाहिलं, कचकन एक डोळा मारला स्वतःलाच...बाजूला म्हातारी, भुतकाळ रुपात तीचं भविष्य बसलं होतं!
तिचा 'मौल्यवान' आरसा तिनं नीट जपून ठेवला पिशवीत.

साडीच्या निऱ्या सोडून तिथे उघड्यावरच नीटनेटक्या करून पुन्हा खोचल्या आणि म्हातारीला काही कळायच्या आत दोन्ही हातांनी तिचं तोंडाचं बोळकं धरून एक घट्ट चुम्मा घेतला नि म्हणाली,
"आज़ पयली भुवनी पांच सौ की हुई तो तेरे को पयला चिकन बिर्यानी लाकर खिलाऊंगी!"

स्वतःभोवती एक गिरकी घेऊन मुंबई मायानगरीच्या गर्दीत ती मिसळून गेली.

©सुहास मळेकर

७ एप्रिल १९८८आज कॅमेरा हातात घेऊन ३३ वर्षे पूर्ण झाली.❤️  photography
07/04/2021

७ एप्रिल १९८८
आज कॅमेरा हातात घेऊन ३३ वर्षे पूर्ण झाली.
❤️
photography

Address

Thane
400605

Telephone

+919820470463

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Suhas Malekar Photography & Author posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Suhas Malekar Photography & Author:

Share

Category