Archana Gaonkar Photography

Archana Gaonkar Photography Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Archana Gaonkar Photography, Photography Videography, kopri, Thane East.

अर्चना गांवकर फोटोग्राफी
🔻WEDDING🎥PHOTOGRAPHER📷
रणरागिणी पुरस्कार 🏆💐
❤️सिंधुदूर्ग जिल्ह्यातील पहिली महिला छायाचित्रकार📸 🤩आम्ही तुमचे अविस्मरणीय 🥰क्षण जपतो🤝
DM For All Events Photography👍
▪️Mumbai▪️Pune▪️Kokan▪️Dharashiv▪️
live in THANE

आमची गाय दिवसभर चरून घरी आली, शांतपणे रवंथ करत बसली... आणि मग एकेक करून तोंडातून आंब्याच्या कोयी बाहेर काढायला लागली 😄🐄🥭...
15/06/2026

आमची गाय दिवसभर चरून घरी आली, शांतपणे रवंथ करत बसली... आणि मग एकेक करून तोंडातून आंब्याच्या कोयी बाहेर काढायला लागली 😄🐄🥭

क्षणभर मला प्रश्न पडला, इतक्या कोयी नक्की ठेवल्या कुठे होत्या?

निसर्गाची रचना किती अद्भुत आहे ना रवंथ करणारे प्राणी आधी अन्न साठवून ठेवतात आणि नंतर आरामात बसून पुन्हा चावतात. त्यामुळे न पचणाऱ्या कठीण वस्तू काही वेळा अशा बाहेरही पडतात.

गावाकडचं जीवन म्हणजे रोज काही ना काही नवीन शिकवणारं असंच असतं❤️🌿

गाय ही रवंथ करणारा प्राणी (ruminant) आहे. तिच्या पोटाचे चार भाग असतात. ती चरताना अन्न पटकन गिळते आणि ते आधी रुमेन (पहिला भाग) मध्ये साठवले जाते. नंतर आरामात बसल्यावर तेच अन्न पुन्हा तोंडात आणून चावते, यालाच रवंथ म्हणतात.

जर चरताना आंब्याच्या कोय, काड्या किंवा तंतुमय भाग गिळले गेले असतील, तर त्या रुमेनमध्ये राहू शकतात आणि रवंथ करताना पुन्हा तोंडात येऊ शकतात. गाय त्या नीट चावून गिळू शकते किंवा काही वेळा नको असलेले कठीण तुकडे तोंडातून बाहेरही टाकते.
म्हणून गाय एकेक करून आंब्याच्या पारंब्या तोंडातून बाहेर काढत होती, हे आश्चर्यकारक वाटले तरी जैविकदृष्ट्या शक्य आहे.
आणि महत्वाचा म्हणजे सध्या प्लास्टिक पिशव्या पण जनावरांच्या तोंडातून बाहेर येताना दिसतात.
स्थळ 📍 मिठमुंबरी ता.देवगड, जि. सिंधुदुर्ग

तुम्हाला माहित आहे का ही गाडी?
14/06/2026

तुम्हाला माहित आहे का ही गाडी?

14/06/2026

गावाकडचा साखरपुडा❤️ कसे वाटले रीती, रिवाज, परंपरा? कमेंट मध्ये नक्की कळवा🙏
📍स्थळ मुरुड रायगड.
सिंधुदुर्ग❤️ रायगड साखरपुडा सोहळा💐

13/06/2026

गव्हाच्या कुरवड्या

13/06/2026

माझ्या तुझ्यात काही माझे तुझे नसावे ❤️
Book Your Cinematic Wedding Shoot🎥
👉Archana Gaonkar Photography

रंगवलेला वाटतो... पण निसर्गानेच रेखाटलेला🪨🤍निसर्ग हा सर्वात मोठा कलाकार आहे...धाराशिव जिल्ह्यातील तडवळे 🏞️गावात फिरताना ...
12/06/2026

रंगवलेला वाटतो... पण निसर्गानेच रेखाटलेला🪨🤍
निसर्ग हा सर्वात मोठा कलाकार आहे...

धाराशिव जिल्ह्यातील तडवळे 🏞️गावात फिरताना हा छोटासा दगड दिसला. पहिल्या नजरेत वाटलं कुणीतरी त्यावर पांढरी पट्टी रंगवली असेल. पण आश्चर्य म्हणजे असे अनेक दगड तिथे नैसर्गिकरित्या आढळतात.

काळ्या दगडातून जाणारी ही पांढरी रेषा म्हणजे ⛰️निसर्गाने लाखो वर्षांच्या प्रक्रियेत घडवलेली एक अप्रतिम कलाकृती. कोणताही ब्रश नाही, कोणताही रंग नाही. तरीही किती सुंदर डिझाइन🥰

कधी कधी निसर्ग आपल्या आसपास इतकी सुंदर कला निर्माण करतो की माणसाची कलाकुसरही त्यापुढे फिकी वाटते

दगडावर दिसणारी पांढरी रेषा बहुधा Quartz (क्वार्ट्झ) किंवा Calcite (कॅल्साइट) या खनिजांची शीर (vein) असू शकते. लाखो वर्षांपूर्वी दगडांमध्ये पडलेल्या भेगांमध्ये खनिजयुक्त पाणी शिरते आणि नंतर ते खनिज त्या भेगांमध्ये साचून पांढऱ्या रेषा तयार होतात. त्यामुळे दगडावर अगदी रंगवलेल्या पट्टीसारखी रेषा दिसते. (हे अस असू शकते खात्री ने सांगता येत नाही कारण त्यासाठी माझा एवढा अभ्यास नाही ह्या विषयावर)

धाराशिव परिसरात बेसॉल्ट (ज्वालामुखीय) खडक मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामध्ये अशा पांढऱ्या क्वार्ट्झच्या शिरा दिसणे सामान्य आहे.

खूपच सुंदर नमुना आहे. पहिल्या नजरेत कुणीतरी काळ्या मण्यावर पांढरा रंग मारल्यासारखा वाटतो😊

ह्या अशा दगडांबद्दल तुम्हाला काही माहिती असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा🙏

आजकाल लग्नात लाखो रुपयांची सजावट पाहायला मिळते...पण कोकणात भेडल्या माडाच्या पानांनी केलेलं साधं सुशोभीकरण जे सौंदर्य निर...
11/06/2026

आजकाल लग्नात लाखो रुपयांची सजावट पाहायला मिळते...

पण कोकणात भेडल्या माडाच्या पानांनी केलेलं साधं सुशोभीकरण जे सौंदर्य निर्माण करतं, त्याची सर कोणालाच नाही🌴

त्या हिरव्या पानांत निसर्गाचा स्पर्श असतो,
परंपरेचा मान असतो,
आणि आपल्या मातीचा सुगंध असतो.

कृत्रिम सजावट डोळे भरते,
पण अशी नैसर्गिक सजावट मन भरून टाकते. 💚

कोकण म्हणजे निसर्ग, संस्कृती आणि साधेपणाचं सुंदर मिश्रण.
#कोकण #कोकणीलग्न #नैसर्गिकसुशोभीकरण #परंपरा #मातीचासुगंध

10/06/2026

कोकण❤️विदर्भ लवकरच विवाह बंधनात💝
कोकणचो झिल नागपूर ची पोट्टी🥰

Address

Kopri
Thane East

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Archana Gaonkar Photography posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share