28/09/2026
प्रति,
मा. तहसिलदार साहेब,
तहसील कार्यालय, सिंदखेड राजा,जि. बुलढाणा
गावः- दत्तापूर, ता. सिंदखेड राजा, जि. बुलढाणा
अर्जदार :- सिद्धेश्वर एकनाथ राठोड, रा.दत्तापूर, ता. सिंदखेड राजा, जि. बुलढाणा
विषयःनसीराबाद फाटा ते शेलू रस्त्याचे काम तत्काळ सुरू करून मिळण्याबाबत.
महोदय / महोदया,
मी सिद्धेश्वर एकनाथ राठोड, रा. दत्तापूर, ता. सिंदखेड राजा, जि. बुलढाणा येथील रहिवासी असून, या पत्राद्वारे आपल्या विभागाचे लक्ष आमच्या परिसरातील रस्त्याच्या अत्यंत दयनीय अवस्थेकडे वेधू इच्छितो.
आमच्या परिसरातील नसीराबाद ते शेलू रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून पूर्णपणे. उखडला असून त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना येथून प्रवास करणे अत्यंत जिकिरीचे झाले आहे. खड्ड्यांमुळे दररोज लहान-मोठे अपघात होत असून, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण आणि शाळकरी मुलांचे हाल होत आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचून परिस्थिती आणखीनच गं