01/02/2024
राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहातील आपल्या जैवविविधतेवरील छायाचित्र प्रदर्शनला लाभलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादातूनच साकार होत असलेलं, न्यू एज्युकेशन सोसायटी च्या आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स कॉलेज, लांजा यांच्या पुढाकाराने आयोजित केलं गेलेलं हे प्रदर्शन आपल्या ग्रुप च्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे !!
आपण लावलेल्या प्रदर्शनांना वेळोवेळी अनेकांनी लावलेल्या हातभारातूनच हे पहिलंवहिलं लेन्स आर्ट टीम च्या कक्षेबाहेर लावण्यात येत असलेलं आपल्या सर्वांचं प्रदर्शन आहे...
दि. २ आणि ३ फेब्रुवारी रोजी आपण सर्वांनी ह्या प्रदर्शनाचा आस्वाद घ्यावा ही इच्छा आणि आजपर्यंत आपला जसा पाठिंबा मिळत आलाय आणि त्याच जोरावर ही अशी फलितं मिळत आहेत त्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद !!
लवकरच भेटूया !!
टीम लेन्सआर्ट, रत्नागिरी.