18/10/2022
अतिशय उत्तम अशा नैसर्गिक गरम पाण्याचे अनेक स्त्रोत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आढळतात. असेच कुंड संगमेश्वर तालुक्यामधील राजवाडी येथे आढळतात. ही कुंड एका बाजूने झाडीने तर एका बाजुने नदीने वेढलेली आहेत. सर्व ऋतुंमध्ये या पाण्याचे तपमान साधारणतः ७० अंश एवढे असते. या पाण्यामध्ये स्नान करण्याची सोय करण्यात आलेली आहे
या कुंडाच्या पाण्यामध्ये गंधकाचे प्रमाण लक्षणीय आहे. गंधक हे अनेक प्रकारच्या त्वचारोगांवर उपायकारक आहे. या कुंडांमधील पाण्याची पातळी आणि तपमान सर्व ऋतुंमध्ये एकच असते हे येथील वैशिष्ट्य आहे