Ravi Supe OfficiaI

Ravi Supe OfficiaI || चरन्मार्गान्विजानाति ||

09/07/2025

21/03/2025

छायाचित्रात दिसणारी मुलगी म्हणजे श्रेया संतोष खरात. राहणार पाली गावची. घर जवळपास तोरण्याच्या सिमेवर. तिच्या घरापासून पाली दरवाजाने राजगडावर पोहचायचे म्हटले तर खुप लांबचा प्रवास. मी सुवेळा माची ते संजिवनी माची हा ट्रेक करताना मला एका कातळ कड्यावरून निदर्शनास आली. ती संजीवनी माचीला वळसा घालून तोरणा मार्गाने वर चढत होती. जेमतेम सात ते साडेसात वर्षांचा जीव. डोक्यावर पाण्याच्या, सरबताच्या व ताकाच्या दहा ब्रिसलरी बाटल्या घेऊन चढत होती. थोडावेळ हे दृश्य पाहून सुन्न झालो व कॅमेरा मध्ये छायाचित्र घेतले. कड्यावरून तीला गाठायचेच हा निर्धार केला. किल्ले राजगडाच्या दक्षिणेकडील सुवेळा माची ते संजिवनी माची दरम्यानची संपूर्ण तटबंदी तुडवत तूडवत प्रदक्षिणा पूर्ण करत व इतिहासाच्या पाऊलखुणा कॅमेरातुन छायाचित्राच्या माध्यमातून टिपत टिपत मी शेवटी या चिमूरडीला गाठले. तोपर्यंत ती बरीच वर चढून आली होती. तिच्या जवळ पोहताच तीने आवाज दिला दादा सरबत,पाणी, ताक घ्या की... मी तिच्या डोईवरच गाठोड खाली घेत विचारलं बाळा कुठची राहणार. पाली गावच नाव सांगितलं. शाळेत जातेस का? २ री मध्ये जातेय सांगितले व शिक्षणासाठी वह्या पुस्तके घेण्यासाठी रविवारी पाणी, सरबत विकते निरूत्तर झालो व ह्रदयात कुठेतरी खोल जखम झाल्यासारखे वाटले. नाव विचारले तर श्रेया म्हणुन सांगितले. खरच हा प्रसंग जाणून घेताना डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या. आज हजारो पर्यटक गडकिल्ल्यांवर भटकंती करायला जातात खरे परंतु पाण्याच्या दोन बाटल्या घेऊन जाणं शक्य होत नाही. श्रेयाच्या शिक्षणाला हातभार लावणाऱ्या या गाठोड्यात मी मोजल्या तर चक्क दहा भरलेल्या बाटल्या होत्या. मी सरबत मुद्दामहून जास्त पीलो, पाण्याच्या बाटल्या घेतल्या. व पुढील एक वर्षांच्या शिक्षणासाठी जेवढा खर्च येईल तेवढी रक्कम तिच्या हातात टेकवत तिचे गाठोड बांधत तिच्या डोईवर ठेवले. आठवण म्हणून एक सेल्फि घेत त्या चिमुरडीच्या जिद्दिला मुजरा केला.
गडकोट फक्त भटकंतीच नाही तर जगवायला पण शिकवतात हा श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श विचार अनुभवयाला मिळाला.
जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय..
लेखक व छायाचित्र - रमेश खरमाळे
माजी सैनिक खोडद
८३९०००८३७०

महाकुंभ२०२५ #कुंभ  #महाकुंभ  #महाकुंभ2025  #प्रयागराज  #संगम
26/02/2025

महाकुंभ२०२५
#कुंभ #महाकुंभ #महाकुंभ2025 #प्रयागराज #संगम

Foxtail Orchid Blooming 🪻
12/06/2024

Foxtail Orchid Blooming 🪻

on the way to yamunotri...
02/05/2024

on the way to yamunotri...

Lo safar shuru ho gaya.......,.......
02/05/2024

Lo safar shuru ho gaya.......,.......

Haridwar & Rishikesh are the twin cities located on the banks of Mata    . Absolutely   experience! Just a single visit ...
05/04/2024

Haridwar & Rishikesh are the twin cities located on the banks of Mata . Absolutely experience! Just a single visit won't be enough to explore these destinations!

तर्कसंगत...
17/05/2022

तर्कसंगत...

ज्ञानवापी, मराठे आणि मशिदीसमोरचा नंदी..

अहिल्याबाईंनी नवं मंदिर उभारलं तरी जुना नंदी तसाच का ठेवला? Prashant दादांनी हा प्रश्न उपस्थित केल्यावरून, त्यामित्ताने हे थोडंसं.

नानासाहेब बंगालवर स्वारी करून गेले तेव्हा १७४२ मध्ये त्यांनी स्वतः / मल्हारराव होळकरांना ज्ञानव्यापी पाडण्यासाठी पाठवलं. त्यात ज्ञानवापी असा स्पष्ट उल्लेख आहे होळकरांच्या कागदात. यावेळेस पेशव्यांजवळ जवळपास ऐंशी हजार फौज होती, पण काशीतल्या ब्राह्मणांनी, विशेषतः दीक्षित कायगावकरांनी नानासाहेबांचे पाय धरले की "तुम्ही परत गेलात तर इथे जवळ असलेला अयोध्येचा नवाब आम्हाला जगू देणार नाही, त्याने धमकी दिलीय तशी". इथे ब्राह्मण म्हणजे सगळ्या हिंदूंवर ही टाच आली असती. अयोध्येचा तत्कालीन नवाब सफदरजंग हा नुकताच गादीवर आलेला, आणि तो बादशहाजाद्याचा मित्र होता. नानासाहेबांना हे प्रकरण सोडून द्यावं लागलं. बाजीरावांनी मृत्यूसमयी सुद्धा विश्वेश्वर आपल्याकडे यावा अशी इच्छा व्यक्त केली होती. यानंतर जवळपास वीस वर्षे, नानासाहेब हे सामोपचाराने काशी मथुरा वृंदावन आणि अयोध्या वगैरे आपल्याकडे यावी या विचारात होते. केवळ ही स्थळे घेऊन चालणार नव्हतं, याभवतालचा प्रदेश आधी निर्धोक होणं गरजेचं होतं. नानासाहेबांची दत्ताजी जयाप्पा वगैरेंना सतत पत्रं होती की बंगाल बिहार निर्वेध करावा.

पुढे महादजी शिंदे यांनी आणि अहिल्याबाई होळकर यांनी प्रयत्न केले, पण पानिपतच्या आसपास अयोध्येच्या नवाबांनी जो पवित्रा घेतला तो चकित करणारा होता. नानासाहेबांनी सफदरजंगला आपल्या बाजूने केलेलं हळूहळू पण त्याचा मुलगा शुजा उलटला. यापूर्वीचा नवाब सादतखान हा तर मराठ्यांचा कट्टर शत्रू होता.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखाद्या ठिकाणी जनमानस आपल्या बाजूने असणं गरजेचं असतं तरच जागा टिकते. तरीही पाटीलबावांनी बऱ्यापैकी हा प्रदेश निर्धोक केला, आणि अहिल्यादेवींनी इथे मंदिर बांधलं. अंदाज असा आहे की मूळ मंदिर जिथे होतं तिथला नंदी हलवणे हे धर्मशास्त्राला धरून झालं नसतं. शिवाय, नंदी तिथेच ठेवणे म्हणजे पुढेमागे मंदिर मुक्त करण्याची एक सोय असंही होऊ शकतं, म्हणजे पुढच्या पिढ्यानपिढ्या, जोवर मुक्तता होत नाही तोवर नंदी जिथे आहे ते मंदिर हे उघड होईल. शिवाय, बाजूला प्रतिकात्मक विश्वेश्वर उभा राहिल्याने इतरांवरही थोडा वचक बसेल. अहिल्याबाईंनी याच वेळेस माणिकर्णिका घाट, दशाश्वमेध घाट वगैरेंची पुनर्बांधणी केली. दुर्दैवाने, याच सुमारास काही वर्षात, खुद्द पेशवे घराण्यात कोणीही खासा खमक्या माणूस नव्हता, एकटे नाना कारभारी होते. त्यात शिंदे घराण्यात पाटीलबावा गेले, होळकरांच्या अहिल्याबाई गेल्या आणि तुकोजी अर्धांगवायूने बेजार झाले. त्यामुळे कदाचित पुढे अनेकांची इच्छा आणि योग्य वातावरण असूनही नेतृत्व नसल्याने काही होऊ शकलं नाही.

- कौस्तुभ कस्तुरे
#इतिहासाच्या_पाऊलखुणा

या दोन्ही दगडांचा काही इतिहास असेल का?मोजणीचे दगड(चिरे) आहेत की आणखी काही?यावरील नक्षीचा काही अर्थ असेल की शोभेपुरतीच अस...
17/05/2022

या दोन्ही दगडांचा काही इतिहास असेल का?
मोजणीचे दगड(चिरे) आहेत की आणखी काही?
यावरील नक्षीचा काही अर्थ असेल की शोभेपुरतीच असावी??
इतिहास प्राध्यापक/अभ्यासक व जाणकारांचे मत काय?
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये भटकंती दरम्यान आढळून आलेले आहेत.

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ravi Supe OfficiaI posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share