06/03/2026
"माऊली" संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठात अभंगाची माझी स्वररचना माझ्या आवाजात प्रस्तुत करत आहे.
अभंग:
जाणीव नेणीव भगवंतीं नाही ।
उच्चारणीं पाहीं मोक्ष सदा ॥१॥
नारायण हरी उच्चार नामाचा ।
तेथे कळी-काळाचा रीघ नाही ॥२॥
तेथील प्रमाण नेणवे वेदांसी ।
तें जीवजंतूंसि केंवि कळे ॥३॥
ज्ञानदेवा फळ नारायण पाठ ।
सर्वत्र वैकुंठ केलें असे ॥४॥
#संत_ज्ञानेश्वर #हरिपाठ #नेणीव #माऊली #अभंग
"माऊली" संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठात अभंगाची माझी स्वररचना माझ्या आवाजात प्रस्तुत करत आहे. अभंग:जाणीव .....