27/09/2018
|| मोरया मोरया आम्ही बाल तान्हे ,
तुझीच सेवा करू काय जाने,
अन्याय माझे कोट्यान कोटी,
मोरेश्वर बा तू घाल पोटी ||
अस म्हणतांना आपण हे विसरुन जातो की बाप्पा किती अपराध पोटात घेईल?लोकमान्य टिळकांचे नाव घेत चालवलेला सार्वजनिक गणेशोत्सव किमान १२० वर्षे वयाचा झाला, पण आपण काही सुज्ञ बनलो नाही. दिवसेंदिवस बाजारीकरण वाढतेच आहे. यात पहिला बळी पर्यावरणाचा पडतो.
कालच्या गर्दीत एका गणेश भक्ता कडून ऐकलं गणेश मूर्ती विसर्जनाच्या वेळी समुद्रात पाया खाली वाळूं ऐवजीं गणपती मूर्तींचा खच जाणवत होता, बाप्पा येताना जे चैतन्य असते त्या हुन विदरक असा दुसरा दिवस असतो .
निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी|
चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी ||