29/06/2026
दिनांक 28 जून 2026 दादासाहेब फाळके इन्स्टिट्यूट ने नवोदित कलाकारांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली. नवोदित कलाकारांना चित्रपट सृष्टी मध्ये काम करताना. काय काय काम करावे लागते कसे काम करायला लागते. चित्रपट मिळण्यासाठी ऑडिशन कशी द्यायची?? तसेच केदार आठवले सर, राहुल सोलापूरकर सरांनी व्हॉइसव्हर बद्दल मार्गदर्शन केले. मृणाल कुलकर्णी मॅम आणि मधुर भांडारकरसर यांनी ऑडिशन तसेच चित्रपट कसा बनवला जातो. चित्रपटात घेण्यासाठी कास्टिंग कसे केले जाते या बद्दल मार्गदर्शन केले. मामाच्या गोव्याला जाऊ या टीम संतोष जुवेकर सर, विजू माने सर, कुशल बद्रीके सर, अभिजीत चव्हाण सर, यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. दशमी चित्रपट टीम व the India story चे डायरेक्टर चेतन DK यांची उपस्थिती होती. प्रतिमा पूजन मा. मेघराजराजे भोसले सर, रमेश परदेशी उर्फ पिट्या भाई, दीपप्रज्वलन मा. मेघराजराजे भोसले (अध्यक्ष अखिल भारतीय चित्रपट महामंडळ), सुनील महाजन सर (कोषध्यक्ष अखिल भारतीय चित्रपट महामंडळ), अभिनेत्री दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी मॅडम, दिग्दर्शक मधुर भांडारकर सर यांच्या हस्ते झाले. यावेळेस मा. राजाराम कोरे सर(दादासाहेब फाळके फिल्म इन्स्टिटयूट डायरेक्टर),कुणाल निंबाळकर सर आणि अनेक सहकारी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यशाळेचे सूत्रसंचालन आसावरी नितीन, समीरा गुजर-जोशी, तसेच विजय अंदळकर यांनी केले.