24 PENS

24 PENS The 24 Pens page has been launched for true readers and photo-video lovers. Such ones...those who are passionate readers and enthusiast photo-video watchers.

'ती' आता प्रचंड भाव खायला लागली आहे. छोट्याशा पिळदार दंडांच्या पोरापासून ते निवृत्त झालेल्या ज्येष्ठांपर्यंत माझ्यासारख्...
19/03/2026

'ती' आता प्रचंड भाव खायला लागली आहे. छोट्याशा पिळदार दंडांच्या पोरापासून ते निवृत्त झालेल्या ज्येष्ठांपर्यंत माझ्यासारख्या प्रत्येकाची हीच तक्रार आहे.

तशी 'ती' वरवर नखरेल भासत होतीच...
आता थोडा जास्तच नखरा दाखवू लागली आहे.
यापूर्वी, तिला साद घालताच, दोन दिवसांचा उशीर का होईना, ती घरी यायची!
तिला घेऊन येणारा म्हणायचा, “आमचं काय बघताय का नाय?”
आम्ही खुश होऊन, “घे बाबा!” म्हणत, थोडा ‘अर्थ’प्रसाद त्या पोहोचकर्त्याच्या हातावर ठेवायचो.

तिला आमच्याकडे पोहोचवणारा घराकडे पाठ करून गेला की, आम्ही तिला व्यवस्थित न्याहाळायचो.
तिचं रूपडं आहे तसंच आहे की बदललं आहे, हे पाहायचो.
तिच्या डोक्यावर एक उपकरण लावून तिला ताप आला आहे की नाही, हे तपासायचो.

एखादी प्रशस्त जागा तिला मिळवून दिली की आमचं काम संपायचं.
मग कधीतरी हळूच जाता-येता तिच्याकडे पाहून स्मित द्यायचो; ती सुद्धा मनमुरादपणे दाद द्यायची.

आता मात्र तिचा नूर बदलला आहे. तिचा एक पाय आखातात, तर दुसरा पाय भारतभूमीच्या वेशीवर आहे.
कुण्या दूरदेशीच्या राज्यकर्त्यांनी एकमेकांना ठोसे लगावणे सुरू केल्यापासून तिचं भेटणं तर मुश्किल, पण दिसणंसुद्धा दुरापास्त झालं आहे.

तिचं आगमन मोठ्या धुमधडाक्यात करायचं असा मानस मी गेले आठवडाभर बाळगून होतो.
पण 'ती' काही जवळ यायचं नाव घेत नव्हती.

ज्या खासगी कचेरीत तिचा हमखास मुक्काम असतो, तिथे मी तीन-चार वेळा जाऊन आलो. तेव्हा कचेरीतील सेवादाते म्हणाले,
“अहो, एका वर्षात बारा वेळा आम्ही तुमची आणि तिची भेट घालून देऊ शकतो.
तुम्ही चक्क पंधरा वेळा भेटला आहात तिला.”

त्यावर मी, “अहो साहेब, उद्या सण आहे. ती नाही आली तर आम्ही तो साजरा कसा करायचा?” हा सवाल विचारला.
तेव्हा समोरच्याने, “ते काही नाही. एक तारखेपर्यंत वाट पाहा. त्यानंतर तुमची आणि तिची भेट नक्की होईल,” असं सांगितलं.
मी आपला मख्ख चेहऱ्याने, उदास भावनेने तिच्याकडे पाहत राहिलो.

“आता कसं वाटतंय...?” ह्या तिच्या प्रश्नाने, विशी-पंचवीशीतील तरुणाला गल्लीतल्या सौंदर्यवतीचं महत्त्व तिचं लग्न होईपर्यंत कळत नाही, या शेऱ्याची आठवण करून दिली.

त्यानंतर माझ्या चेहऱ्यावर ‘वैताग मुद्रा’ पाहून सोबत आलेल्या मित्राने मला विचारलं,
“ती दुसऱ्या समूहाची असली तर चालेल ना?”

मी विचारलं, “कुठल्या समूहाची? काय बोलतो आहेस तू?”

मित्राने उत्तरासोबत प्रश्न केला,
“तिच्या डोक्यावर पिवळ्या ऐवजी निळी टोपी चालेल ना?”

क्षणभर विचार करून...
मी म्हणालो, “चालेल काय, पळेल!”

अखेरीस मित्राने भारतऐवजी एच.पी. गॅसच्या लालभडक टाकीच्या रूपात तिला माझ्यासोबत घरी धाडलं.

परंतु, तिला पाहून ‘चुलबाई’ आणि ‘इंडक्शनराव’ दोघेही रुसून बसले आहेत.

*कालाय तस्मै नमः*

-अमोल काळे

© Amol Arvind Kale
Mobile: 8390800009
Email: [email protected]

#मराठीलेखन #टंचाई #ब्लॉग

अखेर प्रकाशित....
28/02/2026

अखेर प्रकाशित....

भरलेले चित्रपट गृह,तो आता येणार याची ताणलेली उत्सुकता,हेलिकॉप्टर वर स्थिरावलेला कॅमेरा...आतमध्ये बसलेला तो, त्याच्या डोळ...
17/12/2025

भरलेले चित्रपट गृह,
तो आता येणार याची ताणलेली उत्सुकता,
हेलिकॉप्टर वर स्थिरावलेला कॅमेरा...आतमध्ये बसलेला तो, त्याच्या डोळ्यांमध्ये लख्ख दिसणारी मोहीम(ऑपरेशन)
आणि राष्ट्रप्रेमाची सहज दर्शन घडविणारी देहबोली....

कुठे टाळ्या,कुठे शिट्ट्या तर कुठे आपलेपणाने नायकाला दिलेल्या शिव्या...हे सर्व तुम्ही अनुभवता सध्या गाजत असलेला *'धुरंधर'* चित्रपट पाहताना.

*रणवीर सिंग* ने वठविलेलला _*हमजा मजारी*_ हा भारताचा गुप्तहेर,
खलनायकाचे काम करून देखील *भाव खाऊन गेलेला रेहमान डकैत याच्या रूपातील अक्षय खन्ना*,
मुरलेला राजकारणी बनून साधलेला राकेश बेदींचा जमील जमाली,
अर्जुन रामपाल मुळे कावेबाज, कारस्थानी मेजर इक्बाल अक्षरशः डोक्यात जातो,
*हवा-हवा* करत मधूनच येणारा एसपी असलम संजय दत्तने भारी सादर केला आहे.
*अजय संन्याल जे भारतीय गुप्तचर यंत्रणेचे गंभीर कर्तव्यनिष्ठ प्रमुख म्हणून दाखविले आहेत ते आर माधवन* मुळे अधिकच लक्षात राहतात.
यास उत्तम जोड म्हणून इतर कलाकारही कुठे कमी पडताना दिसत नाहीत.
सर्वांचीच अभिनय जुगलबंदी जबरदस्त न्यारी !

सिनेमातील काही दृश्ये अंगावर येणारी,काही हसायला लावणारी तर काही कलाकारांना-दिग्दर्शकाला दाद द्यायलाच हवी अशी आहेत.

26/11च्या मुंबई हल्ल्यावेळी पाकमध्ये चालू असलेला आतंकी आकाह लोकांचा जल्लोष आणि नायकाच्या मनाची होत असलेली फरफट हे दृश्य चित्रपटात पाहताना आपल्यालाही चीड आणि भरून येणे अनुभवावे लागते.

चित्रपट हा समाजमनाचा आरसा आहे असे म्हणतात.
तो पाहिल्याशिवाय आपल्याला काय,कुठे आणि कसे चालू आहे हे लक्षात येत नाही.
आताही धुरंधर चित्रपटाने हेच साधण्याचा भारी प्रयास केला आहे.
भारतीय चित्रपट आपल्या शत्रूराष्ट्रात देखील मोठ्या आवडीने पाहिले जातात.
धुरंधर सुद्धा त्यास अपवाद ठरला नसता.
परंतु,त्यावर तिथे व काही आखाती देशांत बंदी घालण्यात आली आहे.
*कितीही झाकले तरी कोंबडे आरवायचे राहत नाही* असा हा प्रकार!

पाकिस्तानात *स्वतंत्र बलोचिस्तान चळवळ* पुन्हा जोर धरत असताना,
त्यास अधिक धार देण्याचा सुंदर प्रयत्न चित्रपटातून करण्यात आला आहे.

खऱ्या आयुष्यात असे अनेक धुरंधर भारत मातेसाठी आपल्या रक्ताचा थेंब ना थेंब रोज आटवत असतात.
उद्या आपण नाहीच या हेतूने गुप्तवार्ता मायदेशी धाडत असतात.
देशाचे होणारे संभाव्य नुकसान टाळण्याचा,राष्ट्रस्थैर्याला धक्का लागू न देण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात.
कारण,तिथे चुकीला एक टक्काही जागा नसते.
कोणत्याही परिस्थितीत कामाला परिणाम दिला जातोच.
*त्या प्रकारेच त्यांना घडविले जाते; नव्हे तर निवडले जाते !*
गुप्तचर क्रियाकलाप करताना चुकून शत्रू राष्ट्राला सापडलाच तर कल्पनाही करवणार नाही, चित्रपटात दाखवले जाऊ शकत नाही;क्रौर्याची इतकी वाईट सीमा शत्रुराष्ट्राचे सैन्य गुप्तचर संस्था त्या गुप्तचरासोबत गाठत असते.

रॉमध्ये कार्यरत प्रत्येक धुरंधराची हीच कहाणी आहे,जी आपल्यापर्यंत पोहोचत नाही.
पोहोचलीच तर त्याला अनेक दशकांचा काळ लोटलेला असतो.
या दशकांदरम्यान *अनेक धुरंधर भारतमातेसाठी शहीद* झालेले असतात.
*'असा हा धुरंधर' त्याच्या ऋणातून मुक्त होऊ देत नाही.*

-अमोल काळे
©Amol Arvind Kale
Email: [email protected]

*शिंकानसेन*'शिंकानसेन' हे नाव ऐकायला विचित्र-अनोळखी वाटत असले,तरी *'वक्तशीरपणा' आणि 'दर्जेदार सेवा' ही त्याची ओळख आहे.* ...
18/08/2025

*शिंकानसेन*

'शिंकानसेन' हे नाव ऐकायला विचित्र-अनोळखी वाटत असले,तरी *'वक्तशीरपणा' आणि 'दर्जेदार सेवा' ही त्याची ओळख आहे.*
मागील आठवड्यात जपानच्या शिंकानसेन बुलेट ट्रेनला स्टेशनवर पोहोचायला फक्त पस्तीस सेकंद उशीर झाला,म्हणून तिच्या प्रवाशांची माफी मागून त्यांना तिकीट रकमेचा परतावा देण्यात आला.

खरेतर अपवादात्मक स्थितीत तांत्रिक बिघाडामुळे वा नैसर्गिक संकटामुळे कोणत्याही सेवेत येणारा व्यत्यय हा समजून घेण्यासारखा आहे.
भारतात मात्र शहरी,स्थानिक लोकल सेवा असो अथवा मेल,एक्सप्रेस म्हणून धावणाऱ्या रेल्वे गाड्या;त्यांना होणारा तासन्तासाचा विलंब हा अक्षरशः प्रवाशांचे हाल करणारा ठरतो.
अशा विलंबानंतर भारतीय रेल्वे विभाग प्रवाशांना परतावा देणे तर दूरच, परंतु साधी दिलगिरीही व्यक्त करत नाही.
राज्य परिवहन महामंडळ,शहरी बससेवाही याहून वेगळ्या नाहीत !
थातूरमातूर कारणे देत,कार्यालयीन भाषेतील स्पष्टीकरण आणि पुन्हा *_'येरे माझ्या मागल्या'चाच_* अनुभव आपल्या प्रवाशांना मिळत जातो.

तसे पाहता जपानची बुलेट ट्रेन आणि भारतीय रेल्वे यांची तुलना करणे उचित नाही.
शिंकानसेनला होणारा उशीर हा सरासरी वीस सेकंदांचा आहे.
परंतु,*केवळ पस्तीस सेकंदांचाही हिशेब जो सेवा पुरवठादार ठेवत असेलआणि त्यावर माफी मागत असेल,तो व्यावसायिक नीतिमूल्ये कशी जपली जातात याचे उत्कृष्ट उदाहरण आहे.*
यापूर्वी 2018 मध्येही प्रवाशांची अशीच माफी दिरंगाई झाली म्हणून कंपनीने मागितली होती.
वेळेचे वाटणारे महत्व याहून अधिक ते कोणते ?!
आता जपान रेल्वेज ग्रुप(JR Group) सारख्या खासगी कंपनीमुळे तिथले संचालन इतके जबरदस्त आहे असे मत बरीच मंडळी मांडतील.

जपानी नागरिक सुद्धा 'शिस्त हे जीवनमूल्य' मानतात.
तेथील सार्वजनिक मालमत्तेबाबत ते किती *'स्वामित्वदर्शक दृष्टिकोन'* बाळगतात हे आपण सारेच जाणून आहोत.
या उलट भारतीय नागरिक राजकीय,सामाजिक संघर्ष निर्माण होताच, रेल्वे गाड्या,राज्य-शहर परिवहन बसेसवर कसा हल्ला चढवितात याबद्दल अनेकदा आपण सगळे नुसती चर्चाच करतो.
असे प्रकार होऊ नयेत,ही बाब स्वप्नवतच राहते !

शिंकानसेनने व्यक्त केलेल्या दिलगिरीनिमित्त भारतीय व्यवस्था व भारतीय नागरिक हे दोघेही *एकमेकांविषयी 'आदर,आपुलकी,जबाबदारी' ही आदर्श मानके आत्मसात करतील.* अशी आशा बाळगायला हरकत नाही.

-अमोल काळे




© Amol Arvind Kale.
[email protected]
Mobile:8390800009

13/08/2025

*कार्यारंभ*

आयुष्यातील पहिला जॉब,पहिले काम हा माणसाच्या फार जिव्हाळ्याचा विषय.
कारण,त्या कामामुळे तुम्ही कमावते झालेले असता.
जसा हा विषय जिव्हाळ्याचा असतो.
तसेच,त्या कामात आलेले अनुभवही विलक्षण खास असतात.

मी सुद्धा असाच अनुभव माझ्या पहिल्या कामाच्या ठिकाणी घेतला. दशकभरापूर्वी(०३/०८/२०१५,सोमवार)
मगरपट्टा सिटीत मी प्रिफर्ड इंजिनिअरिंग इथे 'डेटाबेस मॅनेजर' म्हणून माझा त्यावेळी अनोळखी पण पुढे चांगली गट्टी जमलेल्या मित्राच्या रेफरन्सने(संदर्भ) जॉईन झालो(कार्यारंभ केला).

प्रिफर्डमध्ये मला कामाव्यतिरिक्त भरपूर वेळ भेटत होता.
तो मी माझ्याच कामासाठी म्हणजेच स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी वापर करण्याचा प्रयत्न करत असे.
तयारीसाठी वर्तमानपत्रे आणि युट्युबचा वापर करण्याची आवश्यकता मला भासत होती.
माझी ही गरज ज्याच्या रेफरन्सने मी कंपनीत दाखल झालो होतो त्याच मित्राने पूर्ण करून दिली !
मला इंटरनेट ऍक्सेस दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा मी आभार मानायला गेलो;तेव्हा नेटवर्क इंजिनियर असलेल्या माझ्या ह्या मित्राने,"त्यात आभार कसले ? कुठे मला पैसे पडणार आहेत,छटाकभर इंटरनेट तू वापरले म्हणून !?",असा सवाल करून मला मोठ्या गोंधळात पाडले.
तेव्हा ह्याचा मी आता कसा *'गौरव'* करू? हा प्रश्न मला सतावू लागला होता.

ज्याने नोकरी मिळवून दिली तो असा पारावरच्या भाषेत कसा काय बोलला बुवा ?
या विचाराने,
माझ्या चेहऱ्यावर गोंधळलेली मुद्रा पाहून एका *'झाकलेल्या माणिका'ने*(साधी पण गुणी व्यक्ती) मला प्रश्न केला..."काय झालंय ? सकाळपासन काही बोल ना-चाल ना.
डबा नसल आणला;तर चल माझा डबा खा." अशी विनंतीवजा प्रश्नावली ऐकून मला बरे वाटले.
मी डबा तर नेला होता.पण,
या माणिकाने मला त्यासोबत थेट पॅन्ट्री मध्ये जेवायला नेऊन थोडा दिलासा दिला.
माणिक(अप्पा) आणि मी रोज दुपारी डबा खायला एकत्र बसायचो.
आठवड्यातून एकदा तरी अप्पा मला वक्तशीरपणा,बिनचूक काम या गोष्टींविषयी सल्ला द्यायचे.

दोन महिने उलटल्यानंतर एक बलदंड शरीरयष्टीचा
*तुझ्यात जीव रंगला* मधील हुबेहूब *राणादा* कंपनीत आला.
तो हडपसरचा रहिवासी होता.
त्यात पैलवानासारखा धिप्पाड...त्याला पाहून कंपनीतील इतर सहकार्‍यांना हे 'अजब रसायन' इथे कसे काय ?? हा प्रश्न पडू लागला !
त्या अजब रसायनाची आणि माझी गाडी पार्किंग करताना ओळख झाली. पुढे माझ्यामुळे माणिक(अप्पा) आणि राणादा(तुषार)देखील एकत्र येऊ लागले.
त्याने आम्हाला सुख-दुःख,मौजमजा,धांगडधिंगा,
मारामारीचे किस्से सांगून हरतर्हेचे 'तुषार' आमच्या मैत्री वर्तुळात उडवून दिले.

आमच्या कंपनीचा नेटवर्क इंजिनअर थोडा वेगळा होता.
ज्याचा सर्वार्थाने मला *गौरव* करायचा होता.
त्याचा स्वभाव पटकन कुणाच्याही लक्षात न येण्यासारखा.
तरीही,काही केल्या त्याला आमच्याशी जोडून घेणे आवश्यक होते.
आमच्या(गौरव आणि मी)सामायिक मित्राला(बारक्या) गौरवविषयी विचारले असता...तो म्हणाला,"अरे तो थोडा येडा आहे.पण,चांगला आहे!"

दुर्मिळ योगायोगाने आम्ही चौघे पहिल्यांदा एकत्र आलो,ते लिफ्टमध्ये !
सकाळी गाड्या पार्क करून आम्ही एकत्र(लिफ्टने) सातव्या मजल्यावर गेलो.
एकमेकांना सुप्रभात/गुड मॉर्निंग केले.
त्यानंतर आमच्या दोस्तीचे दरवाजे एकमेकांसाठी उघडले गेले.

हाय-बाय करणारा नेटवर्क इंजिनिअर शेवटी आम्हाला जोडला गेलाच.

आमच्या दोस्तीला बहर आणला तो शुक्रवारच्या पार्ट्यांनी...!!
प्रत्येक शुक्रवारी माझ्या मित्रांचे मांसाहार करणे आणि मांसाहारी हॉटेलात माझ्यासाठी
बाहेरून व्हेज बिर्याणी मागवणे हा नित्यपाठ झाला होता.
'एक दिन दोस्ती के नाम' हा डायलॉग शुक्रवारी हमखास ऐकायला मिळायचा आणि मला,"मी आज बाहेरच जेवून येणार आहे."
असे घरी सांगावे लागत असे.

माझ्या प्रिफर्डमधील कार्यकालास सहा महिने झाले होते.

सारे काही व्यवस्थित चालले होते.
प्रिफर्ड कंपनी आखातातील होती.
तिथल्या सामाजिक संघर्षामुळे तिला पहिला आर्थिक झटका बसला.
सबब,त्यांनी 'ले-ऑफ' राबवायला सुरू केले.

माझाही नंबर आला होता !
त्यावर गौरव आणि माणिक(अप्पा)यांनी,
व्यवस्थापनाने मला कंपनीतुन बाहेर काढू नये यावर विचार आणि कृती चालू केली.

आमच्या कंपनीचे सेनापती(मॅनेजर)हे इजिप्तचे होते.
काही काळ ते भारतात तर उर्वरित वेळ ते इजिप्तमध्ये असत.
ते भारतात नसताना कंपनीतील मनुष्यबळ अधिकाऱ्यामार्फत(HR) आपले नियंत्रण ठेवत.सेनापतींच्या खास मर्जीतील असलेल्या HR आणि अकाऊंटंट यांना हाताशी धरून गौरवने माझ्यावर असलेली ले-ऑफ ची कुऱ्हाड कोसळू दिली नाही.

पुढचे सहा महिने पुन्हा मजेत गेले.

कंपनीला दुसरा मोठा आर्थिक फटका बसला.
त्यांना व्यवसाय करणे अशक्य होत चालले होते.
त्यांनी आता सक्तीने लोकं कमी करणे चालविले होते.
आता आपल्यालाही कंपनी सोडावी लागणार,या धास्तीने मी रिझाईन केले.
'उगाच कशाला त्यांनी आपल्याला नारळ द्या?'
त्याआधी,मीच तुम्हाला टाटा-बायबाय करतो.
या हेतूने मी एक महिना अगोदर(ऑक्टोबर 2016)रिझाईन दिले.
त्या दीड वर्षाच्या काळातील अनेक आठवणी मनात साचल्या आहेत.
आम्ही चौघे भेटलो की अनेक विषय निघतात.
आम्ही त्यावरून एकमेकांना चिमटे काढतो,मस्करी करतो,पोटभर गप्पा मारतो...तेच पोट दुखेपर्यंत हसतो.

आता इतकेच...

माझ्या 'विंटेज ग्रुप'मधील माणिक कुंजीर,तुषार साळुंखे आणि गौरव बनकर यांना मैत्री दिनानिमित्त समर्पित.
✌🏻🙏🏻😊

-अमोल काळे

*_ऑपरेशन सिंदूर_* भलेही तात्पुरते स्थगित केले गेले असले.तरी,विविध आंतरराष्ट्रीय करारांमुळे भारत सरकारला जे करण्याची मुभा...
15/05/2025

*_ऑपरेशन सिंदूर_* भलेही तात्पुरते स्थगित केले गेले असले.तरी,विविध आंतरराष्ट्रीय करारांमुळे भारत सरकारला जे करण्याची मुभा मिळू शकत नाही ते आता तमाम भारतीयांनीच करण्याचे ठरविले आहे असे दिसते.
अतिरेक्यांचे कारखाने उभे करणाऱ्या पाकला अनेकांगी मदत करणाऱ्या तसेच उघड पाठिंबा देणाऱ्या तुर्की आणि अझरबैजानला आपल्या देशवासीयांनी मोठी चपराक लगावली आहे.याची सुरुवात पुण्यातील
फळव्यापारी-आयातदारांनी तुर्कीच्या *सफरचंदांना नकार* देत केली आहे.
त्यासोबत राजस्थानच्या काही फरशी व्यापाऱ्यांनी *तुर्कीचे मार्बल नको* अशी ठाम भूमिका घेतली.
त्याही पुढे जात मेक माय ट्रिप,इज माय ट्रिप,इक्झिगो व तत्सम तिकीट बुकिंग घेणाऱ्या भारतीय ऑनलाइन ट्रॅव्हल एजन्सीजने तुर्की व अझरबैजानला जाणाऱ्या विमानांची तिकिट विक्री करणे बंद केले आहे.
यास भारतीय पर्यटकांची अमूल्य साथ मिळाल्याने अनेकांनी आपल्या तुर्की-बैजानच्या नियोजित सहली
(प्लांड ट्रिप्स)रहित केल्या आहेत.
भारतीय पर्यटकांच्या बहिष्कारने धास्तावलेल्या तुर्कीला आपल्या पर्यटकांना विनंती करायला भाग पाडले आहे.
त्यावर तुमची कुठलीही सवलत नको फक्त *"तुमच्या ब्रदर्ली पाकिस्तानला दहशतवाद रोखायला सांगा"* असे ठणकावून सांगितले आहे.
आता याचा परिणाम भारताच्या तुर्की-बैजान निर्यातीवर झालाच तर तो किरकोळ स्वरूपातील असेल असे काही आयात निर्यातदार सांगतात.
एकंदरीत भारतीय समाजाच्या राष्ट्रवादाचा एक असाही पैलू जगास दिसला असेल !
यापूर्वीही भारताविरुद्ध आगळीक करणाऱ्या चीनला तेथील बनावटीचे मोबाईल खरेदी स्वयंस्फूर्तीने टाळणे असो,भारतविरोधी विधाने करणाऱ्या मालदीवच्या नेत्यांना दाखवलेली लक्षद्विप पर्यटनाची ताकद असो किंवा भारतीय ऋण विसरलेली उन्मादी धर्मांध बांगलादेशी टोळी असो...
*भारताची कुरापत काढणाऱ्या सर्वांनाच भारतीय जनतेने दाखवलेली इकॉनॉमिकल स्ट्राइकची वज्रमुठ 'ऐसेही युद्धा'चे अद्वितीय उदाहरण ठरले आहे.*

*जय हिंद !!*

-अमोल काळे

*आमदारांचे अपघात सत्र*आमदारांचे अपघात सत्र मागच्या काही दिवसांत एक विचित्र बातमी वर्तमानपत्रात सतत वाचायला भेटत आहे ती म...
18/01/2023

*आमदारांचे अपघात सत्र*

आमदारांचे अपघात सत्र मागच्या काही दिवसांत एक विचित्र बातमी वर्तमानपत्रात सतत वाचायला भेटत आहे ती म्हणजे,"अमुक नेत्याच्या गाडीला अपघात;तमुक आमदार झाले रस्ते अपघातात जखमी."

१४ ऑगस्ट २०२२ च्या सकाळी शिवसंग्रामचे नेते विनायकराव मेटे यांचे रस्ते अपघातात दुःखद निधन झाल्याची बातमी आली आणि संपूर्ण महाराष्ट्र या बातमीने हादरून स्तब्ध झाला.त्यानंतर माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला पहाटे फलटण येथे झालेला अपघात.त्यांना तातडीने पुण्याला आणून केलेले उपचार हा सारा घटनाक्रम आजही कुणीही विसरले नसेल.

गोरेंच्या अपघाताची चर्चा थांबते न थांबते तोवर दुसरी बातमी आली ती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ.धनंजय मुंडे यांच्या गाडीचा बीड येथे झालेला अपघात.त्यात मुंडेंच्या छातीवर लागलेला जबर मार आणि त्यांच्या महागड्या गाडीवरची चर्चा महाराष्ट्रात चांगलीच रंगली होती.

तिसरी बातमी आली ती दापोलीचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला कशेडी घाटाजवळ पाठीमागून डंपरने दिलेली धडक आणि त्यामागे असलेल्या घातपाताची शंका.
कदमांच्या बातमीवर उहापोह चालूच होता तोवर अजून एक ब्रेकिंग न्यूज आली ती आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या अपघाताची.

रस्ते असोत वा इतर कोणत्याही प्रकारचे अपघात;अनेक सामान्य माणसं गतप्राण होत असतात.त्यावेळी दोन दिवसांची 'व्यवस्था अपयशा'ची चर्चा रंगते आणि पुन्हा
'मागील पाढे पंचावन्न' अनुभवास येतात.
इथे मात्र महाराष्ट्र राज्याच्या कायदेमंडळाचे सदस्यच जखमी होत असल्याने चर्चेचे गांभीर्य अधिक वलयांकित होते.

बरे तर,कोणत्याही 'माननीयांची' प्रवासी वाहने ही पन्नास लाखाच्या आसपास किंवा त्यापेक्षा अधिक किंमतीची असतात तरीही अपघात होतात.एवढ्या किंमतीच्या वाहनांमध्ये सुरक्षेचे बरेच आयाम तपासून वाहन उपलब्ध करून दिले जाते तरीही वेळेअभावी रात्री-अपरात्री प्रवास करण्याचा हट्ट,बेफाम वेग,अनेकदा रस्त्यांची दुर्दशा,
अनावश्यक खड्डे,रस्त्यावर असलेले कमालीचे उतार,
जाहिरातीचे फलक आणि त्यामुळे अपघातास हमखास मिळणारे निमंत्रण आणि पुढील ओढवणारे दुर्दैव ही पारावरची चर्चा आता विधानसभा, संसदेत ऐकायला मिळाली तर नवल नको!

जोवर भारतात प्रत्येक जीव हा 'राष्ट्र उपयुक्त संपत्ती' समजली जात नाही तोवर वरील 'औचित्य प्रश्न' कितीहीवेळा 'शून्य प्रहर' गाजवून गेले तरी 'कायद्याशिवायचे नैतिक मूल्य' कुणाचेही सर्वलक्ष्यी सरंक्षण करू शकणार नाही किंबहुना त्याशिवाय 'आत्मभान येणे नाही.'

-अमोल काळे

*अब्जाधीश पृथ्वी*ती आली...तिला पाहिलं...तिने जिंकलं आणि आईच्या पोटाबाहेर येताच नवा विक्रमसुद्धा नावावर करून घेतला.साधासु...
05/12/2022

*अब्जाधीश पृथ्वी*

ती आली...तिला पाहिलं...तिने जिंकलं आणि आईच्या पोटाबाहेर येताच नवा विक्रमसुद्धा नावावर करून घेतला.
साधासुधा विक्रम नव्हे तर पृथ्वीची लोकसंख्या 8 अब्ज करण्याचा विक्रम! आपण बोलत आहोत ते गेल्या महिन्यात फिलिपीन्सची राजधानी मनिला इथे जन्मलेल्या विशेष बाळाची.तसे तिच्या येण्याने तिचे आई-वडील,कुटुंबीय फार सुखावले असतील.पण,तिच्या येण्याने साऱ्या जगाला पृथ्वीवर आता तब्बल आठशे कोटी लोक राहत आहेत याची आठवण करून दिली.

सुरुवातीची शंभर ते दोनशे कोटी लोकसंख्या व्हायला एकशे तेवीस वर्षे लागली.मात्र सातशे ते आठशे कोटींचा शतकी प्रवास मात्र फक्त अकरा वर्षांत पार केला गेला आहे.
यास आरोग्य सेवांनी साधलेल्या प्रगतीचे द्योतक मानले जाते.
तरीही,आठशे कोटींपैकी अगदी थोडा टक्का श्रीमंत,अतिश्रीमंत तर बराच मोठा टक्का निम्न-मध्यम वर्गीय,गरीब,कुपोषित अशा अनेक समस्यांनी ग्रस्त दिसतो.

दररोज वाढणारी लोकसंख्या रोज नव्या संकटांना आमंत्रण देत आहे.याचा परिणाम फक्त माणसासाठी नव्हे तर प्राणी,पक्षी,नद्या,समुद्र,जंगले एकुणात सारा निसर्ग यांसाठी भयावह ठरत आहे.वाढणाऱ्या हातांना काम देणेही जगभरातील सरकारांपुढचा यक्ष प्रश्न आहे.त्यात भारतसारख्या देशाला तर अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे.भारताची लोकसंख्या 2066 नंतर आटोक्यात येण्यास सुरुवात होईल तोपर्यंतचा काळ निदान भारतीसाठी निश्चितच सोपा नाही.उर्वरित जगाचेही असेच काही !

मानवी लोकसंख्येच्या बाबतीत 'अब्जाधीश पृथ्वी' तर केव्हाच झाली आहे खरी...परंतु,तिच्यापुढे खर्व-निखर्व प्रश्न निर्माण झाले आहेत त्यांची उत्तरे वाटतात तेवढी सोपी नक्कीच नाहीत.

-अमोल काळे

*पडे मज विसर*तुमच्या आमच्या गरजा फारदारात गाड्या दोन,तीन,चारखरेदीस पुढे येती 'कौतुकाचे विचार''ट्रॅफिकला देई आमंत्रण वर्त...
17/11/2022

*पडे मज विसर*

तुमच्या आमच्या गरजा फार
दारात गाड्या दोन,तीन,चार

खरेदीस पुढे येती 'कौतुकाचे विचार'
'ट्रॅफिकला देई आमंत्रण वर्तुळाकार'

रस्त्यासहित 'समस्येचा वाढतोय आकार'
मला त्याचे काय 'स्वप्न झाले साकार'

"माहीत नाही किती होतोय ?"
प्रदूषणाचा 'स्वास्थ्यावर वार',
'असह्य धरणी' हाच याचा सार

परिस्थितीवर करतो सहजी टीका.....
पडे मज विसर !

"उद्या आहे फंक्शन,...ये तू यार,
बिघडेल माझे स्टेट्स;आण तुझी कार"

-अमोल काळे

*अन्यथा नष्ट व्हा !*इजिप्तममध्ये पार पडत असलेल्या कॉप-27(COP)परिषदेत बिघडलेल्या वातावरणासंबंधी,येऊ घातलेल्या संकटांविषयी...
15/11/2022

*अन्यथा नष्ट व्हा !*

इजिप्तममध्ये पार पडत असलेल्या कॉप-27(COP)परिषदेत बिघडलेल्या वातावरणासंबंधी,येऊ घातलेल्या संकटांविषयी कालानुरूप मंथन चालू झाले आहे.काही उद्दिष्टे,लक्ष्य ठरविण्यात आली.यापूर्वीही,परिषद अनेकदा भरवली गेली होती.मात्र,'निर्धारित लक्ष्यसिद्धीचे काय ?'...या नव्या प्रश्नाचा जन्म काही काळ आधीच झाला आहे.

आधुनिक जगाची ओळख झाल्यापासून प्रत्येक देश गतीने परंतु वेड्यावाकड्या दिशेने प्रगतीच्या मागे लागला आहे.अशा प्रगतीने दिवसेंदिवस निसर्गाचा ऱ्हास होऊ लागला आहे याकडे लक्ष वेधण्यासाठी COP-27 भरविली जाते.देशोदेशीचे प्रमुख किंवा महत्वाचे मंत्री व त्यांची शिष्टमंडळे परिषदेस हजर राहतात.परिषदेत नवनवी प्रतिपादने,भाषणे करतात. काहींच्या भाषणात जबाबदारीचे भान तर काहींच्या भाषणात टीकेचा सूर आळवला जातो."आमचे कार्बन,हरित गृह वायू उत्सर्जन त्यांच्या पेक्षा खूप कमी आहे." अशी तुलना केली जाते आणि मूळ उत्तरदायित्वाचा विसर पडतो.

औद्योगिकीकरणामुळे आजवर निसर्गाचे लचके तोडले जात होते आता मात्र त्याचा गळाच दाबायचा प्रयत्न सुरू झाले आहेत.अशाने नवं भरारी घेणाचे आकाश जीवघेणे दूषित तर भरारी घेऊन पुन्हा परतण्यासाठी लागणारी जमीन आक्रसत चालली आहे.त्यातूनच वारंवार येणारे महाभयंकर पूर,उपासमारीचे न थांबणारे सत्र सुरू झाले आहे.

संयुक्त राष्ट्रांनी 1992मध्ये पहिली परिषद आयोजित केली.
1994 पासून हवामान बदलावरील उपायांची अंमलबजावणी चालू केली.तेव्हापासून दरवर्षी परिषद भरवली जात आहे. यावर्षीच्या परिषदेला आरंभापासून कार्बन उत्सर्जनावरील उपायांची न होणारी अंमलबजावणी यावर खूप चर्चा झाली.त्यात हवामान बदल रोखण्यासाठी गंभीरपणे अंमलबजावणी करायची असा निर्धार यजमान देशाने केला आहे.परिषदेच्या उर्वरित काळात बाकीचेही बरेच मुद्दे बाहेर येतील.इतर देश त्यास साथ देऊन 'वसुंधरा वाचवण्यास' कटिबद्ध राहतील असा आशावाद बाळगायला हरकत नाही.

बदलत्या तंत्रज्ञानासोबत पर्यावरणस्नेही तंत्रकुशलता वा प्रगती साधली जाऊ शकते.असे प्रचंड क्षमताशाली मानवी मेंदुच्या आविष्काराने वेळोवेळी सिद्ध केले आहे.
असे केल्यानेच शाश्वत विकास साधला जाऊ शकतो.
भारतासारख्या काही देशांची अवस्था तर आता कुठे प्रगतीला खऱ्या अर्थाने सुरुवात व्हायला आणि परिषदेत बंधने,नवनिर्धार यांच्यावर उहापोह व्हायला एकच गाठ पडली आहे.असे असले तरी,पर्यावरणाचे संतुलन राखूनच पुढे जायला हवे.

"अन्यथा नष्ट व्हा !",हे अँटोनियो गुटेरिस यांचे यंदाच्या परिषदेतील शब्द येत्या काही दिवसांत दृष्टिपथात आल्याशिवाय राहणार नाही.

-अमोल काळे

Address

Pune

Telephone

+919579994142

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when 24 PENS posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to 24 PENS:

Share