11/02/2022
पवन राजाने वसविलेले पद्मावतीनगर म्हणजेच आजचे पवनी नगर होय . कोषापासून निर्मित तलम रेशमी वस्खे , विड्यांची पाने या वैशिष्ट्यांसाठी या नगराची जुनी ओळख काळाच्या ओघात पुसल्या गेली. मात्र , वैनगंगेच्या काठावरील शेकडो मंदिरांच्या बहुलतेमुळे विदर्भाची काशी असे पुण्यक्षेत्र होण्याचे भाग्य पावन झालेल्या या नगराला लाभले आहे . तथापि , आणखी एका विशेष पण दुर्लक्षित वारशासाठी हे शहर प्रसिद्ध आहे , ते म्हणजे गरुड़ खांब. एक - दोन नव्हे तर वेगवेगळ्या मंदिरांच्या बाहेर स्थापित केलेले तब्बल दहा नक्षीदार गरुड खांब या नगराचे सौंदर्य व शोभा वाढवीत मोठ्या डौलात उभे आहेत.
स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले गरुडखांब अग्निजन्य (Basalts) खडक आणि बालकांस्य खडकापासून (Balcony Rock) बनलेले आहेत . गरुड खांबावर विष्णूच्या दशावताराचे प्रसंग कोरलेले आहेत . त्याचप्रमाणे अनेक पौराणिक कथांचा बोध गरुडखांबावर कोरलेल्या आकृत्यांमधून होतो . स्थापत्यकलेचा उत्कृष्ट वारसा असणारे हे गरुड खांब ऊन , वारा , पावसाचा मारा झेलत आजही खंबीरपणे रोवून उभे आहेत. पवनीशिवाय #नागपूर , #भिवापूर , #अंभोरा येथे गरुड खांब पाहायला मिळतात .
गरुड खांब निर्मितीचा इतिहास
गरुड खांब निर्मितीचा इतिहास सुद्धा बराच रंजक आहे . इ.स .२७० ते इ.स. ५५० या कालावधीत वाकाटक वंशांचे राज्य विदर्भावर होते . या वंशातील राजे विद्या , कला , स्थापत्य व धर्मप्रेमी होते. त्यांच्या काळातच रामटेक येथील श्रीनृसिंह , त्रिविक्रम पत्नी येथील शिवमंदिरांची निर्मिती करण्यात आली.
ह्या छायाचित्राचे सौजन्य📸:-
विदर्भातील निसर्गरम्य आणि मनमोहक छायचित्रे पाहण्यासाठी आताच फॉलो करा
पोस्ट आवडल्यास नक्की follow करा .
👇👇👇👇👇👇
↗️ ↖️
↗️ ↖️
↗️ ↖️
DM Ur best click quality pics
फोटोग्राफी क्लिक काहीतरी वेगळ अस
Wait for ur turn ⌛
तुम्ही काढलेला फोटो आम्हाला टॅग करा
टीप:- ह्या पेज वर आपण संपूर्ण विदर्भ आणि महाराष्ट्रातील अप्रतिम छायाचित्र, ज्यांनी ते फोटो काढले आहेत त्यांना proper credit देऊन सर्वांना पाहता येण्यासाठी त्याचप्रमाणे महाराष्ट्र आणि विदर्भ पर्यटनाला आपल्या माणसांनी बढावा देने हा हेतू #