Malshej Ghat lake camping

Malshej Ghat lake camping Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Malshej Ghat lake camping, Camera/Photo, Murbad.

🌷 सह्याद्रीचे वारकरी आज गोदाकाठी..!सह्याद्री म्हणजे आम्हा भटक्यांची इंद्रायणी आणि चंद्रभागाही. साल्हेर आमची आळंदी आणि रा...
30/06/2024

🌷 सह्याद्रीचे वारकरी आज गोदाकाठी..!

सह्याद्री म्हणजे आम्हा भटक्यांची इंद्रायणी आणि चंद्रभागाही. साल्हेर आमची आळंदी आणि रायगड आमचे पंढरपूर. राजगड आमची काशी; तर खेळणा (विशाळगड) आमचे रामेश्वर. ही सारी तीर्थस्थळे आपल्या अंगाखांद्यावर घेत माय मराठी मातीत ६६० किलोमीटर लांब पाषाण धारेत पांडुरंगासमान उभा तो आमचा विशाल सह्याद्री.

एरवी ही सारी तीर्थस्थळे आम्ही भटके गटागटाने बघत असतो. परंतु सर्व जण एकत्र येण्याचा योग येत नाही. तो योग जुळून येतो तो आजच्या गिरीप्रेमींच्या महासंमेलनाच्या निमित्ताने..सह्याद्रीच्या कुशीतील भटक्यांची आज गोदाकाठी मांदियाळी भरते आहे. त्यानिमित्ताने सह्याद्रीचे सारे वारकरी आज गोदाकाच्या गुरुदक्षिणा सभागृहात एकमेकांना भेटत आहेत. हा योग घडवून आणला आहे तो नाशिकचे ज्येष्ठ गिरीप्रेमी सुप्रसिद्ध छायाचित्रकार संजय (नाना) अमृतकर यांनी. नाशिक नगरीचे आकाश आज गिरीप्रेमींच्या स्वागतासाठी सावळ्या मेघांनी सजले आहे. संमेलनस्थळी सुंदर रांगोळी काढली गेली आहे. विशेष म्हणजे नाशिकचे प्रसिद्ध भटके आणि निसर्ग छायाचित्रकार दिलीप गीते यांच्या अप्रतिम छायाचित्रांचे सर्वांग सुंदर प्रदर्शन याठिकाणी भरवण्यात आलेले आहे. हे प्रदर्शन भटक्यांच्या रोमरोमात पुन्हा सह्यभक्ती जागे करते आहे.

सह्याद्रीसह हिमालयापासून ते आल्प्स पर्वतरांगांच्या कुशीत भटकंती करणारे अनेक अस्सल भटके आज संमेलनासाठी नाशिक नगरीत दाखल झालेले आहेत. तसेच एव्हरेस्ट शिखराला गवसणी घालणारे अनेक एव्हरेस्टवीरदेखील भटक्यांच्या दिंडीत सामील झाले आहे. ही सारी भटकी सृष्टी बघायला मिळणं हे किती भाग्यचे..! त्यासाठीच संमेलनस्थळापासून उत्तरेकडे दिसणारा एकमेव डोंगर (चामरलेणी) या भटक्यांच्या स्वागतासाठी आनंदाने उभा आहे.

खरे तर हे सारे होते घडते आहे ते सह्याद्रीच्या प्रचार,प्रसारासाठीच. सह्याद्रीमधील निसर्ग, आदिम संस्कृती, दुर्गस्थळे, पाणवठे, बारवा, पशुपक्षी, जंगले, अभयारण्ये, घाटवाटा आणि सारी जैवविविधता जपावी, संवर्धित व्हावी; आणि तिच्या कुशीत सुरक्षित गिरीभ्रमणाचा पंथ वाढावा म्हणून हे संमेलन भरते आहे. सह्याद्रीचे वारकरी बोलावून भटक्यांची ही अविस्मरणीय दिंडी आयोजित करणाऱ्या संजयनाना अमृतकर यांना यानिमित्ताने मन:पूर्वक शुभेच्छा; आणि त्यांचे हृदयपूर्वक आभारदेखील..!

🌷✒️મનોज काપડે
सહ્યાદ્રી पર્વતરાંગા, पुળે
९८८११३१०५९
🏞️🌞🦚🕊️🕊️🕊️

29/04/2022

Address

Murbad

Telephone

+918308081939

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Malshej Ghat lake camping posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Malshej Ghat lake camping:

Share

Category