26/06/2025
कोलते-पाटील डेव्हलपर्स ही केवळ एक रिअल इस्टेट कंपनी नाही, तर हजारो कुटुंबांच्या स्वप्नांचं घर आहे. विश्वास, गुणवत्ता आणि नावीन्यपूर्णतेचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ही कंपनी – विशेषतः पुण्यात त्यांनी उभारलेले प्रकल्प म्हणजे शहरी जीवनशैलीची नवी व्याख्या!
या यशाचं मूळ आहे १९७० मध्ये जळगावमध्ये अनिरुद्ध पाटील यांनी घेतलेलं एक छोटं पण धाडसी पाऊल. त्यांच्या दूरदृष्टीने सुरू झालेला रिअल इस्टेट व्यवसाय पुढे त्यांच्या मुलांनी – राजेश पाटील (आजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक) आणि नरेश पाटील (उपाध्यक्ष) – यांचं नेतृत्वाखाली १९८९ मध्ये पुण्यात पसरवला. १९९१ मध्ये ‘कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेड’ ही खासगी कंपनी म्हणून स्थापन झाली आणि पुढे ती पब्लिक लिमिटेड झाली.
आज कोलते-पाटील ग्रुपची मार्केट व्हॅल्यू ₹4088 कोटींवर पोहोचली आहे.
२००७ मध्ये NSE आणि BSE वर कंपनी सूचीबद्ध झाली आणि भारतातल्या रिअल इस्टेटच्या क्षेत्रात त्यांनी आपली ठसठशीत ओळख निर्माण केली.
पुणे, मुंबई, बंगळूरू या शहरांमध्ये कोलते-पाटीलने आलिशान निवासी, व्यावसायिक आणि आयटी प्रकल्प उभारले आहेत. त्यांनी आतापर्यंत २० दशलक्ष (२०० लाख) चौरस फूटांहून अधिक बांधकाम पूर्ण केलं आहे.
त्यांचा ‘लाईफ रिपब्लिक हिंजवडी’ हा ४०० एकरमध्ये पसरलेला एकात्मिक टाउनशिप म्हणजे भविष्यातील शहर! याशिवाय ‘लिटिल अर्थ’, ‘स्प्रिंगशायर’, ‘थ्री ज्वेल्स’, आणि 24K Altura, Stargaze, Opula यांसारख्या प्रोजेक्ट्सने त्यांनी प्रीमियम सेगमेंटमध्ये आपलं नाव कोरलं आहे.
"केवळ बांधकाम नाही, तर निर्मिती" या तत्त्वज्ञानावर आधारित कोलते-पाटील डेव्हलपर्स आजही CRISIL चं 'AA-/Stable' रेटिंग मिळवणारी एकमेव लिस्टेड रेसिडेन्शियल रिअल इस्टेट कंपनी आहे – जी त्यांच्या पारदर्शकतेची आणि आर्थिक स्थैर्याची साक्ष देते.
एका मराठी कुटुंबाची दूरदृष्टी, मेहनत आणि गुणवत्ता या त्रिसूत्रीवर उभारलेलं हे साम्राज्य आज लाखो लोकांच्या आयुष्याचं आधारवड ठरत आहे.