पाऊले चालती पंढरीची वाट

  • Home
  • India
  • Mumbai
  • पाऊले चालती पंढरीची वाट

पाऊले चालती पंढरीची वाट नमस्कार
हे पेज म्हणजे आषाढी एकादशी निमित्त निघणा-या पंढरपूर वारीचा पायी प्रवास आहे

07/02/2026

भावबळें आकळे येऱ्हवीं नाकळे ।
करतळीं आंवळे तैसा हरि ॥

भावना असह्य झाल्या की
भगवंत आठवतो तो पर्यंत नाही
तळहातात धरलेला आवळा
जसा शरीरासाठी अमूल्य आहे
तसाच भावनेत भरकटलेल्या जीवासाठी हरि
म्हणूनच हरिनाम जप करा

03/08/2025


त्रिगुण असार निर्गुण हें सार ।
सारासार विचार हरिपाठ ॥१॥
सगुण निर्गुण गुणांचें अगुण ।
हरिविणें मत व्यर्थ जाय ॥२॥
अव्यक्त निराकार नाहीं ज्या आकार ।
जेथुनी चराचर त्यासी भजें ॥३॥
ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं ।
अनंत जन्मांनीं पुण्य होय ॥४॥

अर्थ:
त्रिगुणात्मक जगत् अशाश्वत व असार आहे. तीन गुणांचे पलिकडे असलेलें निर्गुण निराकार परब्रह्म तेंच शाश्वत व सार होय. ह्या सारासाराचें रहस्य निरंतर हरिचिंतनांत रत असणें हेंच होय. ॥१॥
जे गुणसहित साकार आहे तें सगुण, जें गुणरहित निराकार आहे तें निर्गुण. म्हणजे सगुण तेंच निर्गुण व निर्गुण तेंच सगुण – फक्त गुण तेवढे अधिक वा उणे. कारण हरीची व्याप्ति दोहीतही समानत्वेंकरून आहे. त्या दृष्टीनें कोणत्याही सगुण वस्तुस निर्गुण असें निश्चयानें म्हणण्यास कांही हरकत नाहीं. श्रीहरीच्या ठिकाणी आकार अगर दुसरी कोणतीही उपाधि नसल्यामुळें त्याच्या स्वरुपाचें ज्ञान नेत्रादिक जड इंद्रियांस होणें शक्य नाही, ह्यासाठी भगवत देहाची मीमांसा करीत न बसतां, भगवत चिंतन करण्यांतच गढून जा. त्यावांचून अन्य विषयांत जर तूं आपलें मन गुंतविशील तर तो त्या मनाचा दुरुपयोग झाला असें समज. ॥२॥
जे व्यक्त नसून अमूर्त आहे, ज्यास आकार नाही, व ज्याच्यापासून चर (चेतनयुक्त) व अचर (जड) अशा उभयभावात्मक जगताची उत्पत्ति झाली, त्या हरीचें तूं भजन कर. ॥३॥
श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या ध्यानांत व मनांत निरंतर रामकृष्ण आहे व त्यायोगानें या जन्मात अनंत पुण्याईची जोड आहे. ॥४॥
या हरिपाठाचे मराठीत भाषांतर आम्ही केलेले नाही त्यामुळे भाषा किंवा लिखाणाच्या चूका असतील त्या आमच्याकडून झालेल्या नाहीत.
संदर्भ https://www.santsahitya.in/sants/

16/07/2025


चहूं वेदीं जाण साहिशास्त्रीं कारण ।
अठराहीं पुराणें हरीसी गाती ॥१॥
मंथुनी नवनीता तैसें घे अनंता ।
वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग ॥२॥
एक हरि आत्मा जीवशिव सम ।
वायां तू दुर्गमी न घालीं मन ॥३॥
ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ ।
भरला घनदाट हरि दिसे ॥४॥

अर्थ:
चार वेद, सहा शास्त्रें व अठरा पुराणें ही हरीचेंच वर्णन करीत आहेत. ॥१॥
ज्याप्रमाणें दही घुसळून त्यांतील सारभूत लोणी काढून घेतात व असार ताकाचा त्याग करतात, त्याप्रमाणें चार वेद, सहा शास्त्रें व अठरा पुराणें ह्यामध्यें सारभूत असणार्‍या हरीचें तूं विचारानें ग्रहण कर, आणि त्यांतील ताकाप्रमाणें असणार्‍या वांझट कथांचा मार्ग टाकून दे ॥२॥
हरि जो एक आत्मा त्याची व्याप्ति मायोपाधिक शिवामध्यें व अविद्योपासक जीवामध्यें एकसारखीच आहे. त्या हरीला सोडून दुसर्‍या समजण्यास कठीण अशा साधनांमध्यें तूं आपलें मन घालूं नको. (भज गोविंदम् भज गोविंदम भज गोविंदम् मूढ मते ? ) ॥३॥
श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरि म्हणजेच वैकुंठ. हरि हे त्या वैकुंठाचें नांव आहे. त्याचेंच मी निरंतर भजन करतों आणि तो मला पाण्यानें भरलेल्या मेघाच्या दाट फळीप्रमाणें जिकडे तिकडे दिसत आहे. ॥४॥
या हरिपाठाचे मराठीत भाषांतर आम्ही केलेले नाही त्यामुळे भाषा किंवा लिखाणाच्या चूका असतील त्या आमच्याकडून झालेल्या नाहीत.
संदर्भ https://www.santsahitya.in/sants/

11/07/2025

ज्ञानदेव म्हणे हरिजप करणें ।
तुटेल धरणें प्रपंचाचें ॥
हरिजप करणे म्हणजे नुसते देव देव करणे असा त्याचा अर्थ नाही तर हरि ने सत्याचा मार्ग दाखवला आहे तो आत्मसात करावा. लाडी लबाडी करू नये. लोकांची मने दुखावली जातील असे आचरण करू नये.
प्रपंच म्हणजे फक्त संसार नव्हे.
ज्याला परमार्थ करून मनुष्य जीवन सत्कारणी लावायचा असेल त्याने प्रपंच म्हणजे दुनियादारी, लोकांच्या जीवनात नाक खुपासणे सोडून आपल्या कामात लक्ष केंद्रित करावे.
आणि त्यातच त्या व्यक्तीचा उत्कर्ष आहे.
माऊलींच्या हरिपाठाचा अर्थ लावण्याइतकी माझी पात्रता नाही तरीसुद्धा माझ्या अल्पबुद्धीला जो अर्थ समजला तो इथे आपणास सांगण्याचा हा केविलवाणा प्रयत्न केला आहे.

09/07/2025


देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी ।
तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥
हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥२॥
असोनि संसारीं जिव्हे वेगु करी ।
वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणें ।
द्वारकेचा राणा पांडवां घरीं ॥४॥
अर्थ:
देवाच्या द्वारी क्षणभर उभे राहिल्यानें सलोकतादि चारी मुक्तींचा लाभ होतो. हे सकृद्दर्शनी असंभाव्य वाटतें, परंतु द्वारीं उभे असणें म्हणजे ‘सेवकाच्या नात्यानें तत्पर असणे’ असा अर्थ घेतला पाहिजे.श्रीतुकोबारायांनी (सेवा ते आवडी उच्चारावें नाम । भेदाभेद काम सांडोनिया ॥ ) परमप्रितीनें भगवन्नामोच्चार करणें हीच हरीची सेवा आहे असे सांगितलें आहे. श्रीज्ञानेश्वर महाराजांनीही पुढील ध्रुवपदांत ‘हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा’ असें द्विरुक्तीनें सांगण्यांत हरीचे नामस्मरण हेंच देवाचें द्वार असे सुचविले आहे. ‘क्षणभर या पदाचा अर्थ ‘अति अल्पकाल’ असा घ्यावा. अत्यल्पकाल देखील हरिनामोच्चारणरूप सेवा केली असतां चारी मुक्तीचा लाभ होतो, असा पहिल्या कडव्याचा सरळ अर्थ आहे.
देवाचें मुख्य द्वार म्हणजे ज्ञान. त्या ज्ञानरूपी द्वाराचा क्षणभरही आश्रय करण्यात मुक्तता आहे; म्हणजे बाह्य पंचविषयांपासून अंतर आनंदमय कोशापर्यंत सर्व अनात्मा जड आहेत, असे विचाराने जाणून त्याचें तादात्म्य सोडणें व अंतर्मुख वृत्तीनें नित्य ज्ञानरूप आत्माकार क्षणभर वृत्ति करणें म्हणजेच मोक्ष. पण अशा सिद्धांताने हरीचे नाम हेंच देवाचें द्वार सुचविलें त्यास व्यर्थत्व येते अशी कोणी शंका घेईल, तर हरिनामस्मरण केल्यावांचून चित्तशुद्धि होणार नाही, व चित्तशुद्धि झाल्यावाचून आत्मविषयक वृत्तीचीही उत्पत्ती होणार नाही. म्हणून हरिनामस्मरणाच्या आश्रयानेंच मुख्य ज्ञानद्वाराचा लाभ होतो.
या हरिपाठाचे मराठीत भाषांतर आम्ही केलेले नाही त्यामुळे भाषा किंवा लिखाणाच्या चूका असतील त्या आमच्याकडून झालेल्या नाहीत.
संदर्भ https://www.santsahitya.in/sants/

पंढरपूर वारीसामान्य माणसाच्या मनात वारीबद्दल वेगळंच आकर्षण आहे पण मुळात वारीला सोहळ्याचे स्वरूप जाणीवपूर्वक गेल्या १०० व...
06/07/2025

पंढरपूर वारी
सामान्य माणसाच्या मनात वारीबद्दल वेगळंच आकर्षण आहे पण मुळात वारीला सोहळ्याचे स्वरूप जाणीवपूर्वक गेल्या १०० वर्षात देण्यात आलेले आहे. वैदिकांनी वारीला शिस्त लावण्याच्या नावाखाली वारकऱ्यांवर लादलेल्या अटी नियम या आजही जातीभेद जिवंत ठेवला आहे हे सिद्ध करतात. गेल्याच आठवड्यात चोपदार यांनी एका बाईला धावताना धक्का मारून बाहेर काढले ती बाई डोक्यावर तुळस घेऊन पडली

हा व्हिडिओ बघा

महाराष्ट्राला वारीची शेकडो वर्षांची समृद्ध परंपरा आहे. या वारीत शहरी नक्षलवादी घुसल्याचं विधान महाराष्ट्राच्य....

https://youtu.be/DpWtYYY-X-M?feature=sharedहा आमचा मित्र आहे गेली ४ वर्षे पायी चालत वारी करत आला आहे.
03/07/2025

https://youtu.be/DpWtYYY-X-M?feature=shared

हा आमचा मित्र आहे गेली ४ वर्षे पायी चालत वारी करत आला आहे.

माऊलींचे खुडूस येथे दुसरे गोल रिंगण पार पडले संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज वेळापूर येथे मुक्कामी असेल आणि उ...

28/06/2025

Latest News
पालखी सोहळ्यात Drone उडवण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. Anti drone gun च्या सहाय्याने उडवलेले drones खालीपाडून जप्त केले जातात.

23/06/2025

काल ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी समोर सासवडला जय श्रीरामचा जयघोष झाला
हे काही योग्य नाही
ज्या संतांनी वैदिक धर्म नाकारला त्यांना आणि त्यांच्या भोळ्या भाबड्या भक्तांना पुन्हा एकदा वैदिकवादात ओढण्याचा हा केविलवाणा प्रयत्न कोणाचा होता हे काही वेगळं सांगायला नको

पांडुरंग...

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when पाऊले चालती पंढरीची वाट posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share