उनाड

उनाड मोकाट

26/04/2020
आगोट..... ोकण  #आगोट   #कोकण  ( आगोट = पावसापुर्वीची तयारी)
25/04/2020

आगोट.....

ोकण
#आगोट
#कोकण
( आगोट = पावसापुर्वीची तयारी)

रामफळ  #कोकण    ोकण
13/04/2020

रामफळ
#कोकण

ोकण

01/03/2017

तुझ्या श्वासांचे ठसे
मी शोधते मनात .
गीत अजूनी तुझे
गुंजे माझ्या कानात .

ती रात्र पौर्णिमेची
तुला अजूनी शोधते किनारी .
आज उदास रातराणी
तुझ्या गंधात फुलणारी .

तुझ्या मागूनी आली
माझी पाऊले पावसात .
तुच शिंपली ओंजळ
माझ्या रेशमी केसात .

उगाच वाटा थांबलेल्या
तुझ्या परतीच्या आशेवरती .
विरहात सख्या तुझ्या रे
हे दिस अबोल न सरती .

#एकलव्य
उनाड बोरकर

 #विजयदुर्ग           विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक जलदुर्ग आहे. सुमारे १७ एकर जागेत हा किल्ला पसरला आहे. या कि...
30/01/2017

#विजयदुर्ग

विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक जलदुर्ग आहे. सुमारे १७ एकर जागेत हा किल्ला पसरला आहे. या किल्ल्यास तीन तटबंदी आहेत. त्यास चिलखती तटबंदी असे म्हणतात. याच्या तीन बाजू पाण्याने घेरलेल्या आहेत. या किल्ल्यात दोन भुयारी मार्ग आहेत. एक किल्ल्याच्या पूर्वेकडे तर दुसरा पश्चिमेकडे. कान्होजी आंग्रे व तुळोजी आंग्रे हे एकेकाळी या किल्ल्याचे किल्लेदार होते.

विजयदुर्ग हे समुद्रामार्गी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवर वसले आहे. विजयदुर्ग किल्ल्याच्या समोरील बाजूस राजापूर तालुक्यातील माडबन समुद्रकिनारा आणि शिरसे गावाची खाडी हि दिसते.

हा किल्ला ११ व्या शतकाच्या अखेरीस शिलाहार घराण्यातील राजा भोजने बांधला. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५३ मध्ये विजयदुर्ग किल्ला जिंकला. १६५३ ते १८१८ पर्यंत या किल्ल्यावर मराठी अंमल होता. त्यानंतर हा किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला.

विजयदुर्गला पूर्वेकडील जिब्राल्टर असेही म्हणत कारण हा एक अजिंक्य किल्ला होता. ४० किलोमीटर लांब असलेली वाघोटन खाडी हे या किल्ल्याचे बलस्थान आहे. कारण मोठी जहाजे खाडीच्या उथळ पाण्यात येऊ शकत नसत आणि मराठी आरमारातील छोटी जहाजे या खाडीत नांगरून ठेवली जात, पण ती समुद्रावरून दिसत नसत.

#उनाड_वाटा
#कोकण_भ्रमंती

हवी आहे एक पणती रायगडावर तुमच्याकडून ..."एक पहाट रायगडावर उपक्रमाला ...." जो उस्फुर्त प्रतिसाद मिळालाय तो शब्दांत सांगता...
24/10/2016

हवी आहे एक पणती रायगडावर तुमच्याकडून ...
"एक पहाट रायगडावर उपक्रमाला ...." जो उस्फुर्त प्रतिसाद मिळालाय तो शब्दांत सांगता येण्यासारखा नाही
दरवर्षी प्रमाणे या दिवाळीतही आपल्या राजाची राजधानी शिवतीर्थ रायगड मशाली आणि दिव्यांच्या प्रकाशाने उजळणार,
आम्ही पणत्या आणलेल्या आहेतच परंतु किल्ले रायगडावर दिवाळीच्या पाहटे प्रकाश उजळण्याचे भाग्य आपल्या हि हातून घडावे केवळ याच करिता
ज्यांना तिथे येणे शक्य नाही त्यांच्या कडून पणत्या वा मशाली जमा करण्याचा प्रयत्न आहे.
अगदी १ पणती जरी दिलीत तरी ती आपल्या रायगडावर लागणार आहे.
हे अहो भाग्य मी तुम्हा सर्वांना सोडून एकटा कसे बरे घेईल?
येत्या 29 आणि 30 ऑक्टोबर 2016 रोजी पाहाटे ३ वाजेपासुन दिवाळी पहाट
शिवतीर्थ रायगडावर ......

रानवाटा....
27/09/2016

रानवाटा....

25/09/2016

तू अबोल रात राणी, मी दरवळणारा गंध.
तू रात चांदण्यांची, मी उनाड एक छंद.

तू भिजलेली पायवाट, मी कोसळणार्‍या धारा.
तू घट्ट मिठी धुक्याची, मी बेभान रानवारा.

तू मोहरलेली अबोली, मी प्राजक्ताचा सडा.
तू अथांग खोल दरी, मी सह्याद्रीचा कडा.

तू दिशा गंधाळलेली, मी श्वासांमधील ताजवा.
तू मिणमिणणारी वात, मी लुकलुकणारा काजवा.

तू माझ्या ह्रदयीची ओढ, मी मिळणाचा ऋतू.
तू सांज गुंतल्या पावलांची, मी उनाड एक हेतू.

❤ एकलवय ❤

नागेश्वरी ट्रेक       सकाळी 8 वाजता घरातून म्हणजेच बोरघर ह्या माझ्या गावातून नागेश्वरी ट्रेक साठी आम्ही तिघे मित्र मी (क...
18/09/2016

नागेश्वरी ट्रेक

सकाळी 8 वाजता घरातून म्हणजेच बोरघर ह्या माझ्या गावातून नागेश्वरी ट्रेक साठी आम्ही तिघे मित्र मी (किरण बोरकर) , प्रेमराज फोडकर व मिलिंद पाडावे आधीच ठरल्या प्रेमाणे वेळेत निघालो. प्रेमराज व मिलिंद हे दोघे रत्नागिरीचे असल्यामुळे रात्री 1वाजता माझ्या घरी दाखल झाले होते . दोघांनी ही रात्री प्रचंड कोसळणार्‍या पावसात mh 66 सततच्या पावसामुळे खड्डे पडलेला मुंबई गोवा हायवे वरुन 150 किलोमीटरचा चार तासाचा रत्नागीरी ते बोरघर (खेड) प्रवास केला होता. माझे घर हे खेड तालुक्यातील मुंबई गोवा मार्गावरील बोरघर ह्या गावात आहे. येथून नागेश्वरी ट्रेक चा पायथा म्हणजेच चोरवणे डांगेवाडी साधारण 66 किलोमीटर आहे .

आईने दिलेला जेवणाचा डबा बॅगेत भरून आम्ही तिघे आपआपल्या मोटार सायकल सुरू करून. नागेश्वरीच्या दिशेने रस्ता कापू लागलो .आज श्रावणातील शेवटचा रविवार होता तारीख 28/08/2016. कालपासून पाऊस रिमझिम चालूच होता.... हा कोसळणारा पाऊस अंगावर झेलत आम्ही तिन उनाड माणसं निसर्गाचा आनंद लुटत रस्ता कापत होतो. वेरळ (खेड रेल्वे स्टेशन) (खोपी फाटा ) वरून डावे वळण घेऊन आम्ही खोपी गावाकडे जाणारा रस्ता पकडला. वेरळ ते खोपी 19 किलो मीटरचे अंतर आहे. खोपी गावात पोहचल्यावर धामणंद गावात जाणारा फाटा लागतो . खोपी ते धामणंद 20 किलोमीटरचे आहे .

कासई घाट
खोपी ते धामणंद ह्या मार्गावर लागणारा कासई हा घाट.... वेड्या वाकड्या वळणांचा. समोर धुक्यात हरवलेले उंच उंच डोगर.... अनेक लहान मोठे कोसळणारे धबधबे....
कोठे धुक्यात हरवलेला रस्ता .... त्यात रिमझिम बरसणार्‍या श्रावणातील धारा.... अनेक पाखरांचे साद घालणारे आवाज ह्यातून आमच्या मोटार सायकल रस्ता कापत कापत धामणंद गावात पोहोचल्या. धामणंद गावात पोहचे पर्यंत 10 वाजले होते. तिघेही पावसामुळे चांगलेच गारठलो होतो. त्यामुळे तेथील एका गावरान हाॅटेलात झणझणीत मिसळ व गरमागरम चहा घेतला व पुढच्या प्रवासाला सुरूवात केली .

धामणंद ते चोरवणे हे अंतर 10 किलोमीटर आहे.
चोरवणे गावच्या वेशीवरच डांगेवाडीकडे जाणारा एक छोटासा रस्ता लागला, त्या रस्त्याने आम्ही आमच्या मोटार सायकल कसरतीने चालवत वाडीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरापाशी पोहचलो.... खडी डांबरीचा रस्ता ह्या मंदिरापाशी संपतो. तेथून पुढचा चार ते पाच किमी रस्ता खुप खडकाळ आहे. रस्त्याचे खडे ईतके टोकदार आहेत की गाडी पंचर होण्याची शक्यता नाकारता येत नहूती. त्यामुळे खुप सावधगिरीने मोटार सायकल चालवत नागेश्वरीच्या पायथ्याशी पोहचलो.

ट्रेकला सुरूवात
एका प्रचंड वेगाने कडेकपाडीतून वाहत येणार्‍या पर्‍या पासून नागेश्वरी ट्रेकची सुरूवात होते. मोठ्या पावसात हा परा ओलांडून पलिकडे जाणे शक्य नसते त्या साठी स्थानिक लोकांनी ह्या पर्‍यावर एक लाखडी साकव बांधला आहे. श्रावण महिण्यात येथे हे शंकराचे देवस्थान असल्यामुळे येथे ट्रेकला जाणारांची संख्या जास्त आसते.

सुरूवातीचा अर्धा तास आमचा ह्या पायर्‍या चढण्यात गेला.... पाऊस रिमझिम चालूच होता.... धुके ही प्रचंड होते.... त्यामुळे प्रेमराज ने फोटोग्राफीसाठी आणलेला कॅमेरा बॅगेतून बाहेर काढणे शक्य नहूते. पण मोबाईलच्या कॅमेरात टिपता येईल तेवढा निसर्ग आम्ही टिपला.

पायर्‍या संपल्यानंतर जेमतेम एक माणूस एका वेळेस चालू शकेल येवढ्याच रुंदीची पायवाट चालू होते. एका बाजूस उंच उंच गगणाला भिडलेले डोंगर तर दुसर्‍या बाजूस खोल खोल दरी.... जराही पाऊल चुकीच्या जागी टाकायला मुभा नाही येथे.... पण ह्यालाच तर सह्याद्री बोलतात....

मध्येच एका वळणावर घनदाट झाडीतून वाट चालू होते .
अजूबाजूने घुमणारे धबधब्यांचे आवाज.... अंगाला झोबणारा गारवा.... कधी दाट तर कधी विरळ असे धुके.... कधीही न पाहीलेली रानटी पण अतिशय सुंदर अशी फुले... खडकातून जन्म घेणारे झरे.... सारेच मन मोहून टाकत होते. स्वर्गाला ही लाजवेल असा हा आपला सह्याद्री.... डोळ्याचे पारडे फेडत होता....

थरार

साधारण दोन तास चालल्यानंतर चालू झाला तो खरा थरार ह्या थराराची एका धबधब्यातून चढाई करून सुरवात झाली.

उभ्या कड्यातून (कातळावरून) साखळदंडाच्या साह्याने कडा चढणे.... हा साहसी प्रकार अंगावर काटा आणणारा..... काही ठिकाणी संरक्षणासाठी लोखंडी पाईप बसवले आहेत पण त्याच्यावर जास्त विश्वास ठेवायला मन तयार होत नाही. त्या मुळे बसत बसत अरामात चढाई करत होतो. कोणत्याही प्रकारची घाई तिघेही करत नहूतो .... साधारण 30 ते 50 वर्षापुर्वी कातळामध्ये ड्रील केलेले लोखंडी साखळदंड आजही मजबूत अवस्थेत आहेत. चढताना त्यांचा आधार घेत होतो. ही साहसी कसरत करत चढण्यात साधारण 40 मिनिटे गेली.

मिलिंद पुढे मी मध्ये व प्रेमराज मागे असा आमचा क्रम होता. मिलिंद खुपच सराईत पणे वाट चढत होता. व प्रेमराज मला योग्य ठिकाणी आधार देत होता. धुके खुप असल्यामुळे दरीचा अंदाज येत नहूता. पावसामुळे वाट ही निसरडी झाली होती. कड्याच्या शेवटच्या टोकाला एक भली मोठी लोखंडी शिडी लागली तेव्हा जिवात जिव आला. ही भली मोठी शिडी चढून आम्ही नागेश्वरीच्या माथावर आम्ही पोहचलो .... ह्याच शिडी जवळून एक वाट वासोट्याकडे जाते .....

नागेश्वरीच्या माथ्यावर

आता आनंदाने मन नाचत होत.... निसर्गाने चेह-यावरती नव्या चैतन्याचा शिडकावा केला होता. बरेच वर्षाच माझे स्वप्न आज पुर्ण झाले होते.... गगणात न मावणार आनंद झाला होता..... ह्या पेक्षा सुंदर कदाचित स्वर्ग ही नसेल असे सौंदर्य ह्या सह्याद्रीच आहे.... आता चारी बाजूस फक्त धुके अन् धुकेच होते .... थोड्या अंतरावरती दगडांच्या पाय-या चढल्या नंतर आम्ही नागेश्वराच्या गुहेत पोहचलो. एका उभ्या कड्याला समोरची बाजू मोकळी आसलेली ही गुहा.... साधारण 30 ते 40 मानसे आरामात बसू शकतील येवढी प्रचंड मोठी गुहा आहे. गुहेमध्ये एक छोटी शंकराची पिंडी आहे. ह्या देवस्थानाला नागेश्वर असे नाव आहे व ह्या डोंगर माथ्याला नागेश्वरी असे संबोधले जाते. ह्या पिंडीवरच्या पाझरणार्‍या कातळातून सतत पाण्याचा अभिषेक पिंडीवर होत आसतो. पिंडी समोर एक नंदीची पाषाणी प्रतिमा आहे. गुहेच्या दारावर अनेक घंटा टांगलेल्या दिसतात. कदाचित नवसाच्या आसाव्यात .... एक भली मोठी घंटा आहे तिचा आवाज खुपच प्रचंड आहे..... तिघांनी ही मनोभावे शंकराचे पुजन करून पुढील अर्धा तास तेथेच अराम केला... आता तर प्रेमराजने बॅगेतून कॅमेरा बाहेर काढला होता. व फोटोग्राफीत हरवला होता. अंगावरचे सारे कपडे पुर्ण भिजल्यामुळे शरिर थरथर कापत होते. वातावरणातील गारव्यामुळे थंडी जाणवत होती. अंगावरचे कपडे तिघांनीही पिळून घेतले. तेवढ्यात आम्हाला अर्ध्या वाटेत काही वेळा पुर्वी भेटलेला लांजाचा एक ग्रुप गुहेत आला. साधारण 12 जणांचा ग्रुप होता पण त्यातील काहीजण अर्ध्यावरूनच परत फिरून मागे गेले होते..... असं त्यांच्या बोलण्यावरून जाणवत होतं....

नागेश्वरीचे शिखर

आम्ही नागेश्वराचे निरोप घेऊन बाहेर गुहेतून पडलो. तेथून बाहेर पडल्यावर नागेश्वरीच्या कळसावर (शिखरावर) चढण्याचे साहस आम्ही केले.... अतिशय आवघड घसरगुंडी प्रमाणे आसणारी वाट साधारण 15 मिनिटे गेली चढायला. हिते शक्य तो कोणी जाण्याचा प्रयत्न करत नाही .... खुपच आवघड व धोकादायक आहे येथे जणे. (नवख्या ट्रेकर्सनी शक्य तो हीते जाणे टाळावे ) शिखरावर नागेश्वराचे पितलेचे कळस आहे. ह्या शिखरावर एका वेळेस चार ते पाच माणसे बसू किंवा उभी राहू शकतात. चारही बाजूला खोल खोल दरी आहे. हितून वासोट्याचे दर्शन होते. ह्या शिखरावरून उतरताना मी तर बसून बसूनच उतरलो. वाट मातीची आसल्यामुळे चिखलातून पाय घसरत होते. ह्रदयाची धडधड थोडी वाढलीच होती. मिलिंद व प्रेमराज माझी खुप काळजी घेत होते योग्य त्या ठिकाणी मला आधार देत होते.

आता आम्ही शिखरावरुन खाली ऊतरलो होतो. भूक खुप लागली होती. अंग पावसामुळे गार पडले होते. एका सुंदर ठिकाणी बसून आईने दिलेला जेवणाचा डबा उघडला.... ह्या सह्याद्रीच्या खोर्‍यात आईच्या हातच्या जेवणाची चव खुपच लाजबाब वाटत होती. तिघेही मनमुराद खाण्याचा आनंद लुटत होतो. आज तिघेही आयुष्य खर्‍या अर्थाने जगत होतो. ह्या सह्याद्रीच्या कुशीतील क्षणंक्षण डोळ्यात भरुन घेत होतो. ह्या सह्याद्रीच्या सौंदर्य पुढे सारं फिकंच वाटत होते.

हे क्षेत्र व्याघ्र प्रकल्पात येत आसल्यामुळे येथे वस्ती करण्यासाठी वन खात्याची पर्वागी लागते. ह्या पुर्वी येथे आलेल्या काही ट्रेकर्सना वाघाचे दर्शन झाले आहे.

परतीची वाट

आता परतीच्या वाटेकडे फिरलो होतो आम्ही. वासोट्याकडे जाणारी वाट खुणावत होती पण वेळ अपुरा होता. त्या मुळे चोरवणे डांगेवाडी ची परतीची वाट धरली आम्ही. काही वेळा पुर्वी अनुभवलेला थरार पुन्हा अनुभवत डोंगर उतरत होतो. प्रत्येक पाऊल जपून टाकत योग्य त्या साखळदंडाला योग्य त्या ठिकाणी पकडून आम्ही कसरत करत उतरत होतो. आता थोडा पाऊस मंदावला होता. साधारण अर्धा तासात कसरतीनेच उतारलो.... पुढील वाट साधारण दोन तासाची होती. त्यामुळे काही वेळ हीतेच अराम घेऊन पुढील वाट चालू लागलो. नागेश्वरीचा पायथा गाठायला आडीच तास लागले. येव्हाना 5 वाजले होते. मोटार सायकल घेऊन आम्ही डांगेवाडीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आलो....

विठ्ठल रुक्मिणी मंदिर

हे मंदीर खुपच सुंदर आहे. छोटासा गाभारा व भला मोठा सभामंडप अशी ह्या मंदीराची रचना आहे. मंदिरात विठ्ठल रुक्मिणीच्या पाषाणी मुर्त्याआहेत.

दर्शन घेऊन आम्ही घराच्या दिशेने परतीचा प्रवास सुरु केला. आता पावसाने खुपच दमदार सुरवात केली होती.... अंगावरचे कपडे पुर्ण ओले झाले होते. अंधार ही दाटून आला होता. आजच्या दिवसचा आनंद मनाच्या गाठोड्यात साठवून आम्ही तिघे ही प्रसन्न चेह-याने घरचा रस्ता कापत होतो. घरी पोहचे पर्यंत 7 वाजले होते. घरी पोहचल्यावर प्रथम तिघांनी ही कपडे बदलले नंतर चहा जेवण.... थोड्याच वेळाने प्रेमराज व मिलिंद रत्नागिरीकडे निघाले. उध्या दोघांनाही सुट्टी नसल्यामुळे जाणे अनिवार्य होते..... रात्री 11 वाजता प्रेमराजचा रत्नागिरीत पोहचल्याचा फोन आला.......

© किरण प्रकाश बोरकर

उनाड          पाहटे 8 वाजता घरातून म्हणजेच बोरघर ह्या माझ्या गावातून नागेश्वरी ट्रेक साठी आम्ही तिघे मित्र मी (किरण बोरकर) , प्रेमराज ...

Address

Khed
415640

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when उनाड posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category