निसर्ग मित्र - Nisarg Mitra

निसर्ग मित्र - Nisarg Mitra http://apalanisargmitra.blogspot.in/
This is all about the nature around us. Photographs and related Information in Marathi

Nice morning in dombivli with few Dombivlikar birds
19/12/2019

Nice morning in dombivli with few Dombivlikar birds

Spotted Owlet at Khajuraho...
08/11/2019

Spotted Owlet at Khajuraho...

पुण्यापासून पुढे साधारण 90 किमी सोलापूर हाय वें वर भिगवण हे गाव आहे. उजनी धरणाचे विस्तृत क्षेत्र आणि आजूबाजूची हिरवळ ह्य...
28/12/2018

पुण्यापासून पुढे साधारण 90 किमी सोलापूर हाय वें वर भिगवण हे गाव आहे. उजनी धरणाचे विस्तृत क्षेत्र आणि आजूबाजूची हिरवळ ह्या मुळे हे पक्षांचे नंदनवन आहे.

युरोप रशिया तील कडाक्याची थंडी टाळण्यासाठी अनेक पक्षी हजारो किमी चां प्रवास करत भारतात पोचतात. इथे काही महिने हे पाव्हणे आनंदाने राहतात आणि मग परत हजारो किमी प्रवास करत मायदेशी परतात. म्हणून आपल्या इथला थंडी चा मोसम हा पक्षीमित्रांसाठी भटकण्याचा सिझन असतो

भिगवण ला दोन दिवस फेरी मारली आणि भरभरून पक्षी बघितले. खरी मजा दुर्बिणीतून त्यांना बघण्यात आहे जी लाभलीच वर काही फोटो ही मिळाले ते आपल्या सोबत शेअर करतो आहे.

https://youtu.be/2gthaNZ5Jf8परवा डोंबिवली रेती बंदर परिसरात फिरताना हा व्हिडिओ मिळाला. खवलेकरी मुनिया ची टोळी मनसोक्त पा...
06/10/2018

https://youtu.be/2gthaNZ5Jf8

परवा डोंबिवली रेती बंदर परिसरात फिरताना हा व्हिडिओ मिळाला. खवलेकरी मुनिया ची टोळी मनसोक्त पाण्यात डुंबत होत्या.

पक्षी नियमित धुळीची आणि पाण्याची अंघोळ करून स्वतः च्या पंखांची निगा स्वतः राखत असतात. बाहेरच्या एकदम वाढलेल्या तापमानावर अशी अंघोळ हा त्याच्यासाठी रामबाण उपाय ही असतो.

पक्षांच्या पंखावर असलेला मेण सदृश्य गोष्टीचा थर पंख चिंब ओले होऊ देत नाही. पाणी लगेच निथळून जात आणि लगेच पक्षी उडू शकतो. हा थर नसता तर पंख कपडा सारखे चिंब झाले असते आणि ते सुके पर्यंत पक्षांना उडता आल नसत.

ह्या खावलेकरी मुनिया अगदी मनसोक्त बागडत होत्या पण मग आजूबाजूला काही मोठ्या आकाराचे पक्षी वाढले आणि त्यांनी काढता पाया घेतला.

रूपक

To deal with October heat, scally Breasted munia has found solution, Water bath not only beat the heat issue but also help birds to take care of their feathers

कुंभार माशी कोंडेश्वर चा धनगर धबधबा हे दर पावसाळ्यात एकदा जायचं ठिकाण, ह्या रविवारी तिथे एका झाडावर वेगवेगळे किडे बघायला...
07/08/2018

कुंभार माशी

कोंडेश्वर चा धनगर धबधबा हे दर पावसाळ्यात एकदा जायचं ठिकाण, ह्या रविवारी तिथे एका झाडावर वेगवेगळे किडे बघायला मिळाले आणि फुलपाखर हि. सगळे त्या झाडाच्या फुलातील रस पिण्यात गुंग होते आणि त्या सगळ्या मध्ये होता एक देखणा रंगीत कीटक, कुंभार माशी

पण ह्याची खरी ओळख ह्याच्या दंशात आहे. कडकडून चावण्यासाठी प्रसिद्ध आणि निसर्गाचा खरा भूल तज्ञ, ह्या माशीच्या अनेक प्रजाती आहेत. विविध रंगाच्या असतात ह्या माश्या. इतर माश्या प्रमाणे घोळक्यात राहाण ह्यांना जास्त पसंद नसत. कुंभार नाव पडण्याचं कारण म्हणजे ह्यांची घर बनवायची पद्धत. मातीचे गोळे करून ते वाहून लहान मडक्या सारखे घरटं बनवतात. अशी घरटी दिसली तर जरा जपून बघा कारण घरट्यावर माशीच लक्ष असतं आणि तिचा दंश काही सध्या डास चावल्यासारखा नसतो. चावलेला भागावर प्रचंड आग होते आणि मग बधीर झाल्यासारखा होतो तो भाग.

बधीर वरून आठवलं कि ही माशी खरोखर भूल तज्ञ असते. पिल्लांसाठी घरट्यात अन्न जमावातांना ती त्या भक्ष्याला चावते पण मारत नाही. त्या चाव्याने भक्ष भूल दिल्यासारखा पडतो. त्याने तो अनेक दिवस अर्धमेला राहतो आणि घरट्यात कुजत नाही. हि माशी घरट्यात अंडी टाकून घरट बंद करते. अंड्यातून पिल्लं येतात ती आत ठेवलेल्या अन्नावर तव मारतात परत कोषात जातात आणि माशी बनून घरटं उघडून बाहेर येतात. आतलं अन्न कुजत नाही कारण ते अर्धमेल्या अवस्थेत असत. म्हणूनच हि माशी भूल तज्ञ आहे तिला अचूक माहिती आहे कि किती चावायचं आणि भूल कशी द्यायची.

इंग्रजीत सुद्धा Potter Wasp असंच नाव आहे हिला
थोडी माहिती होती ह्या माशीची म्हणून फोटो काढतांना रिस्क वाटत होती पण तिने न चावता माझ्यासाठी छान फोटोसेशन केलं आणि काही चांगले फोटो हाती लागले

Bhoar Gaon, Dombivli 11/02/2018
12/02/2018

Bhoar Gaon, Dombivli
11/02/2018

Birds calendar 2018पक्षी दिनदर्शिका २०१८
29/12/2017

Birds calendar 2018
पक्षी दिनदर्शिका २०१८

26/12/2017
हुदहुद –हे गमतीशीर नाव असलेला पक्षी दिसायला एकदम मस्त असतो. आकर्षक रंगसंगती सोबत त्याच्या डोक्यावरचा तुरा आणि अणकुचीदार ...
26/12/2017

हुदहुद –

हे गमतीशीर नाव असलेला पक्षी दिसायला एकदम मस्त असतो. आकर्षक रंगसंगती सोबत त्याच्या डोक्यावरचा तुरा आणि अणकुचीदार चोच हे आपल्याला लगेच आकर्षित करते. हा तुरा तो कधी फुलवतो तर कधी बंद करतो. जेव्हा तुरा बंद असतो तेव्हा तो साधारण त्याच्या चोची इतकाच लांब असतो आणि तुरा अगदी अचूक चोचीच्या विरुद्ध बाजूला असतो त्यामुळे जणू ह्याला दोन चोच आहेत का ? ह्या विचारात अनेक जण त्याला पहिल्यांदा बघितलं की पडतात.

गवताळ भागात जमिनितून किंवा गवतात लपलेले किडे पकडताना हा बघायला मिळतो. साधारण ही त्याची शिकार चालू असते तेव्हा त्याचा तुरा मिटलेला दिसतो. जमीन उकरून ही हा किडे शोधून काढतो आणि म्हणूनच त्याच्या चोचीची ठेवण अशी अणकुचीदार असते. किडे शोधतांना हा अगदी लांब पर्यंत चालतच फिरतो.

ह्याचा आवाज आणि तान घेण्याची पद्धत बघून ह्याचं नाव पडलं असणार. कारण तो आवाज हू..द.. हू..द असा ऐकायला येतो. इंग्रजी मध्ये ह्याला common Hoopoe असं म्हणतात

२००८ मध्ये इस्राईल देशाने ह्याचा बहुमान करत त्याला राष्ट्रीय पक्ष्याचा दर्जा बहाल केला आहे.

ह्या पक्ष्याचं नाव नवीन माहिती घेणाऱ्या मुलांना विचारलं की बहुतेक करून सुतार पक्षी असं उत्तर येतं पण आता हा फोटो आणि ही माहिती मुलांना दाखवली की त्याचं खर नाव मुलं सांगतील ह्याची खात्री आहे. आणि शाळेत शेतक-याचा मित्र म्हणून जसा गांडूळाने मान पटकावला आहे तसाच हे पण शेतकरी मित्र आहे कारण शेताला हानी पोचवणारे किडे हा मटकावून हा फस्त करतो आणि म्हणूनच हा कमी झाडी आणि गवताळ भागात जास्त आढळतो.

हा फोटो डोंबिवलीच्या भोपर गाव जवळ मिळाला. ह्यात ही हा पक्षी जमिनीवर अन्न शोधात फिरतांना दिसतो आहे.

Address

Dombivli

Alerts

Be the first to know and let us send you an email when निसर्ग मित्र - Nisarg Mitra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category