06/11/2025
भारतीय जनता पार्टी, धुळे महानगर – जिल्हा बैठक
दिनांक : ०६ नोव्हेंबर २०२५, गुरुवार
स्थळ : भारतीय जनता पार्टी कार्यालय, चाळीसगाव रोड, धुळे
आज धुळे शहरातील चाळीसगाव चौफुली येथील महादेव स्मृती भाजपा जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात भारतीय जनता पार्टी, धुळे जिल्हा महानगरतर्फे जिल्हा बैठक पार पडली. या बैठकीस पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीत आगामी महत्त्वाच्या कार्यक्रमांच्या नियोजनासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रमुख विषयांमध्ये ‘वंदे मातरम् गीताचा १५० वा वर्षपूर्ती सोहळा’, ‘आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान’, ‘जनजाती गौरव दिवस’ तसेच ‘भगवान बिरसा मुंडा जयंती’ यांचा समावेश होता.
बैठकीत कार्यकर्त्यांना पुढील कार्यक्रमाबाबत सूचना देण्यात आल्या.
दिनांक ०७ नोव्हेंबर २०२५, शुक्रवार रोजी सायंकाळी ४ वाजता टॉवर बगीचा, जे. बी. रोड कॉर्नर, धुळे येथे राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तसेच धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मा. श्री. जयकुमार भाऊ रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘वंदे मातरम् @150 – देशभक्तीचा गौरव सोहळा’ हा भव्य कार्यक्रम पार पडणार आहे.
या कार्यक्रमास सर्व लोकप्रतिनिधी, आघाडी प्रमुख, मंडळ अध्यक्ष, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकारिणीसह व नागरिकांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, अशा सूचना देण्यात आल्या.
याच बैठकीदरम्यान स्थानिक स्वराज्य संस्था धुळे महानगर निवडणूक प्रमुख म्हणून माझी निवड झाल्याबद्दल माझा सत्कार करण्यात आला.
बैठकीस जिल्हाध्यक्ष गजेंद्रशेठ अंपळकर, माजी आमदार श्री. राजवर्धन कदमबांडे, महापौर श्री. चंदकांत बापू सोनार, सौ. प्रतिभाताई चौधरी, श्री. प्रदीप नाना कर्पे, प्रदेश चिटणीस श्री. सुशील महाजन, सरचिटणीस श्री. पवन जाजू, श्री. सुनील कपिल, श्री. शशी मोगलाईकर, महिला मोर्चा अध्यक्षा सौ. आरतीताई पवार, युवा मोर्चा अध्यक्ष श्री. आकाश परदेशी, माजी महिला मोर्चा अध्यक्षा सौ. वैशालीताई शिरसाठ, श्री. शीतल नवले, श्री. भिकन आप्पा वराडे, श्री. महादेव भैया परदेशी, सौ. मायादेवी परदेशी, श्री. महेश मिस्तरी, सौ. भारतीताई माळी आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्तेही उपस्थित होते.
आमदार अनुपभैय्या अग्रवाल
धुळे शहर विधानसभा
#धुळे_महानगर
#धुळे_जिल्हा_बैठक