20/10/2022
दिवाळी म्हणलं कि किल्ला, अन किल्ला म्हणलं कि दुर्गपती छत्रपती शिवाजी महाराज...!
दिवाळीत किल्ला साकारण्याची पद्धत महाराष्ट्रात नेमकी कधी सुरू झाली यावर फार माहिती नाही, मात्र लहानपणी बाळ शिवाजीराजे आपल्या संवगड्यासोबत मातीचे किल्ले तयार करून खेळ खेळायचे असा उल्लेख शिवभारतात आढळतो. याच बाळ शिवबांनी मातीचे खेळ म्हणून सुरु केलेला हा खेळ पुढे अहद साल्हेर तहद पारगड अवघी दुर्गाची मालिका तयार करून दुर्गावरुन राज्य चालवले, रणकारण, राज्यकारण, केले ते दुर्गावरुनच आणि आपला चंदन देह ठेवला तोहि या दुर्गावरच..!
दुर्ग हे आपल्या जाज्वल्य इतिहासाचे आणि इथल्या स्वातंत्र्य प्रेरकतेचे मुलमंत्र आहेत. इतिहासातील अनेक जय पराजयाच्या स्मृती कवटाळून ते आजतागायत ही ऊन, वारा, पाऊस, मानवी आक्रमण इत्यादींना तोंड देत आजही स्वाभिमानाने उभी आहेत. याच दुर्गाचा जाज्वल्य इतिहास आपल्या व पुढच्या पिढीला कळावा यासाठी आपल्या पराक्रमाचे प्रतिक म्हणून दिवाळीत आपल्या घरातील आंगणात गड किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या जातात. मात्र हल्ली सिमेंट काँक्रीटीच्या च्या जंगलात हि संस्कृती लोप पावत चाली आहे हे चित्र आज सर्वत्र आहे. आपण हि संस्कृतीला पुन्हा गतवैभव करून देऊयात व आपल्या शिवरायांच्या गडकिल्ल्यांना आपल्या घरातील आंगणात अभिमानाने साकारुयात..!
छोटेखानी का असेना...!
घरोघरी दिवाळीत किल्ला असावा...
एका पिढीच्या हातून दुसऱ्या पिढीच्या हाती सुपूर्द करावं कसही असो, हे वैभव जपायला हवं...!
😊🙏🚩