23/02/2026
नागपूर प्रेस फोटोग्राफर व कॅमेरामन समूहातर्फे स्व. रजनीश काकडेंना पत्रकार भवनात श्रद्धांजली .
ज्येष्ठ छायाचित्रकार पत्रकार रजनीश काकडे यांचे निधन; पत्रकारितेवर शोककळा.
नागपूर : ज्येष्ठ छायाचित्र पत्रकार तसेच Mumbai Press Club चे उपाध्यक्ष रजनीश काकडे (वय ५५) यांचे निधन झाल्याची अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
रजनीश काकडे हे केवळ अनुभवी छायाचित्रकार नव्हते, तर नव्या पिढीतील अनेक छायाचित्र पत्रकारांचे मार्गदर्शक होते. आपल्या कॅमेऱ्यातून त्यांनी अनेक ऐतिहासिक व महत्त्वपूर्ण क्षण संवेदनशीलता आणि प्रामाणिकपणे टिपले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे असंख्य तरुणांना पत्रकारितेची योग्य दिशा मिळाली. सत्य, धैर्य आणि संवेदनशीलता यांचा संगम त्यांच्या कार्यातून नेहमीच प्रकर्षाने दिसून येत असे.
त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात सकाळ ग्रुपमधून केली. त्यानंतर त्यांनी Hindustan Times मध्ये तीन वर्षे काम केले. पुढे ते Associated Press मध्ये दाखल झाले आणि गेली अठरा वर्षे ते या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेसोबत कार्यरत होते. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी अनेक पुरस्कार प्राप्त केले होते.
त्यांच्या निधनामुळे माध्यम क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांची नम्रता, तल्लख दृष्टी, पत्रकारितेप्रती असलेली निष्ठा आणि नवोदितांना दिलेले प्रोत्साहन यासाठी ते सदैव स्मरणात राहतील.
त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले होते. त्यानंतर शिवाजी पार्क स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, नागपूर प्रेस फोटोग्राफर व कॅमेरामन समूहातर्फे पत्रकार भवन येथे स्वर्गीय रजनीश काकडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या कुटुंबीयांना, मित्रपरिवाराला आणि संपूर्ण पत्रकार बांधवांना या दुःखातून सावरण्याची शक्ती लाभो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली.
Raje Mudhoji Bhonsle - राजे मुधोजी भोंसले