Sunil Dmello Videos

Sunil Dmello Videos Thank you for visiting our page. We love making videos on traveling, history, trekking, cooking, cy

16/05/2026

मुंबईजवळ निसर्गाच्या कुशीतील Beach होम स्टे | Beach home stay in the lap of nature near Mumbai

ॲलीनने दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवल्याचा आनंद साजरा करण्यासाठी आम्ही चिंचणी समुद्रकिनारी एका सुंदर होम स्टे मध्ये गेलो होतो. पश्चिम रेल्वेच्या डहाणूच्या दिशेने असलेल्या वानगाव स्थानकातून रिक्षाने अवघ्या १५-२० मिनिटांत या होम स्टेवर पोहोचता येतं.

हे टुमदार होम स्टे समुद्रकिनाऱ्यापासून अवघ्या शंभर दीडशे मीटरवर आहे, त्यामुळे येथे नेहमी आल्हाददायक वारा वाहत असतो. समोर फेरफटका मारण्यासाठी सुंदर नारळीबाग देखील आहे.

येथे अटॅच्ड बाथरूम असलेल्या स्वच्छ आणि प्रशस्त अशा पाच ए.सी. खोल्या आहेत. या होम स्टेची खासियत म्हणजे एका वेळेला ते फक्त एकाच ग्रुपची बुकिंग घेतात त्यामुळे तुम्हाला पूर्ण प्रायव्हसी मिळते. खोल्या मोठ्ठ्या असल्यामुळे जमीनीवर गाद्या टाकल्यास एकावेळेला तब्बल २५ ते ३० माणसं येथे राहू शकतात.

सकाळी ११ वाजता चेक इन केल्यावर तुम्हाला दुपारचं जेवण, संध्याकाळचा चहा व नाश्ता, रात्रीचं जेवण तुमच्या मागणीनुसार वेज आणि नॉन वेज प्रकारात मिळतं. येथील जेवण अतिशय रुचकर आहे. जवळच्या मासळी बाजारातून मासे आणून दिल्यास काही दर आकारून तुम्हाला ते शिजवून देखील मिळतील.

होम स्टेच्या प्रशस्त गच्चीवर कॅरम, पत्ते किंवा इतर बरेच खेळ तुम्ही खेळू शकता आणि संध्याकाळी येथील सुंदर समुद्रावर धमाल करायला जाऊ शकता, जिकडे मुलांसाठी बरेच खेळ उपलब्ध आहेत व तिकडेच चौपाटीवरील चमचमीत पदार्थांवर तावदेखील मारू शकता. शिवाय निसर्गप्रेमींना येथील एका अनोख्या झाडांचं बन विशेष आनंद देऊन जाईल.

कुटुंबाच्या गेट-टुगेदरसाठी, महिलांच्या किंवा पुरुषांच्या ग्रुपसाठी, ऑफिसच्या आउटिंगसाठी, कोणत्याही छोट्यामोठ्या ग्रुपसाठी किंवा एखादा प्रसंग साजरा करण्यासाठी हे होम स्टे अत्यंत सोयीस्कर आहे.

तर मुंबईपासून अवघ्या दीड दोन तासांच्या अंतरावर असलेल्या बीच अँड ब्लिस या सुंदर होम स्टेचा अनुभव घेण्यासाठी खालील क्रमांकावर जरूर संपर्क साधा.

विशेष आभार:
बीच अँड ब्लिस (होम स्टे बुकिंग)
चिंचणी समुद्रकिनारा
९१३६०४३२३१ | ९८२०४३१४६७

वाणगाव स्थानक ते चिंचणी रिक्षासाठी
शाहरुख भाऊ ७८७५४२५८४५

छायाचित्रण व संकलन: अनिशा डिमेलो

अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!

नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.

यू ट्यूब शॉर्ट्स चॅनल
https://youtube.com/?si=UNtKL4Ierv8kBqqc

व्हॉट्सॲप चॅनल https://whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p

फेसबुक
https://m.facebook.com/SunilDmellovideos

इन्स्टाग्राम
https://www.instagram.com/sunil_d_mello/

16/05/2026

मुंबईजवळ निसर्गाच्या कुशीतील Beach होम स्टे | Beach home stay in the lap of nature near Mumbai

संपूर्ण व्हिडिओची लिंक 👇🏼
https://youtu.be/wctekuonKGA?si=47wBCxEZw1eSDGK7

13/05/2026

हे कोणतं झाड आहे?

एक दिवसीय सहलीसाठी वाणगावच्या चिंचणी किनारी गेलेला असताना तिकडे प्रचंड मोठं केवड्याचं बन नजरेस पडलं. केवडा उंचच उंच वाढतो आणि त्याच्या झाडांची रचना देखील विशिष्ट असते. त्याला मनमोहक फुलं येतात आणि ती गणपती बाप्पाला वाहिली जातात.

हे केवड्याचं बन समुद्रकिनारी नैसर्गिक बंधाऱ्याप्रमाणे काम करतं आणि समुद्राचं खारं वारं, पाणी आत शिरणार नाही याची काळजी घेतं.

तुम्ही केवड्याचं झाड पाहिलंय का? या झाडाविषयी, त्याच्या उपयोगाविषयी अधिक माहिती असल्यास जरूर प्रतिक्रियेमध्ये कळवा.

धन्यवाद!

10/05/2026

तलावांची ही परिस्थिती आपण बदलू शकतो का?

वसईत अजूनही खूप मोठ्या प्रमाणात तलाव आणि बावखलं शाबूत आहेत पण दुर्दैवाने बऱ्याच तलावांची अवस्था या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे खराब आहे. त्यात सांडपाणी आणि कचरा टाकल्यामुळे जलपर्णी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. जलपर्णी ही त्या तलावातील पाण्याची गुणवत्ता किती खालावली आहे हेच दर्शवून देते.

वसईच्या ज्या ग्रामीण भागात महानगरपालिका अजूनही पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करत नाही तिकडे या तलावांचे आणि बावखलांचे संगोपन करणे आणि त्याचे पाणी स्वच्छ राखणे खूपच महत्त्वाचे आहे.

महानगरपालिकेने स्वतः पुढाकार घेऊन असे तलाव आणि बावखलं कोणत्याही तक्रारींची वाट न पाहता साफ करून घ्यावेत ही नम्र विनंती. शिवाय एक जागरूक नागरिक म्हणून आपण देखील या तलावांची आणि बावखलांची काळजी घ्यायला हवी.

चला, या तलावांना वाचवण्यासाठी आणि त्यांना पूर्वीसारखे सुंदर बनवण्यासाठी एकत्र येऊया.

याबाबत तुमचं काय मत हे प्रतिक्रियेद्वारे नक्की कळवा.

धन्यवाद!

07/05/2026

मासे कापू नका

मासे कापू नका, त्याने दुर्गंधी पसरते

फळं सोलू नका, त्याने कचरा होतो

फुलं तोडू नका, ती कुजतात

झाडं लावू नका, ती कापावी लागतात

चालू नका, त्याने चपला झिजतात

बोलू नका, त्याने तोंडातून वाफ जाते

लिहू नका, त्याने पेनातील शाई संपते

चावू नका, त्याने जबडा दुखतो

श्वास घेऊ नका, त्याने हवेतील ऑक्सिजन संपून AQI वाढतो

प्रश्न विचारू नका, त्याने आम्हाला त्रास होतो

पाणी पिऊ नका, त्यामुळे आम्हाला ते पुरवावं लागतं

रस्ते मागू नका, त्यामुळे आम्हाला ते बांधण्याचं नाटक करावं लागतं, मग दहा वेळा भूमिपूजन करणं, उद्घाटनासाठी दोन-दोन वर्षे थांबणं, चार लेनच्या दोन लेन करणं.. नकोच ते

सुविधा मागू नका, त्यामुळे थातूरमातूर योजना बनवाव्या लागतात

घरं बांधू नका, ती रस्ते रुंदीकरणात तोडावी लागतात

शेती करू नका, तिचं प्रकल्पासाठी अधिग्रहण करावं लागतं

गुरंढोरं पाळू नका, त्यांच्या मल-मूत्राने घाण होते, मिथेन वाढतो, आणि ते काय तुमचं ग्लोबल वॉर्मिंग की काय ते होतं

जमल्यास जगू नका, त्याने पृथ्वीवर उगाच भार पडतो हो

मग कळलं ना काय करायचं आणि काय करायचं नाही ते..

हो पण...
तुमच्या कमाईतून, तुमच्या ठेवींतून, तुमच्या खरेदी-विक्रीतून वेळोवेळी कर मात्र भरत राहा

आणि मतदान करत रहा, मत आम्हाला देताय की नाही याने काही फरक पडत नाही

धन्यवाद

मँगो मनुष्य
०७०५२०२६

03/05/2026

हे नक्की काय आहे, जवळून पाहिल्यास थक्क व्हाल

वसईत शेती आणि निसर्गाचे विविध चमत्कार नजरेस पडतात आणि त्यासोबतच काही अवलिया व्यक्तींची ओळखदेखील होते.

यापैकीच एक म्हणजे नंदाखालच्या रुमाव आळीतील श्री. बर्नड रुमाव. स्वातंत्र्यपूर्वकालीन, स्वातंत्र्योत्तर, प्राचीन इतिहासकालीन भारतीय आणि परदेशी अशी अक्षरशः हजारो नाणी त्यांनी आतापर्यंत जमवलेली आहेत. हे कमी म्हणून की काय त्यांनी या नाण्यांपासून भारताचा नकाशा, गणपती बाप्पांची प्रतिमा अशा विविध कलाकृती साकार केलेल्या आहेत.

आज त्यांचा हा खजिना आम्हाला पाहायला मिळाला आणि त्यांच्या या आगळ्यावेगळ्या छंदाबाबत मनसोक्त चर्चा करता आली.

तुम्हाला त्यांच्या या छंदाबाबत अधिक जाणून घ्यायचे असल्यास किंवा त्यांनी बनवलेली एखादी कलाकृती हवी असल्याला व्हिडिओत दिलेल्या त्यांच्या संपर्क क्रमांकावर जरूर संपर्क साधा.

विशेष आभार:
श्री. बर्नड रुमाव आणि कुटुंबीय (संपर्क क्रमांक व्हिडिओत दिलेला आहे)

छायाचित्रण व संकलन: अनिशा डिमेलो

अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!

नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.

यू ट्यूब शॉर्ट्स चॅनल
https://youtube.com/?si=UNtKL4Ierv8kBqqc

व्हॉट्सॲप चॅनल https://whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p

फेसबुक
https://m.facebook.com/SunilDmellovideos

इन्स्टाग्राम
https://www.instagram.com/sunil_d_mello/

01/05/2026

धन्यवाद महाराष्ट्र देशा

व्हिडिओची लिंक 👇🏼
https://youtube.com/shorts/muP7nyy_qiE?si=Mi_juFgzSLTlyX7L

शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेऊन शेवटी स्वतःला हवं तेच करणाऱ्यांना ते करू देणाऱ्या महाराष्ट्र देशा तुला धन्यवाद

जंगल-झाडी-गावे-घरे-दारे उध्वस्त करून बंदरे, रस्ते, गृहसंकुले बांधून विशिष्ट लोकांचा विकास साधणाऱ्या महाराष्ट्र देशा तुला धन्यवाद

स्व राज्य हित चिंतीणाऱ्या लोकांवर मोठा गुन्हा केला की काय अशा आविर्भावात पाहणाऱ्या महाराष्ट्र देशा तुला धन्यवाद

नावं बदलण्यालाच विकास समजणाऱ्यांचा उदो-उदो करणाऱ्या महाराष्ट्र देशा तुला धन्यवाद

मराठी मेली तरी चालेल पण दुसऱ्याची भाषा जगली पाहिजे यासाठी झटणाऱ्या महाराष्ट्र देशा तुला धन्यवाद

शेवटी रंजल्या-गांजल्या १८ पगड जातीच्या आणि राज्यांच्या लोकांना सामावून घेऊन त्यांचे संगोपन करणाऱ्या महाराष्ट्र देशा तुला धन्यवाद

जरी आज महाराष्ट्र राज्यस्थापनेला ६६ वर्षे होत असली तरी महाराष्ट्र धर्म त्यापेक्षा कितीतरी जुना आहे. तुम्हां सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

यावर्षी तरी आपणा सर्वांना महाराष्ट्र राज्यहिताबाबत बोलायला हिंमत मिळो आणि ते जोपासण्यासाठी आपण सदोदित कार्यरत राहो या खूप खूप शुभेच्छा!

धन्यवाद!

महाराष्ट्रधर्मी मँगो मनुष्य
०१०५२०२६

28/04/2026

गोचाळलेल्या वगैरे गावा

काय रे ए...गोचाळलेल्या वगैरे गावा
अरे दचकतोस काय असा..मान वर करून इकडे बघ, वर. मी शहर बोलतोय..
हो रे मीच बोलतोय, माझ्या असंख्य इमारतींपैकी एका गगनचुंबी इमारतीच्या गच्चीवर उभा राहून मी तुला न्याहाळतोय, सगळीकडे हिरवा बुरखा पांघरलेला खेडूतच दिसतोय रे मला...

मला शहरीकरण नको..
शहरं असतात बकाल अन् भयाण..
ती असतात गलिच्छ नी रोगराईने बरबटलेली..
त्यांना भस्म्या झालेला असतो, आजूबाजूची गावं गिळंकृत करतात शहरं..

अशी बोंब मारणारे तुझे ढोंगी गावकरी...
पोटात भाकरीचा तुकडा पडावा म्हणून राबत असतात दिवसभर शहरात,
पदवीधारक ते अर्धे-मुर्धे शिक्षण झालेले.. काहीतर एक अक्षरही लिहिता-वाचता न येणारे...
सारेच धावत असतात माझ्याकडे..
इतकेच कशाला, गावात राहून शेती करणारा शेतकरीही राबत असतो माझ्याच बाजारपेठेच्या जोरावर..
दूध, फुले, भाज्या काहीबाही वाहत असतो माझ्या चरणावर.

कधी अडवलंय मी कुणाला?
कधी भाकरी नाकारली आहे त्यांना?
नाही ना...
तरी पण मी वाईट, का?
सर्व फायदेच का हवेत तुम्हाला?
थोडा त्याग करायलाही शिका..

जास्तं नाही मागत..फ़क्त तो तुमच्या काळजाच्या कुपीत पूर्वजांकडून जीवापाड जपलेला जमिनीचा तो तुकडा तेवढा द्या..
आईशप्पथ सांगतो घर भरून टाकेन तुमचं पैशाने..
घरात, बँकेत ठेवायला जागा उरणार नाही एव्हढा पैसा ओतेन मी तुमच्यावर..
मग निवांत मिरवत बसा तुम्ही तो पैसा अंगा-खांद्यावर,
वाटलं तर खुशाल रपेट मारा त्या पैशावर बसून...

काय? पटत नाही..
काहींना ते पटलयं, एन्जॉय करतायत ते..
आज नाही तर उद्या इतरांनाही पटेल..
नव्हे पटवून घ्यावच लागेल.
मग तेही करतील एन्जॉय......तुझ्या मढ्यावर बसून..!

-
हिरव्या बुरख्यातला मँगो मनुष्य
१९०५२०१५

26/04/2026

वेल्क्रोचा शोध: निसर्गातून प्रेरणा

शंकेश्वर या आयुर्वेदिक वनस्पतीपासून प्रेरणा घेऊन एका स्विस संशोधकाने वेल्क्रोचा शोध कसा लावला हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा.

तुमच्या परिसरात या आयुर्वेदिक वनस्पतीला काय म्हणतात हे प्रतिक्रिया देऊन कळवा.

धन्यवाद!

23/04/2026

तब्बल सव्वा किलोचं लिंबू

वसईतील केळीचे सर्वात मोठे शेतकरी फर्मिन दादा यांच्या बागेतील लिंबाच्या झाडाला तब्बल सव्वा किलो वजनाचं लिंबू आलेलं आहे. निसर्गाचा हा चमत्कार नक्कीच पाहण्यासारखा आहे.

तुम्ही पाहिलेला मोठ्यात मोठा लिंबू किती किलोचा किंवा किती ग्रॅमचा होता हे नक्की प्रतिक्रिया देऊन कळवा.

धन्यवाद!

Address

Vasai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sunil Dmello Videos posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sunil Dmello Videos:

Share