13/10/2021
🔥Padmaavat🔥
Inframe:
Filmed By:
MUA:
Lights:
चित्तोडची महाराणी पद्मिनी (पद्मावती)
जिजाऊमासाहेब, पुण्यश्लोक अहिल्याबाई, राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले आदि प्रात: स्मरणीय मातृदेवतांइतकीच वंदनीय व पूजनीय असणारी; देव देश अन् धर्मरक्षणर्थ आपल्या प्राणांची आहुती देऊन बलिदानाचा अत्युच्च आदर्श प्रस्थापित करणारी , रतिप्रमाणे अद्भुत ,आरसपानी अशी लावण्याची खाण असलेली , राणा रतनसिंहची महाराणी! श्रीलंकेचा राजा गंधर्वसेन व राणी चंपावतीची रुपागर्विता राजकन्या!!
दिल्लीचा राजा व्यभिचारी व लंपट अल्लाउद्दीन खिलजी याच्या आपल्यावर असणाऱ्या वाईट नजरेमुळे राणी पद्मिनी व सोळा सहस्त्र विरांगनांनि अग्नीकुंडात उड्या घेतल्या व स्वतःचं शिल ,देव ,देश व धर्माचं रक्षण केलं.तोच "जौहराचा सोहळा "!
अशा या चारित्र्यवान राणीला नवरात्रीचे सातवे पुष्प अर्पण.🙏