07/02/2024
हरियाणा राज्यातील कुरुक्षेत्र या ठिकाणी 'गुरुकुल' या संस्थेमध्ये नैसर्गिक शेती विषयक शेतकरी प्रशिक्षण :- ........................................................................ मा.संचालक (आत्मा), महाराष्ट्र राज्य, पुणे ,श्री दशरथ तांभाळे , मा . विभागीय कृषी सहसंचालक पुणे विभाग, पुणे ,श्री रफिक नाईकवाडी यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली प्रकल्प संचालक आत्मा, पुणे यांच्यामार्फत पुणे जिल्ह्यातील तालुका दौंड,भोर, जुन्नर, खेड, आंबेगाव व मावळ या पाच तालुक्यातून डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती या योजनेमध्ये भाग घेतलेल्या एकूण 30 गटप्रमुखांना हरियाणा या राज्यातील कुरुक्षेत्र या ठिकाणी गुरुकुल या प्रशिक्षण संस्थेमध्ये दिनांक 4 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत नैसर्गिक शेती याविषयी प्रशिक्षण देण्यासाठी आत्मा योजनेमधून आंतरराज्य शेतकरी प्रशिक्षण आयोजित केलेले आहे. या आंतरराज्य प्रशिक्षणासाठी प्रकल्प संचालक पुणे श्री विजय हिरेमठ यांनी विशेष लक्ष घालून नियोजन केलेले आहे.पुणे जिल्ह्यातील या शेतकरी गटाचा आजचा प्रशिक्षणाचा पहिला दिवस अत्यंत उपयुक्त असा होता अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्हाट्सअप द्वारे व दूरध्वनी द्वारे व्यक्त केलेल़्या आहेत. 2 )अशाच प्रकारे पुणे जिल्ह्यातील बारामती ,इंदापूर ,हवेली, वेल्हा व भोर या तालुक्यांमधून *गझियाबाद येथील NCONF (National Centre Of Natural Farming )या राष्ट्रीय पातळीवरील नैसर्गिक शेती विषयक प्रशिक्षण संस्थेत 30 शेतकऱ्यांचा ग्रुप* दिनांक 11 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी या दरम्यान पाठवण्याचे संपूर्ण नियोजन प्रकल्प संचालक आत्मा, पुणे या कार्यालयाने केलेले आहे. 3)याबरोबरच पुणे जिल्ह्यातील बारामती कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव कृषी विज्ञान केंद्र, श्री श्री रविशंकर त्रिवेणी आश्रम पुणे व इनोरा बायोटेक पुणे* अशा विविध नामांकित संस्थांमध्ये शेतकरी गटांची प्रशिक्षणे चालू आहेत. अशातऱ्हेने बहुसंख्येने शेतकरी प्रशिक्षित झाल्यास असे प्रशिक्षित झालेले शेतकरी मास्टर ट्रेनर म्हणून गटातील इतर सदस्यांना मार्गदर्शक ठरून नैसर्गिक शेती या योजनेस निश्चितच उत्तम अशी गती मिळू शकेल. या दृष्टीने प्रकल्प संचालक आत्मा पुणे कार्यालय हे सातत्याने प्रयत्नशील आहे.