True Ant Wanderer

True Ant Wanderer Biker,Nomadic,Adventurer,Caveman,NaTuRe Lover, Never Ending Curiosity.believer to karma.

21/01/2024

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शस्त्र पुर्ण व्हिडिओ आपल्या True Ant Wanderer या YouTube Channel वर पहा

Sarasgad vlog is on our YouTube channel go and watch kind of raw....
07/09/2021

Sarasgad vlog is on our YouTube channel go and watch kind of raw....

https://youtu.be/ma4yEWagAqg.    स्वराज्याचे तिसरे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या वाड्याची घेतलेली धावती भेट आपणाला कश...
27/07/2021

https://youtu.be/ma4yEWagAqg. स्वराज्याचे तिसरे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या वाड्याची घेतलेली धावती भेट आपणाला कशी वाटली ते सांगा. ही वास्तू महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन स्थळं असतात त्याच्यामध्ये ब श्रेणी मध्ये येते म्हणजेच हे खूपच ऐतिहासीक आणि महत्वाची वास्तू आहे. तरी आपण याची दखल घेतली पाहिजे. ही आपली जबाबदारी आहे. True Ant Wanderer या आपल्या मराठी चॅनल ला भेट द्या.

स्वराज्याचे तिसरे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या वाड्याची झालेली दुरवस्था या भ....

14/07/2021

Way to manikgad through the jungle

13/07/2021

My farm vlog go and watch it

https://youtu.be/rK8kqlBtLxQ
26/05/2021

https://youtu.be/rK8kqlBtLxQ

Hi, As I've mentioned in titled this is my first Trek Of 2021 to Korigad Fort I've explore there some hidden or secret door on fort. Korigad Fort is a beauti...

01/05/2021

KORIGAD fort is located between tiger point and amby valley lonawala. One day trek fort for mumbaikers.

जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा.
01/05/2021

जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा.

लहानपणी मी जेव्हा आजारी पडत असे तेव्हा मला सुईची खूप भिती वाटत असे. म्हणून जसं शाहिस्तेखानाच्या जिवावर बेतल पण बोटावर नि...
14/04/2021

लहानपणी मी जेव्हा आजारी पडत असे तेव्हा मला सुईची खूप भिती वाटत असे. म्हणून जसं शाहिस्तेखानाच्या जिवावर बेतल पण बोटावर निभावलं तसचं काहीतरी पर्याय म्हणून डॉक्टर ला औषधे खातो मी पण सुई नको म्हणून विनवणी करायचो पण जेव्हा औषधे खाण्याची प्रत्यक्ष वेळ यायची तेव्हा मात्र माझे धाबे दणाणले कारण ती कडू लागत मग आई युक्ती म्हणून मला १ रुपया २ रुपया जमेल तेवढे पैसे खाऊ घेण्यासाठी देत असत. ही गोष्ट ४ थीची नुकतीच महाराजांशी तोंडओळख व्हायला सुरुवात झाली होती. आणि त्याने मी त्या लहान वयातच एखादया प्रियकरासरखा महाराजांवर भाळून गेलो होतो. जाणारच कारण स्वराज्याचे तिसरे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या गावचा मी अगदी कळत्या वयापासून त्यांच्या वाड्याला बघून कल्पनेत महाराजांच्या स्वराज्याची चित्रे रंगवून मृगाने कस्तूरी चा शोध घ्यावा तसा स्वराज्य कसे असेल त्याचा विचार करत असे. मला वाचनाची गोडी निर्माण झाली होती. त्यामुळे आई जे पैसे खाऊ साठी देत असत ते साठवून मी अनमोल प्रकाशनचे लहान मुलांसाठी असणारी गोष्टीची पुस्तके विकत घ्याचो आणि ती वाचत असे. हा हा म्हणता वर्ष उलटलं आणि मी ईयत्ता पाचवी मध्ये गेलो म्हणजे च हायस्कूल ला होतो आता मी. जिथे खेळांचे साहित्य ग्रंथालय होते बस ज्याला वाचनाची भूक होती त्याला जगण्याचा नवा मार्ग मिळाल्यासारख माझ झाल होत आता मला पैसे साठेपर्यंत वाट बघावी लागणार नव्हत सभासद नोंदणी करून स्वतःच्या नावावर पुस्तक घेवू शकत होतो मग काय लगोलग आमचे ग्रंथपाल श्रीयुत कुंभार सर यांना भेटून मनची मनीषा जाहीर करून टाकली आणि त्यांनी पण ती मान्य केली ती जेवढ्या तन्मयतेने सांगितली गेली म्हणून मान्य केली या विचारातच मी खुश होऊन दुसऱ्या दिवसाची वाट बघत राहिलो. माझ्यासाठी स्वर्ग दोन बोटं उरला होता. झाला एकदाची वर्षासारखी वाटणारी ती काळरात्र उजाडली. आज मी खजिना डोळ्याखाली घालून त्यातले हवे असणारे रत्न हेरून ठेवणार होतो कारण सरांनी सांगितले होते उद्या फक्त आपला ग्रंथालय नजरेखाली घालायला ये. झाला एकदाचा तो क्षण आला मी ग्रंथालयात गेलो सर तिथेच होते त्यांनी नजरेने खूण करून मला पुस्तकरूप खजिना डोळ्याखाली घालण्याची परवानगी दिली. आणि मी अधाशासारखा त्याच्यावर तुटून पडलो. ती माझी वाचनाप्रती असणारी आसक्ती त्यांना जाणवली होती. माझी नजर एका २ बाय २ च्या एका पुस्तकावर खिळून होती. सरांनी ती हेरली होती ते पुस्तक होत सर्पांबद्दल त्याचं कारण ही तसचं होत थोडक्यात सांगायचे तर आमचं घर अगदी रानाच्या कडेला आणि गाव वस्तीच्या शेवटी होते त्याच्यामुळे या आमच्या घरात सर्प देवता दररोज म्हटलं तरी आशीर्वाद द्याला यायचे. आणि त्या वयात च बोबडी वळते म्हणजे काय याचा प्रत्यक्ष प्रत्यय मला आला होता. साप दिसला की मी त्याला साप न बोलता हाप बोलून घरातून बाहेर धूम ठोकायची. हे आता नित्याचं झाल होत म्हणून मला त्या सापांच्या पुस्तकाबद्दल कुतूहल म्हणा किंवा माहिती घेण्याची लालसा म्हणा या दोन्हीपैकी कोणत्या तरी भावनेने मी त्याच्याकडे टक लावून डोळ्यात साठवण्याचे प्रयत्न करत होतो. कारण हे येवढं मोठं पुस्तक मला आता भेटणं हे अगदीच अशक्य अशी गोष्ट होती. हे मला चांगलच ठाऊक होते पण दुसऱ्याच क्षणी सरांनी ते पुस्तक काढून खाली घेत माझ्या हातात दिलं आणि रजिस्टर मध्ये नाव नोंदवून स्वाक्षरी करण्यासाठी रजिस्टर माझ्या पुढे केले क्षणभर मी आवा क होत बघतच राहिलो. माझी अंगकाठी तशी बारीकच आहे आधीपासून आणि तेव्हा तर ते भलं मोठं पुस्तक खरचं माझ्या पेक्षा थोराड वाटत होत एखादी भली मोठी शिकार जिवाची पराकाष्ठा करत वाहून नेली जाते. तसचं काहीतरी माझ्यासोबत ते पुस्तक घरी आणताना होत होत. झालं एकदाची ती शिकार घरात आणून टाकली. आणि कपडे न काढताच हातपाय न धुता फराळाच्या ताटावर ताव मारतात तसा ताव मारायला बसलो. तेवढ्यात पाठीत सणसणीत कळ आली थोड्या वेळाने कळ विरळ होताच लक्षात आलं इस्त्रीचे कपडे न काढताच मी (नको ते काम करायला बसलो होतो.) म्हणून एक जोराचा धपटा माझ्या ताईने दिला होता. त्याला दुजोरा म्हणून आमची स्वारी रुसली उठून तडक छतावर चढून बसली. हा आमच्या घराचं छत माझ्यासारख्याला चढण्यासारख होत लहानपणापासून त्याची पण आवड होती झाडावर चढण्याची. मग जी पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे तिला माझी आजी अपवाद होऊ शकत नव्हती. म्हणून तिने घराच्या वंशाला दुसऱ्याच्या घराचा वेल वाढवणाऱ्या ताईने मला दिलेला प्रसाद तिचा उद्धार करत सुसमेद माझ्या आजीने तिला परत केला. आणि आमची कळी खुलली त्या रात्री शाळेचा गणवेश घालूनच मी झोपी गेलो कारण ते पुस्तक वाचण्यात माफ करा त्या पुस्तकातली सापांची चित्रे बघण्यात दंग होऊन कधी झोप लागली माझच मला कळलं नाही. जेवणाच विचाराल तर ते तस् नित्याच जरी नसले तरी अधूनमधून न जेवता मी रात्री झोपी जात असे त्यात काही वेगळेपण नव्हता. सकाळी उठल्यावर ताईने तंबी दिली कि आहे त्याचं गणवेशात शाळेत जायच कारण आजी शेतात निघून गेली होती. पण माझ्यावर त्याचा तितकासा परिणाम झाला नाही तस तर मला नेहमी माझा गणवेश व्यवस्थिरीत्या स्वच्छ धुवून इस्त्री केलेला हवा असे पण आज ती परंपरा मोडीत निघाली होती. कारण माझ्या हातात कुबेराचा म्हणजेच आमच्या कुंभार सरांचा पुस्तक रुपी खजिना हाती लागला होता. त्याच्यानंतर बरीच पुस्तके आठवी पर्यंत वाचून झाली होती राणी लक्ष्मीबाई कृष्णाचं एक पुस्तक. शेवटी शाळा बदलण्याची वेळ आली होती. मी ती शाळा सोडून हॉस्टेल ला जाणार होतो. साहजिकच भरून आलेल्या डोळ्यांबरोबर मनाने ही सराना निरोप दिला त्यांनीसुद्धा आपला एक आवडता पटशिष्याला द्यावा तसा मोलाचा सल्ला दिला. आणि पहिल्याच भेटीत येवढं मोठं आणि महागड आणि त्यात आठवीच्या खाली असणाऱ्या विद्यार्थ्याना परवानगी नसलेलं ते पुस्तक कसलाही विचार न करता देण्यामागच कारण सांगितले माझी वाचनाप्रती असणारी तळमळ त्यांना आवडली होती. आणि सांगितले होते आयुष्य तारून नेईल तेवढी ताकद यात आहे याची साथ सोडू नको. मान गंगेच्या तीरावर वसलेल्या त्या हॉस्टेल मध्ये दाखल झालो. ज्या मान गंगेने संभाजी महाराजांच्या क्रूर हत्त्या केल्यानंतर स्वराज्य संपवू पाहणाऱ्या औरंग्याच्या सेनेसह त्याचा एक पाय कायमचा अधू केला, ज्याच्या मुळे तो खंगुन महाराष्ट्राच्या भुमितच गाडला गेला होता. गाडगेबाबा सोबत असणारे गोंदवले बुद्रुक चे यशवंत माने बाबा यांचं ते हॉस्टेल.तिथे माने नावाचे सर भेटले पण आम्ही त्यांचा अगदीच आवडता नसला तरी थोडफार आवडता विद्यार्थी म्हणून भरपूर पुस्तकांचा फडशा पाडला. हे सर्व लिहिण्यामागचा प्रपंच येवढाच की आज मला माझ्या वर्गमित्रांकडून समजलं की कुंभार सर यांनी आपल्याला कायमचा निरोप दिला आहे. आणि योगायोग म्हणावा कि आणखी काय पण गेल्या आठवड्यापासून सह्याद्री बरोबर त्याच्यामध्ये सामावलेले महाराजांचे गडकोट सुट्टीच्या दिवसात पायाखाली घालणारा मी लॉकडाऊन मुळे घरातच अडकून पडलो आहे. घरात करण्यासारखा काहीच नाही म्हणून मोबाइल फोन चाळवत असताना त्याचा अतिरेक होतो आहे असे जाणवून कुंभार सरांचा उपदेश स्मरून छावा वाचायला घेतलं आहे. कारण दहावी झाल्यावर माझ्या गावी वाचन नव्हतच मुळी अशी माझी परिस्थीती झाली होती. आणि ठरवला होता पुढच्या महिन्यात गावी जाऊन दहावी नंतर पुस्तकाची साथ सोडल्या बद्दल सरांची माफी मागून त्यांना सांगणार होतो की आता मरेपर्यंत त्यांची साथ सोडणार नाही पण पुस्तकांशी गद्दारी केलेला मी अभागीच राहून गेलो...............

आदरपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

अमोल किर्तीकर

खूप दिवसांपासून याच्यावर लिहीन म्हणतोय पण योग आज आला  लोकसत्ता च्या निमित्ताने काही वर्षांपूर्वी आमच्याकडे नेहमी लोकसत्त...
01/03/2021

खूप दिवसांपासून याच्यावर लिहीन म्हणतोय पण योग आज आला लोकसत्ता च्या निमित्ताने काही वर्षांपूर्वी आमच्याकडे नेहमी लोकसत्ता वर्तमानपत्र वाचले जायचे त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टींचा विवेकबुद्धी वापरून अभ्यास करून सारासार विचार करून लेख लिहिले जायचे महत्त्वाच्या विषयांना प्रकाशझोतात आणण्याचा प्रयत्न असायचा मग ते मुखपृष्ठ असो किंवा इतर पाने आज खूप वर्षातून इलेक्ट्रॉनिक मीडिया ला कंटाळून अखेर आईने सांगितले जा रे बाबा जरा लोकसत्ता घेवून ये तसा मलापण खूप आवड होतीच वाचायची आणि एक ना एक पान वाचून काढण्याची मग ते माझ्या फायद्याचं असो किंवा नसो माहिती म्हणून सगळ्या वर्तमानपत्राचा फडशा पाडायचा च हा नियम होता पण आज लोकसत्ता घेतला आणि त्यांनी माझ्या गृहितकांचा फडशा पाडला😃 हे मुखपृषठावरील जाहिरात पाहून म्हणजे चार रूपडे दिले की झालं याचं काम दररोज माझ्या घरात माझं आईबरोबर या सीरियल वरती वाजतं daily soap ने सर्व महिलावर्गाला खरंच अक्षरशः धुवून काढल आहे त्यांचा मेंदू, कोणतीही नवीन मालिका आली की उठसूट एकाच धर्तीवर या मालिका असतात ते म्हणजे याच्या बायकोचं त्याच्या बरोबर लफड आणि तिच्या नवऱ्याचा अजून कुठं लफड नाहीतर मग आहेच आमच्या देव्या त्यांचा पुरेपूर वापर करून घेतला जातो मग या मालिका मध्ये कारण आपण भारतीय आहोत च भावनिक मग याच भावनेला थोडीशी टिचकी द्याची विषय संपला महाराजांच्या मालिका लागल्या किती महिला वर्ग त्या आवर्जून बघतात? एकतर यांची कल्पनाशक्ती संपत चालली आहे किंवा मग हा अजेंडा असावा कारण ज्या देशात महिला वर्ग आघाडीवर असतो तो देश आंतरराष्ट्रीय पातळीवर आघाडीवर असणारच हे झाल मालिकांचं पण आता यात वर्तमानपत्र पण अशी भूमिका घेत आहेत लोकशाहीचा चौथा स्तंभ असतात ना हे? म्हणून जरा वाईट वाटलं आजच्या च लोकसत्ता मध्ये बातमी आली इस्रो ने 19 ग्रह प्रक्षेपित केले खरे, पण त्यातल्या एका ग्रहावर मोदींचं चित्र म्हणजे काय असं महत्वाच योगदान आहे यांचं, साराभाई कलाम धवन यांनी काहीच नाही केलं? याच प्रसंगावरून मला एका थोर विभूति ची आठवण येते ते म्हणजे आपले सर्वांचे लाडके संत गाडगे महाराज गाडगे बाबा या माणसाने स्वतःच्या मुलाला स्वतः बांधलेल्या वसतिगृहात रहण्यावरून खडे बोल सुनावले होते आणि इथं सत्ता हातात आहे तर अगदी अंतराळात जाणाऱ्या ग्रहावर "थेट" स्वतःच चित्र लावलं "शेट" नी या देशात हेचं तर चालत आलेला आहे परंपरेने. जो दिखता है वही बिकता है लिखाण पण आश्याच शेट लोकांनी केलं आहे प्राचीन काळापासून च कारण अधिकार फक्त ठराविक वर्गाला च होता त्याचा नाही का? म्हणून तर जे लिहिलं आहे आधी तेचं प्रमाण मानलं जातं हे म्हणजे असं झालं monopoly सारखं आमची कुठेही शाखा नाही जे काय हवं ते इथून च घ्यावं लागेल 😂😂😂 असो मी मोदी मामा चा उपदेश पाळायचा ठरवल आहे तो म्हणजे आत्मनिर्भर होण्याचा कळतं किंवा नकळत त्यांनी सांगून टाकलं आहे तुमचं तुम्ही बघा आमच्यावर भरोसा ठेवू नका ते कायतरी आहे ना मराठीत जो दुसऱ्यावरी विसंबला। त्याचा पार्श्वभाग बुडाला😜 माफी असावी त्याचा कार्यभाग बुडाला। म्हंटला येवढं सरळ वाचायची लोकांना सवय नाही आजकाल या मालिकालोकप्रियतेमुळे म्हणून जरा गुगली टाकली तेवढं च मनोरंजन चा कार्यभाग साधून घ्यावा म्हंटले कसे शिंचानो आपला अभिप्राय द्यावा🤪😂

Address

Dadar
Mumbai
400014

Alerts

Be the first to know and let us send you an email when True Ant Wanderer posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share