Your Quota

Your Quota Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Your Quota, Mulher.

24/12/2024

#शेतकरी बाप #

उभ्या जगाचा पोशिंदा
माझा शेतकरी बाप
ओढी संसाराचा गाडा
सोसे ऊन वारा ताप...!!धृ!!

सपान उराशी बांधुन
काळ्या मातीत पेरतो
वाट पावसाची पाहुन
जीव कासावीस होतो...!!धृ!!

नाही अंगाला कपडे
खातो चटणी भाकर
डोहिवर हा डोंगर
नाही कुणाचा चाकर....!!धृ!!

ऊन पाऊस वाऱ्यात
किती झेलतो उन्हाळे
तुझ्या घामाने फुलले
सारे हिरवेगार मळे....!!धृ!!

जीव लावुन करितो
काळ्या आईची सेवा
तहान पिकांची भागवितो
करी दिनरात सेवा...!!धृ!!

पिक डोले आनंदाने
कणसे मोत्याने भरले
सपान हिरव्या रानाचे
पाहुनी मन फुलले...!!धृ!!

मोठ्या मनाचा तू राजा
उभ्या जगाचा पोशिंदा
शेतकरी अन्नदाता
माझा शेतकरी बाप...!!धृ!!

#शुभांगी बोरसे (पिंगळे) ✍️
मुल्हेर ता.बागलाण नाशिक

#माझीलेखणी✍️ quote #किसानदिनशुभेच्छा #शेतकरीराजा # # #₹ #

साल्हेर हा महाराष्ट्र राज्यातील सह्याद्री पर्वत रांगेतील सर्वात उंच किल्ला आहे.साल्हेर-मुल्हेर या जोडीतला हा साल्हेरचा क...
16/12/2024

साल्हेर हा महाराष्ट्र राज्यातील सह्याद्री पर्वत रांगेतील सर्वात उंच किल्ला आहे.

साल्हेर-मुल्हेर या जोडीतला हा साल्हेरचा किल्ला असून हा किल्ला नाशिक जिल्ह्यात आहे. नाशिक जिल्हा हा महाराष्ट्रातील गिरिदुर्गांच्या बाबतीत अतिशय संपन्न वैभवशाली आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये ५७ गिरिदुर्ग आहेत. या गिरिदुर्गामध्ये महाराष्ट्रातील सर्वात उंच असा साल्हेरचा किल्ला येतो.

नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागामध्ये बागलाण हा प्रांत असुन तो सध्या सटाणा या तालुक्यामध्ये समाविष्ट झालेला आहे. नाशिक जिल्ह्यामधील सर्वांत जास्त किल्ले सटाणा तालुक्यातच आहेत.

या किल्ल्यांना ऐतिहासिक वारसा असणारे तसेच साल्हेर ची सुजलाम सुफलाम स्वर्गाहून सुंदर असणारी भुमी तसेच शूरवीर व पराक्रमी मराठयानी जिंकून घेतलेली , परुशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजेच साल्हेर भुमी ,किल्ला.

१६७२ साली नाशिक जिल्ह्यातील साल्हेर येथे झालेली #साल्हेरची_लढाई # . मुघल साम्राज्य व मराठा साम्राज्यांमध्ये झालेल्या लढाईत मराठ्यांचा निर्णायक विजय झाला,पण आनंदाच्याबरोबर युद्धातील विजय दुःख घेऊनच येतो. या युद्धात महाराजांचा एक अत्यंत आवडता, शूर जिवलग #सूर्याजी काकडे # हा शहीद झाला. महाराजांना अपार दुःख झाले. त्यांच्या तोंडूनउद्गार बाहेर पडले, ' "माझा सूर्याराऊ पडिला. तो जैसा महा भारतातील कर्ण होता.

सरनौबत प्रतापराव गुजर आणि पेशवे मोरोपंत पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी मुघलांविरुद्ध खुल्या मैदानावर मिळवलेला हा पहिला विजय होता....₹ # # #साल्हेर #कोकणप्रवास #गिरिदुर्ग
# #

 #सर्जा_राजा🐂 #सर्जा राजाच्या जोडीनेवाडा शीवार भरलंमा शेतकरी  बापाचंत्यानं सपान रंगवलंत्याच्या अपार कष्टानंबहरली सारी भु...
04/09/2024

#सर्जा_राजा🐂 #

सर्जा राजाच्या जोडीने
वाडा शीवार भरलं
मा शेतकरी बापाचं
त्यानं सपान रंगवलं

त्याच्या अपार कष्टानं
बहरली सारी भुई
हिरव शेत पाहुनी
मन मोहरुन जाई

माझ्या काया शेतामधे
त्यानें ढेकुळ तुडवली
ऊन वारा पावसात
त्यानें काया झिजवली

बैलपोळ्याच्या सणाला
होई आनंद धन्याला
साऱ्या गावात मिरवून
गोड नैवेद्य राजाला

#शुभांगी_म_बोरसे_पिंगळे # ✍️
मुल्हेर बागलाण नाशिक

Address

Mulher

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Your Quota posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share