माझा सिंधुदुर्ग

माझा सिंधुदुर्ग This page dedicated to explore food, culture, festivals, history, tourism, pramote malvani language, unexplored nature spots of Sindhudurg…🚩

15/06/2025

आपल्या हक्काच्या व्यासपीठावर आपले स्वागत आहे, माझा सिंधुदुर्ग हे पेज आता नव्याने आपण एकत्र एक्सप्लोर करूया, आपल्याला आपल्या जिल्ह्यातील खाद्य संस्कृती, सण, पर्यटन स्थळे, ऐतिहासिक ठिकाणे, इतिहास, दुर्मिळ पर्यटन स्पॉट्स, निसर्गसौंदर्य या बाबतीतील फीड्स या पेज वर सतत मिळत राहतील …

🛑🛑*ब्रेकिंग न्यूज*🛑🛑*शिवरायांच्या पुतळ्यात पुन्हा भ्रष्टाचार; राजकोट स्मारकाच्या चबूतऱ्याला भलेमोठे भगदाड*भ्रष्ट शासनाचा...
15/06/2025

🛑🛑*ब्रेकिंग न्यूज*🛑🛑
*शिवरायांच्या पुतळ्यात पुन्हा भ्रष्टाचार; राजकोट स्मारकाच्या चबूतऱ्याला भलेमोठे भगदाड*
भ्रष्ट शासनाचा जाहीर निषेध 🏴🏴🏴🏴🏴
१५ जून: मालवण
मागच्या पावसात मालवण राजकोट येथील छत्रपतींचे स्मारक नित्कृष्ट कामामुळे पडले महाराष्ट्रभर त्याचे पडसाद उमटले त्यानंतर हल्लीच नव्याने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झालेले मालवण राजकोट येथील छत्रपतींचे स्मारक चबूतऱ्या ला चिर पडले बाजूलाच भले मोठे खोल भगदाड, राजकोट मालवण नवीन स्मारकात पुन्हा एकदा भ्रष्टाचार उघड पाया अतिशय कमकुवत असल्याचे पडलेल्या भगदाड मध्ये स्पष्ट दिसून येत आहे,कंत्राटदार आणि पुढाऱ्यांनी पुन्हा या प्रकरणात गांभीर्य न बाळगता मोठा भ्रष्टाचार केल्याचे स्पष्ट होत आहे, समोरच छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला ३५० वर्षापासून भक्कम समुद्राच्या रुद्रावतारात सुद्धा पाय रोवून अभेद्य उभा आहे आणि आताच्या राजकारणी आणि काँट्राक्टरांना वर्षभर पण स्मारके उभी ठेवायला जमत नाहियेत ही शोकांतिका आहे भ्रष्ट शासनाचा आणि कंत्राटदाराचा जाहीर तीव्र निषेध 🏴🏴🏴🏴🏴

26/02/2020
22/07/2019

पवार अध्यक्ष असलेली संस्था, प्रश्न सोडवला ठाकरेंनी

सदर महाविद्यालय हे रयत शिक्षण संस्थेचे असल्याची माहिती आहे. सदर शिक्षणसंस्थेचे अध्यक्षपद हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे आहे. तरीही या महाविद्यालयाची समस्या इतकी वर्षे का सोडवली गेली नाही हा प्रश्न अनुत्तरित आहे. आदित्य ठाकरेंनी मात्र हि समस्या समजताच केवळ १० मिनिटात ती सोडवण्यासाठी ऍक्शन घेतल्याने संस्था पवारांची,प्रश्न सोडवला ठाकरेंनी अशी चर्चा नगर परिसरात रंगली आहे.

19/06/2019

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो युवक गोवा या राज्यात नोकरीसाठी जातात काही युवक तर रोज येऊन जाऊन करतात हा लांब पल्याचा प्रवास करणे म्हणजे धोकादायक आहे परंतु सिंधुदुर्ग जिल्हामध्ये रोजगार मिळण्याची काहीच सुविधा नाही यासाठी पोटा-पाण्या साठी गोवा या राज्यात जाऊन येऊन करावं लागतं. गेल्या काही वर्षात सिंधुदुगातील युवकाचे खूप मोठया प्रमाणावर अपघाती निधन झाले तर काही युवक आपले हात पाय गमावून घरी बसले आहेत यावर कुठच्या राजकीय पक्षाने विचार केला नाही निवडणुका आल्या की फक्त तोंडाची आवाजी असते मग पुन्हा त्यावर पाणी , कधी सरकारने पण यावर कधी विचार केला नाही.
रत्नागिरी जिल्यात रोजगार आहेत कमी प्रमाणात का होईना आहे मग सिंधुदुर्गला का नाहीत रत्नागिरीच्या विचार करता सिंधुदुर्गात एकही midc सद्यस्थिती चालू नाही याचा कुठच्या राजकीय पक्षाने विचार केला नाही किंवा सरकार मध्ये मंत्री च्या खुर्चीवर बसून तो विचार केला नाही, *फक्त निधी आणायचा आणि तो खर्च करायचं मग झाला विकास शहर सुंदर दिसल म्हणजे झाला विकास* त्यात राहणारे युवक नोकरीसाठी गोवा राज्यात जातात त्यांना हे पण ठाऊक असत जातोय ते पुन्हा व्यवस्तीत घरी पोहचू की नाही. सगळं काही देवावर सोडून ये-जा करायची असेल देवाची साथ तर येऊ घरी नाहीतर?
*सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास झाला ती फक्त डोळ्याने दिसतोय युवकांच्या दृष्टीने 10 टक्के पण विकास झाला नाही याचं दुःख होतंय आम्हांला कधी संपणार सिधुदुर्गातील युवकांच्या हाल, की होणारच नाही विकास* ? आयुष्यभर पिढ्यान पिढ्या असाच चालवत राहायचं. का नाही आणू शकत तुम्ही कंपन्या सिंधुदुर्गात , सिंधुदुर्गातील काही लोकप्रतिनिधी ची तर मोठं मोठया कंपन्यांच्या मालकांशी चांगले मैत्रीचे संबंध देखील आहेत मग अडतय कुठे! की कंपन्या आणून त्यांना पाहिजे तस सुविधा उपलब्ध नाहीत म्हणून येत नाही तस असेल तर मग सिधुदुर्गाचा विकास केला तो तर काय विकास केला सांगावा याच उत्तर लोकप्रतिनिधी नि द्यावं .
सिंधुदुर्गात आता विमानतळ झालाय याचा फायदा कोणाला लोकप्रतिनीधीना मंत्र्यांना . काही पण करा रोजगार दाखवा , हा रोड झाला हा फायदा होणार इकडे विमानातळ झालं की जाणे येणे सोपं होणार हे जे बोंबलून दाखवतात ते आपल्या विषयी बोलत असतात आपल्या सुख सोईचा विचार करतात हे लक्षात घायला पाहिजे , युवक वर्गाला नोकरीसाठी जावच लागत पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी , मुंबई, आणि गोवा ते पण अश्या राज्यात ज्या राज्याने महाराष्ट्राला वैद्यकीय सेवा पण द्यायला नकार दिला जस की आम्ही महाराष्ट्रातील खास करून सिंधुदुर्गातील जनता म्हणजे बोज आहोत आणि हे बरोबर पण आहे या जिल्ह्यातील लोक वैद्यकीय उपचारासाठी जातात गोव्यात नोकरीसाठी जातात गोव्यात एक वैद्यकीय हॉस्पिटल पण बांधता आलं नाही?फक्त पैसा सगळा गार्डन सुधारण्यात गेला मग विकास झाला तो नक्की झाला तरी काय असा प्रश्न आम्हालाच पडलाय , मला हे कळत नाही की आम्ही मूर्ख की आम्हाला सांगतात हा विकास केला तो विकास केला ते मूर्ख ?
माझा युवक मित्रानु आता काही तरी झालच पाहिजे असच राहिलो तर जे आहे तसच चालू राहणार व विकासाच्या नावावर आम्हाला मूर्ख बनवणार आता ज्या निवडणुका लागल्यात आहेत त्या आधी आपल्या जिल्ह्यात ठामपणे व ठोसपणे कोणत्याही पक्षाचा प्रतिनिधी दाखवून देत नाही की येणाऱ्या वर्षात या कंपन्या जिल्ह्यात येथील व एवढ्या लोकांना रोजगार मिळेल तो पर्यंत आपण जिल्हावासीयांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकल्या खेरीज पर्याय नाही आणि माझी ही पण विनंती आहे पैशाच्या आहारी जाऊन तुमचं मत विकू नका जे दिसतंय जे पाहिजे त्यासाठी झटायला हवंय त्या शिवाय काहीच होणार नाही असेच भरडत राहणार .
*सिंधुदुर्गातील युवक*

💐💐🙏💐💐
01/05/2019

💐💐🙏💐💐

महाराष्ट्र दिनासोबतच आज सिंधुदुर्ग दिन सुद्धा आहे..1 मे 1981 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याची अधिकृत घोषणा झाली.सिंधुदुर्ग जिल...
01/05/2019

महाराष्ट्र दिनासोबतच आज सिंधुदुर्ग दिन सुद्धा आहे..
1 मे 1981 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याची अधिकृत घोषणा झाली.

सिंधुदुर्ग जिल्हा
अंगावर आदळणाऱ्या असंख्य लाटा झेलत आणि छत्रपती शिवरायांच्या असामान्य कर्तृत्वाची साक्ष देत व शिवकालीन इतिहासाच्या देदीप्यमान आठवणी काढीत जलदुर्ग-सिंधदुर्ग-अरबी समुद्रात ताट मानेने उभा आहे. मराठ्यांचा उज्ज्वल इतिहास सिंधुदुर्गच्या रूपाने जणू समुद्राच्या लाटांवरच चितारलेला आहे- साकारलेला आहे. या सिंधुदुर्गचे नावच या जिल्ह्याने धारण केले आहे.

महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावर अजिंक्य असा जलदुर्ग असणे आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन शिवछत्रपतींनी कुरटे बेटावरील सुमारे पन्नास एकर क्षेत्रावर या दुर्गाची उभारणी केली. १० नोव्हेंबर १६६४ रोजी किल्ल्याचे बांधकाम सुरू केले गेले, ते तीन वर्षे अहोरात्र चालूच होते. शिवरायांची दूरदृष्टी इतक्यावरच थांबली नाही, तर पद्मगड, भगवंतगड, सर्जेकोट, भरतगड आदी लहान-मोठे किल्ले सिंधुदुर्गच्या परिसरात बांधून त्यांनी सिंधुदुर्गल अभेद्य बनविले. महाराष्ट्रातील एकमेव असे. ‘शिवछत्रपती मंदिर’ या किल्ल्यात आहे. हे मंदिर छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधले आहे.
विविध क्षेत्रांत आपल्या तेजाने तळपणारी अनेक नररत्ने या जिल्ह्याने राज्यास दिली. उक्ती आणि कृती यांमध्ये एकवाक्यता असणारे थोर समाजसुधारक रा. गो. भांडारकर, कोकणचे गांधी अप्पासाहेब पटवर्धन, र. के. खाडीलकर, बॅरिस्टर नाथ पै यांसारखी नररत्ने म्हणजे याच जिल्ह्याने आपणास दिलेली देणगी होय !

मुख्य ठिकाण : ओरोस बुद्रुक तालुके : सात
क्षेत्रफळ : ५,२०७ चौ.कि.मी. लोकसंख्या : ८,३२,१५२

इतिहास :
छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. भगवान श्रीकृष्ण कालयवन या द्रवीड राजास द्वारकेहून हुलकावणी देत देत मुचकुंद राजाच्या गुहेत (सह्याद्रीत ) गेले व कालयवनाचा वध झाल्यानंतर या जिल्ह्याच्या उत्तरेकडून घाट उतरून करवीरला गेले, अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे. रामायणातही या प्रदेशाचा उल्लेख आढळतो.
या जिल्ह्याचा प्राचीन इतिहास थोडाबहुत स्पष्ट करणारे काही शिलालेख अलीकडील काळात सापडले आहेत. वेंगुर्ल्याजवळ मठ या गावात शके १३९७ मधील शिलालेख उपलब्ध मिळाले आहेत. याशिवाय कुणकेश्वर, आजगाव व सातार्डे आदी ठिकणी काही शिलालेख मिळाले आहेत. नेरूर येथे सापडलेल्या चालुक्यकालीन शिलालेखावऊन प्राचीन काळी या परिसरात चालुक्यांची सत्ता नांदली असावी, असे अनुमान काढता येते.
मराठ्यांपूर्वी या परिसरात काही काळ आदिलशाही राजवटही अस्तित्वात होती. आदिलशाही राजवटीत उभारल्या गेलेल्या काही वास्तू याची साक्ष देतात. स्वातंत्र्य चळवळीतही या जिल्ह्याने मोलाची कामगिरी बजावली आहे. १९३० मध्ये शिरोडे येथे झालेला मिठाचा सत्याग्रह व १९४२ च्या आंदोलनात जिल्ह्याने घेतलेला सहभाग इतिहासास ज्ञात आहे.
कोकण विभागातील दक्षिण प्रदेशाच्या औद्योगिक व कृषिविकास जलदगतीने व्हावा, म्हणून मूळच्या रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करण्यात येऊन १ मे १९८१ रोजी महाराष्ट्र दिनाच्या सुमूहुर्तावर सिंधदुर्ग हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला.

स्थान :
महाराष्ट्राच्या पश्चिम किनरपट्टीवरील अगदी दक्षिणेकडील जिल्हा. पूर्वेस सह्याद्री पर्वताच्या रांगा व त्यालगत कोल्हापूर जिल्हा. पश्चिमेस अरबी समुद्र. दक्षिणेस गोवा व कर्नाटक राज्य. उत्तरेस रत्नागिरी जिल्हा.
पश्चिमेस अरबी समुद्र, उत्तरेस शुक नदी, पूर्वेस सह्याद्री रांगा व दक्षिणेस तेरेदेखोल नदी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याची नैसर्गिक सीमा स्पष्ट केली आहे. या जिल्ह्यास सुमारे १२१ कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगलता आकारमानाचा विचार करता सिंधुदुर्ग जिल्हा राज्यातील सर्वात लहान जिल्हा आहे, असे म्हणता येईल. राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या १.७० टक्के इतके अत्यल्प क्षेत्र य जिल्ह्याच्या वाट्यास आले आहे.

तालुके :
(१) कणकवली (२) कुडाळ (३) सावंतवाडी (४) वेंगुर्ले (५) मालवण (६) देवगड (७) वैभववडी. एकूण तालुके सात.

प्राकृतिक रचना :
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पश्चिमेकडील किनारी भागापासून जसजसे पूर्वेकडे जावे तसतशी समुद्रसपाटीपासूनची जमिनीची उंची वाढत जाते. किनाऱ्यालगत अतिशय सखल व सपाट असा प्रदेश पसरलेला आहे. याला ‘खालाटी’ अथवा ‘किनारी प्रदेश’ असे म्हटले जाते. सखल-मैदानी प्रदेशाचा उत्तर-दक्षिण लांबी असलेला हा एक अरुंद पट्टा आहे. देवगडा मालवण तालुक्यांचा पश्चिम भाग व बहुतांश वेंगुर्ले तालुका या पट्ट्यात येतो.
खालाटी अथवा किनारी प्रदेशाला लागून डोंगराळ प्रदेशाच्या पायथ्याशी असलेला जो काहीसा सपाट पट्टा लागतो, त्याला ‘वलाटी’ अथवा ‘पठारी प्रदेश’ असे म्हणतात. देवगड व मालवण तालुक्यांचा पूर्व भाग आणि कणकवली, कुडाळ व सावंतवाडी या तालुक्यांचा पश्चिम भाग या विभागात मोडतो. वलाटी अथवा पठारी प्रदेशाच्या पूर्वेकडे सह्याद्रीच्या डोंगररांगाचा बऱ्याचशा उंचवट्याचा व दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश पसरलेला आहे. वैभववाडी, कणकवली, कुडाळ व सावंतवाडी या तालुक्यांचा पूर्वभाग या विभागात समाविष्ट होतो. या डोंगराळ भागातून पूर्वेकडे देशावर उतरण्यासाठी भुईबावडा, करुळ, फोंडा, आंबोली असे अनेक घाट आहेत. या जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यात जाण्यासाठी आंबोली, करूल किंवा फोंडा घाट पार करावा लागतो. रत्नागिरी जिल्ह्यात जाण्यासाठी राजापूरची घाटी उतरावी लागते. या प्रदेशात शिवगड, मनोहरगड यांसारखे प्रमुख दुर्ग वसले आहेत.

मृदा :
दमट हवामानामुळे व अतिवृष्टीमुळे दीर्घकालीन प्रक्रिया घडून बेसॉल्ट खडकापासून जांभा खडक तयारत होतो. जिल्ह्यातील बहुतांश जमीन अशा प्रकारच्या जांभा खडकापासून तयार झालेली आहे. अतिवृष्टी व दमट हवामान यांमुळे बेसॉल्ट खडकातील सिलिका, कॅल्शियम व मॅग्नेशियम आदी घटकांचा विनाश होतो. परंतु लोहाचे प्रमाण मात्र अधिकच राहाते. त्यामुळे मृदेचा रंग तांबूस-तपकिरी असतो. जिल्ह्यातील बहुतांश मृदा अशा प्रकारची आहे. डोंगर‍उतारावरील माती व गाल वाहात येऊन त्याचे संचयन झाल्याने समुद्रकिनाऱ्यावरील मृदा पोयतायुक्त आहे. समुद्र-सान्निध्यामुळे ही मृदा क्षारयुक्तही आहे.

हवामान :
समुद्रसान्निध्यामुळे जिल्ह्याचे हवामान सम, उष्ण व दमट आहे. समुद्रकिनारा जवळ असल्याने उन्हाळ्यात तापमानात खूप वाढ नाही, तसेच हिवाळ्यातही तापमान खूप खाली येत नाही. तथापि, समुद्रकिनाऱ्यापासून जसजसे पूर्वेकडे जावे तसतसे हवामान किंचितसे कोरडे व विषम होत जाते. जिल्ह्यात सरासरी २७५ से.मी. इतका पाऊस पडतो. सावंतवाडी तालुक्यातील सह्याद्री पर्वतरांगांत वसलेल्या ‘आंबोली’ या ठिकाणी राज्यातील सर्वाधिक पावसाची (७४८ से.मी.) नोंद होते. एवम, हा जिल्हा भरपूर पावसाचा जिल्हा असून जिल्ह्यातील एकही तालुका अवर्षणप्रवण क्षेत्रात मोडत नाही.

नद्या :
जिल्ह्यातील बहुतेक नद्या पूर्वेकडील सह्याद्री पर्वतरांगाम्तून उगम पावून पश्चिमेकडे वाहात जातात व जवळच असलेल्या अरबी समुद्रास मिळतात. जिल्ह्याची पूर्व-पश्चिम रुंदी कमी असल्याने साहजिकच, या नद्या कमी लांबीच्या आहेत. उताराच्या व डोंगराळ प्रदेशामुळे य नद्या उथळही आहेत. शुक नदी सह्याद्रीत उगम पावून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून तर रत्नागिरि जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून वाहात जाऊन विजयदुर्गच्या खाडीत अरबी समुद्रात मिळते. वेगळ्या भाषेत सांगावयाचे तर या नदीच्या मुखाशी विजयदुर्गची खाडी तयार झाली आहे, असेही म्हणता येईल. जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून होणारा हिचा प्रवास साहजिकच, उत्तरेकडील वैभववाडी, कणकवली व देवगड या तालुक्यांच्याही उत्तर सीमेवरून होतो. देवगड नदी सह्य पर्वतरांगांत उगम पावून वैभववाडी तालुक्याच्या दक्षिणसीमेवरून वाहात जाऊन कणकवली तालुक्यात प्रवेश करते. तिच पुढील प्रवास कणकवली व देवगड तालुक्यांचा मध्यातून होतो. पुढे ही अरबी समुद्रास मिळते. हिच्या मुखाशी तयार झालेली खाडी ‘देवगडची खाडी’ म्हणून ओळखली जाते. आचरा नदी कणकवली व देवगड तालुल्यांमधून पूर्व-पश्चिम अशी वाहाते. या नदीच्या मुखाशीही छोटीशी खाडी तयार झाली असून ती ‘आचाऱ्याची खाडी’ म्हणून ओळखली जाते. आचरा नदीला बहुतांशी समांतर अशी गडनदी कणकवली व मालवण तालुक्यांमधून वाहाते. या नदीच्य मुखाशी कालावलीची खाडी आहे.
कर्ली व तिची उपनदी काली कुडाळ तालुक्यातून वाहात गेल्या आहेत. कर्ली नदीच्या मुखाशी ‘कर्लीची खाडी’ आहे. तेरेदेखोल ही जिल्ह्यातील एक प्रमुख नदी असून ती सावंतवाडी तलुक्यात सह्य पर्वताच्या डोंगराळ भागात आंबोली घाटाजवल उगम पावते. हिचा सुरुवातीचा प्रवास काहीसा ईशन्येकडून नैऋत्येकडे असा होतो. नंतर ती जिल्ह्याच्या दक्षिणे सीमेवरून पश्चिमेकडे वाहात जाऊन पुढे गोवा राज्यात प्रवेशते. काही अंतर तिने सिंधुदुर्ग जिल्हा व गोवा राज्याची सीमा निश्चित केली आहे. कळणा व तिल्लारी या नद्या जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातून वाहात जाऊन गोवा राज्यात प्रवेशतात. पुढे गोवा राज्यात त्यांचा संगम होतो.

धरणे :
तिल्लारी नदीवर कोल्हापूर जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या तिल्लारी प्रकल्पाचा लाभ या जिल्ह्यास होतो. कुडाळ तालुक्यात कर्ली नदीवर उभारण्यात येणारा ‘ताळंबा’ हा जिल्ह्यातील महत्त्वाचा प्रकल्प होय. जिल्ह्याची एकूण भौगोलिक रचना लक्षात घेता कणकवली तालुक्यातील घोणसरी येथील धरणाचा अपवाद वगळता जिल्ह्यात मोठी धरणे नाहीत. जिल्ह्यात पाट, धामापूर, खांबाळे, रेडी, आदी ठिकाणी तलाव असून नावळे, कोकिसरे, नाधवडे, ओसरगाव, वरवडे, हरकूळ, माडखोल, वाफोली इत्यादी ठिकाणी नद्यांवर छोटेसे बंधारे उभारण्यात आले आहेत.

पिके :
कृषिप्रधान जिल्हा. भात हे जिल्ह्यातील प्रमुख पीक. सावंतवाडी, कुडाळ, माळवण, कणकवली हे तालुके भाताच्या उत्पादनाच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे होत. रागी किंवा नाचणी, वरी, कुळीथ ही जिल्ह्यातील अन्य प्रमुक अन्नधान्य पिके होय.

गेल्या तीन शतकांहून अधिक काळ सावंतवाडी हे ठिकाण लाकडी रंगीत खेळण्यांसाठी प्रसिद्ध आहे. लाकडी रंगीत फळे, गंजिफा व लाखेच्या वस्तू यांच्य निर्मितीचेही सावंतवाडी हे परंपरागत केंद्र आहे.

फळांच्या उत्पादनासाठी उत्पादनासाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रसिद्ध आहे. नारळ, सुपारी, आंबा, काजू ही जिल्ह्यातील प्रमुख फलपिके होत. जिल्ह्याच्या किनारी भागात नारळाची व सुपारीची झाडे भरपूर आहेत. नारळाच्या झाडाला ‘माड’ असे, तर सुपारीच्या ‘पोफळी’ असे संबोधले जाते. देवगढ व वेंगुर्ले हे तालुके आंब्याच्या उत्पादनासाठी, तर सावंतवाडी व वेंगुर्ले हे तालुके काजूच्या उत्पादनसाठी प्रसिद्ध आहेत. देवगड तालुक्यातील हापूस आंब्यास देशात व विदेशात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. याशिवाय रातांबी (कोकम), फणस, जांभूळ वगैरे फळझाडेही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहेत.

खनिजे :
खनिज संपत्तीचा विचार करता समृद्ध जिल्हा. वेंगुर्ले तालुक्यात रेडी येथे लोह खनिज मोठ्या प्रमाणावर सापडते. सावंतवाडी तालुक्यातील डिंगणे, नेतर्डे, सासोली तसेच कणकवली खनिज म्हणजे इल्मेनाइट. हे खनिज किनाऱ्यावर अनेक ठिकाणी आढळते. कोमाईट हे जिल्ह्यातील आणखी एक महत्त्वाचे खनिज. कणकवली तालुक्यात कोमाईटचे साठे मोठ्या प्रमाणावर आढळतात. सावंतवाडी तालुक्यात आंबोली घातमाथ्यावर बॉक्साईटचे मोठे आहेत. कणकवली व कुडाळ तालुक्यात अभ्रकाचे साठे आहेत. वेंगुर्ले तालुक्यात रेडी येथे लोह-खनिजाच्या खाणी आहेत.
याशिवाय फोंडा घाटाच्या नैऋत्यकडील परिसरात तसेच हनुमंत घाटाच्या क्षेत्रात चुनखडीचे साठे आढळतात. मालवण बंदराच्या पूर्वेस कुंभारमाठजवळ चिकणमाती सापडते. या मातीचा उपयोग मातीची भांडी व कौले तयार करण्यासाठी होतो. सावंतवाडी कुडाळ, वेंगुर्ले तसेच मालवण किनाऱ्यावर बऱ्याच ठिकाणी विविध रंगछटाचा ‘गेरू’ सापडतो. त्याचा रंगनिर्मितीसाठी उपयोग होतो. मालवण, कणकवली, कुडाळ व वेंगुर्ले या तालुक्यात ‘शिरगोळा’ हा दगड सापडतो. या दगडाचा उपयोग रांगोळी तयार करण्यासाठी होतो.

मत्स्यव्यवसाय :
जिल्ह्याला १२१ कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून जिल्ह्यात लहानमोठ्या १८ खाड्या आहेत. साहजिकच, मत्स्यव्यवसाय हा येथील एक महत्त्वाचा आर्थिक व्यवसाय ठरला आहे. देवगड तालुक्यात मीठबाव येथे व मालवण तालुक्यात तारकर्ली येथे मत्स्यव्यवसायाचे शिक्षण देणाऱ्या शाळा आहेत. जिल्ह्यात मासेमारीसाठी यांत्रिक नौकांचा व गिल-नेटिंग, पासिंग-नेटिंग यासारख्या प्रगत तंत्रांचा मोठ्या प्रमाणावर अवलंब केला जात. महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यात जमसांडे (देवगड) येथे उभारण्यात आला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी खाजण जमिनीत कोळंबी संवर्धनाचे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. एकूणच जिल्हा चंदेरी क्रांतीच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत आहे. जिल्ह्यात शिरोडे व मालवण येथे मिठागरे आहेत.

वने :
जिल्ह्याच्या पूर्व भागात सह्य पर्वतरांगांच्या पायथ्याशी दाट वने आहेत. या वनांमध्ये साग, ऐन, खैर, शिसव हे वृक्ष मोठ्यावर प्रमाणावर आढळतात. सोनचाफा व सुरंगी यांसारखे फूलझाडेही येथील वनांत मोठ्या प्रमाणावर आहेत.
येथील वनांमध्ये वाघ, बिबट्या, गवा, सांबर, भेकर, तरस, ससा यांसारखे प्राणी तसेच मोर, रानकोंबडा, साकोत्री, होला यांसारखे पक्षी आढळतात.
हिरडा, बेहडा यांसारखी वनौषधे व मध ही येथील प्रमुख वनोत्पादने होत. फोंडा घाटातील मध सुप्रसिद्ध आहे.

किल्ले :
सिंधुदुर्ग ह जिल्ह्यातील महत्त्वाचा जलदुर्ग. हा कुरटे बेटावर बांधण्यात आला आहे. तिन्ही बाजूंनी तट असलेला विजयदुर्ग हा किल्ला देवगड तालुक्यात आहे. पद्मदुर्ग हा तटबंदीवजा बालेकिल्ला सिंधुदुर्गच्या प्रवेशद्वाराशी पूर्वेस सुमारे दोनशे मीटर अंतरावर खडा आहे. कुडाळ तालुक्यातील कार्यातनारूर येथील रांगणा किल्ला, याच तालुल्यातील शिवापूरजवळचा मनोहरगड, मालवण तालुक्यातील रामगड, शिरोडे-रेडी जवळच्या यशवंतगड हे जिल्ह्यातील महत्त्वाचे अन्य किल्ले होत.

उद्योगधंदे :
कुडाळ व सावंतवाडी तालुक्यातील माजगाव येथे सहकारी औद्योगिक वसाहती असून कणकवली येथे कोकण महामंडळाशी छोटी औद्योगिक वसाहत आहे. जिल्ह्यात कोकण गॅस, मेल्ट्रॉन, पावडर मेटल, सुंदर स्टील, सह्याद्री ग्लास, बायमन गार्डन, कोकण मिनरल्स, महाराष्ट्र मिनरल्स आदी उद्योग उभे राहिले आहेत.
वेंगुर्ले व मालवण परिसरात काजूबियांपासून काजूगर काढण्याचे अनेक छोटे-मोठे कारखाने आहेत. आंबे भरण्यासाठी लागणाऱ्या करंड्या-पेट्या वा खोकी बनविण्याचे उद्योग देवगड व वेंगुर्ले या तालुक्यांत उभे आहेत.अ वेंगुर्ले, आरोटे, वालावल, मालवण या ठिकाणी नारळाच्या सोडण्यापासून काथ्या बनविण्याचे व या काथ्यापासून ब्रश, दोरखंड, पायपुसणी आदी वस्तू बनविण्याचे कारखाने आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोलची खाडी हे राज्याचे व कोकण किनारपट्टीचेही अगदी दक्षिणेकडील टोक होय. या तेरेखोल खाडीवरील पुलामुळे महाराष्ट्र व गोवा ही दोन राज्य जोडली गेली आहे.

प्रमुख स्थळे :
कणकवली : कणकवली ताल्युक्याचे मुख्य ठिकाण. भालचंद्र महाराजांचे समाधीस्थळ. जवळच वागदे येथे ‘कोकणचे गांधी’ म्हणून विख्यात असलेले अप्पासाहेब पटवर्धन यांचा गोपुरी आश्रम.

मालवण : तालुल्याचे मुख्य ठिकाण. या परिसरातील कोकणी बोली खास ‘मालवणी’ म्हणून ओळकली जाते. मालवणी पद्धतीचे सागरी खाद्यान्न प्रसिद्ध आहे. एवम, भाषा, राहाणी व खाद्यान्न या बाबतीत मालवणचे वेगळेपण उठून दिसते. सिंधूदुर्ग हा जलदुर्ग मालवणापासून जवळच आहे. मालवणापासून अकरा कि.मी. अंतरावर धामापूर येथे शिवाजीराजांनी बांधलेला तलाव त्यांची स्मृती जतन करीत आहे.

आंबोली : सावंतवाडी तालुक्यातील डोंगरमाथ्यावरील निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण. समुद्रसपाटीपासून उंची १,०२३ मी. जवळूनच हिरण्यकेशी नदी उगम पावते. अलीकडील काळात हे स्थळ एक पर्यटनकेंद्र म्हणून विकसित झाले आहे. आंबोलीपासून जवळच नारायणगड व महादेवगड हे डोंगरी किल्ले आहेत. आंबोली येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (M.T.D.C.) विश्रामधाम असून टाटा उद्योगसमूहाचे आंतराष्ट्रीय दर्जाचे हॉटेलही आहे.

वेंगुर्ले : वेगुर्ले तालुक्याचे मुख्य ठिकाण. सागरकिनाऱ्यावरील निसर्गरम्य पुळण. अलीकडील काळात विकसित होऊ लागलेले नैसर्गिक बंदर. येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात (कोकण कृषी विद्यापीठांतर्गत) आंबा व काजू या फळपिकांबाबत संशोधन आणि हापूस यांच्या संकरापासून नीलम आणि हापूस या जातींच्या संकरापासून ‘रत्ना’ व रत्ना आणि हापूस यांच्या संकरापासून ‘सिंधू’ या आंब्याच्या नव्या जाती तयार केल्या असून अल्पवधीतच त्या लोकप्रिय झाल्या आहेत. या केंद्राने वेंगुर्ला १, वेंगुर्ला २, वेंगुर्ला ३, वेंगुर्ला ४, वेंगुर्ला ५ याकाजूच्या अधिक उत्पन्न देणाऱ्या जातीही प्रसारित केल्या आहेत.

रेडी : हे राज्यातील एक महत्त्वाचे बंदर असून ते वेंगुर्ले तालुक्यात आहे. रेडीच्या परिसरात लोह खनिजाच्या खाणी आहेत. महाराष्ट्रातून निर्यात होणारे लोहखनिज मुख्यत्त्वे या बंदरातून निर्यात केले जाते. १९३० सालच्या मिठाच्या सत्याग्रहामुळे प्रकाशझोतात आलेले ‘शिरोडे’ हे गाव जवळच आहे.

सावंतवाडी : सह्याद्रीच्या कुशीत विसावलेल्या सावंतवाडी तालुक्याचे मुख्य ठिकाण. हस्तकला उद्योगाचे केंद्र. लाकडी रंगीत खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे.

कुडाळ : शिवकानीन सुप्रसिद्ध असा ‘रांगणा’ किल्ला कुडाळ तालुक्यात कोल्हापूरच्या नैऋत्येस सुमारे ७८ कि.मी. अंतरावर सह्यपर्वतराजीत विसावलेला आहे.

देवगड : देवगड तालुक्याचे मुख्य ठिकाण. कारवार ते जयगड दरम्यानचे पश्चिम किनाऱ्यावरील एकमेव सुरक्षित बंदर. किल्ला व दीपगृह.

याशिवाय कुणकेश्वर (देवगड तालुक्यात. यादवकालीन शिवमंदिर .) ; ओरीस बुद्रुक (जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. ); विजयदुर्ग (देवगड तालुक्यात. शिवरायांनी बांधलेला जलदुर्ग.) ; फोंडा ( तालुका कणकवली. सह्याद्रीतील घाट. मध प्रसिद्ध. ); सैतवडे (तालुका देवगड. धबधबा प्रसिद्ध. ); कुडाळ (तालुक्याचे मुख्य ठिकाण ओरोसबुद्रुक हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण याच तालुक्यात येते.); वैभववाडी (तालुक्याचे मुख्य ठिकाण.) ही जिल्ह्यातील अन्य महत्त्वाची स्थळे होत.

वाहातूक :
पनवेल-मंगलोर (गोवामार्गे) हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सतरा (ज्याला आपण सामान्यतः मुंबई-गोवा महामार्ग म्हणून ओळखतो.) जिल्ह्यातून गेला आहे. खारेपाटण, नांदगाव, कणकवली , कुडाळ, सावंतवाडी, वंदे आदी या मार्गावरील जिल्ह्यातील प्रमुख स्थळे होत. याशिवाय वेंगुर्ले-बेळगाव (सावंतवाडीमार्गे आंबोली घाटातून.); मालवण-कोल्हापूर (कणकवलीमार्गे फोंडा घाटातून.) देवगड-कोल्हापूर (नांदगावमार्गे फोंडा घाटातून); विजयदुर्ग-कोल्हापूर (वाघोटन, कासार्डेमार्गे फोंडा घाटातून.); आचरे-कोल्हापूर ( कणकवलीमार्गे) हे जिल्ह्यातील प्रमुख मार्ग होत.

आशिया खंडातिल दुसऱ्या क्रमांकाचे ‘सागरीय उद्यान’ मालवण परिसरात सिंधुदुर्गाच्या सभोवताली साकारले गेले आहे. ‘राजा शिवछत्रपती सागरी उद्यान’ या नावाने ओळखले जाणारे हे उद्यान राज्यातील ‘पहिले व एकमेव’ सागरी उद्यान.

सिंधुदुर्गातील वर्तमान काळातले सर्वोत्कृष्ट पखवाजवादक, पखवाज चे बादशहा, अनुभव, स्पीड, स्वच्छ- शुध्द वादन आणि दर्जेदार अभ...
26/04/2019

सिंधुदुर्गातील वर्तमान काळातले सर्वोत्कृष्ट पखवाजवादक, पखवाज चे बादशहा, अनुभव, स्पीड, स्वच्छ- शुध्द वादन आणि दर्जेदार अभ्यास यामुळे सिंधुदुर्ग तसेच मुंबईसह संपूर्ण कोकणात मोठमोठ्या पखवाज वादकांना घाम फोडून पुन्हा एकदा रियाझ आणि अभ्यास यावर विचार करायला लावून स्पर्धा निर्माण करणारे.... पंडित गोविंद जी भिलारे यांचे शिष्य कोकणची शान श्री महेशजी परब यांना वाढदिवसानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा...💐💐💐💐💐🙏

माझ्या सर्व शहीद भावांना भावपूर्ण श्रद्धांजली..🙏😓😣😓😰💐💐💐💐💐बलिदान व्यर्थ ना जावोबदला तर पाहिजेच...घुसून मरा भडव्यांना😡😡😡😡ज...
14/02/2019

माझ्या सर्व शहीद भावांना भावपूर्ण श्रद्धांजली..🙏😓
😣😓😰
💐💐💐💐💐
बलिदान व्यर्थ ना जावो
बदला तर पाहिजेच...
घुसून मरा भडव्यांना
😡😡😡😡
जय हिंद
💐💐💐💐💐
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

😂🤣🤣🤣
28/01/2019

😂🤣🤣🤣

Address

Malvan
416606

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when माझा सिंधुदुर्ग posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share