amol_kondapure

amol_kondapure Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from amol_kondapure, Photographer, Igatpuri.

माणिकगड आणि वाटाड्यापुरंदरच्या तहातील एक महत्वाचा गड असल्यामुळे हा गड बरीच वर्ष माझ्या यादीत होता. तसेच याचे दुर्गम स्था...
14/03/2026

माणिकगड आणि वाटाड्या

पुरंदरच्या तहातील एक महत्वाचा गड असल्यामुळे हा गड बरीच वर्ष माझ्या यादीत होता. तसेच याचे दुर्गम स्थान आणि चारही बाजूनी घनदाट जंगलांनी वेढलेले असल्यामुळे जास्त गडप्रेमी तिकडे जात नाहीत. शिवस्पर्श संस्था, पुणे यांच्या पुढाकाराने हा गड सर करण्याचे ठरले. फेब्रुवारी महिना असल्यामुळे शनिवारी रात्री 11 वाजता आम्ही 17 गडप्रेमी पनवेल कडे निघालो. दुर्गम गड आणि भरपूर गुरांच्या वाटा असल्यमूळे गावातील वाटाड्याचे नियोजन आधीच झाले होते. तेवढ़्यात अंधारातून एक मानवी सावली काठीचा आधार घेत आमच्या दिशेने येताना दिसली. काटक शरीर, डोक्यावर धनदाट केस, दाढी मिश्या, अंगात पांढरा टी-शर्ट, खाली थ्री-फोर्थ पँट, हातात एक मजबूत काठी, पायात चप्पल नाही. जास्त लक्ष वेधून घेतले ते त्याच्या पायाने. एक पाय जन्मजात अधू असल्याने तो जमीनीवर पोहोचत नसल्याने तो काठीचा आधार घेउनच चालत होता. आमच्या समोर येऊन थांबला. तोच होता आमचा आजचा वाटाड्या काशीनाथ.

आमच्या भुवया उंचावल्या. हे एकताच मनात एकच शंका आली जी आत्ता तुमच्या मनात आली. आम्ही सगळ्यानी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि पहाटे 5:30 ला ट्रेकला सुरवात केली. ब्याटरीच्या प्रकाशात एका रांगेत फक्त पायांचा आणि पाला पाचोल्यांचा आवाजात प्रवास शांतपने चालू होता. तेवढ़्यात जानवले झाडीतून दोन कुत्री आमच्या बरोबर चालत होती. ती जोड शेवट पर्यंत आमच्या बरोबर होती. 7 वाजता आम्ही गड पायथ्याला असलेल्या हनुमान मंदिरापाशी आलो. पहाटेच्या उजेडात आता गड स्पष्ट दिसू लागला. उशीर न करता लगेच गडाला वळसा घालुन खिंडितून वर चढ़न्यास सुरवात केली. 8:30 वाजता आम्ही गडाच्या पड़क्या प्रवेशद्वारावर पोहोचलो. समोर एका बुरुजावर भगवा ध्वज फड़कत होता. शेजारीच चुन्याचा घाना आहे. पूढ़े एक मोठी तटबंदी असुन डाव्या बाजूस गणेश दरवाज़ातुन आपन आत प्रवेश करतो.

कड़क उष्णता, घाम, खडकाळ पायवाटा आणि थकवा सर्व काही मंदावते. कसेबसे हनुमान मंदिरावर पोहोचलो. थोड़ी विश्रांती आणि हनुमानरायाची ऊर्जा घेत परतीचा प्रवास चालू ठेवला. दुपारी 12:30 वाजता आम्ही ठाकुरवाडीत पोहोचलो. महत्त्वाच म्हणजे संपूर्ण प्रवासात काशीनाथने पुढ़े राहुन, एकही वाट न चुकवता, न थकता, ठरलेल्या वेळेत आणि सर्वाच्या पूढ़े राहुन 15 किलोमीटर, 6 तासांची गड भ्रमंती आणि शिवस्पर्श संस्थेचे अचूक नियोजनामूळे पूर्ण झाला.

काशीनाथची जिद्द, आत्मविश्वास आणि कौशल्याच्या जोरावर अपंगत्व हे शरीराला असते, मनाला नाही हे दाखवून दिले. माणिकगड आणि काशीनाथ हे समीकरण मनात घर करुण गेल.

rajgad

माहुली गड, पालघर पुरंदरच्या तहातील महत्वचा गड. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक 19 मार्च 1910 रोजी महाराष्ट्रातील राष्ट...
23/02/2026

माहुली गड, पालघर

पुरंदरच्या तहातील महत्वचा गड. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक 19 मार्च 1910 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. या गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे बराच काळ वास्तव्य होते. तीन गड (पळसगड, माहुलीगड, भंडारगड) असलेला हा डोंगर निसर्गसौंदर्य, सुळके आणि खडकाळ वाटांसाठी प्रसिद्ध आहे.

#रायगड #सह्याद्री #गडकोट

भंडारगड, ठाणे 🚩ठाणे जिल्ह्यात शहापूर तालुक्यात दुर्गत्रिकुटातील एक भंडारगड. मुद्दाम जाऊन पहावे असे हे ठिकाण कोणाही निसर्...
10/02/2026

भंडारगड, ठाणे 🚩

ठाणे जिल्ह्यात शहापूर तालुक्यात दुर्गत्रिकुटातील एक भंडारगड. मुद्दाम जाऊन पहावे असे हे ठिकाण कोणाही निसर्गप्रेमी माणसाला आपल्या निसर्गसौंदर्याने वेड लावते. अनेक सुळके असलेला लांबलचक असा हा डोंगर.

एक लहानशी खिंड माहुली आणि भांडारगड याना वेगळी करते. उजव्या बाजूने एक सोप्या उताराची वाट खिंडीत घेऊन जाते. या खिंडीत येण्यासाठी दोन्ही बाजूंनी वाटा असाव्यात. कातळाच्या धारेतून 40 फुटांची सोपी चढण चढून गेल्यानंतर आपण भांडारदूर्गावर पोहोचतो. कातळात हात व पायांसाठी अनेक सोपे नैसर्गिक आधार आहेत तर वरच्या बाजुला कातळात पायर्‍या खोदल्या आहेत. येथेही लोखंडी शिडी लावली आहे. इथून दक्षिण दिशेकडे पाच मिनीटांच्या अंतरावर माहुली किल्ल्याचे सगळ्यांत सुंदर आकर्षण बघायल मिळते, कल्याण दरवाजा!

हा कल्याण दरवाजा म्हणजे माहुली किल्ल्याची दुर्गम सरळसोट उभ्या कातळात खोदलेल्या पायर्‍या व त्यावर कमानाकार कल्याण दरवाजा. या पायर्‍या इंग्रजांनी गडांच्या आश्रयाने बळावत चाललेला भारतीय स्वातंत्र्यसंग्राम चिरडून टाकण्यासाठी सुरुंग लाऊन उधवस्त केलेल्या या पायर्‍या वरच्या भागात खड्या चढणीच्या असून त्याच्या वर आणखी एक कमानी दरवाजा आहे. तेथे सद्या एक मोठी दोर बांधण्यात आला असून पुरेसा आत्मविश्वास असेल तर त्यावरून वर येण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. येथे एक पुसटशा स्थितीतला देवनागरीतला शिलेलेख आहे तो मात्र आम्हाला बघायला मिळाला नाही.

कल्याण दरवाजा पासून दहा बारा मिनीटांच्या अंतरावर कातळाच्या पोटात खांबटाके आहे. पूढे दहा मिनीटाच्या अंतरावर भांडारदुर्गाच्या टोका पर्यंत जाता येते. येथून गडाचे प्रमुख आकर्षण असलेले सुळखे अगदी जवळून बघण्याचा रोमांच अनूभवता येतो. त्यात सुदूर दक्षिण बाजुला वझिर सुळका तर घळीच्या मध्ये भला मोठा घेर असलेला नवरा व खालच्या बाजुला भटोबा हे सुळके दृष्टीस पडता.

1635-36च्या सुमारास शहाजींनी कठीण परिस्थितीत बळकट आश्रयस्थान म्हणून जुन्नर , शिवनेरीहून जिजाबाई व बाळ शिवाजीसह माहुलीला मुक्काम हलवला. पुढे 1665 च्या पुरंदरच्या तहात हे दुर्गत्रिकुट परत गमवावे लागले.

#दुर्गभंडार #रायगड #सह्याद्री #गडकोट

पळसगड, ठाणे पुरंदरच्या तहातील 23 गडांपैकी एक गड म्हणजे पळसगड. सह्याद्रीच्या रांगांमध्ये वसलेले एक महत्त्वाचे ऐतिहासिक ठि...
31/01/2026

पळसगड, ठाणे

पुरंदरच्या तहातील 23 गडांपैकी एक गड म्हणजे पळसगड. सह्याद्रीच्या रांगांमध्ये वसलेले एक महत्त्वाचे ऐतिहासिक ठिकाण.

शहापूर तालुक्यातील माहुली किल्ल्याच्या परिसरामध्ये भंडारदुर्ग आणि पळसगड हे किल्ले असून दुर्गत्रिकुट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागातील पळसगडावर सह्याद्री प्रतिष्ठानकडून 20 एप्रिल 2019 रोजी दुर्ग अवशेष शोध मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान अर्धवर्तुळाकार दगडी तुटलेली कमान समोर आली असून येथील इतर दगड बाजूला करून ही कमान मोकळी करण्यात आली आहे. किल्ल्याच्या इतिहासामध्ये तीन दरवाजांचा उल्लेख होत असून महादरवाजा, कल्याण दरवाजा आणि हनुमान दरवाजा अशा नोंदी असल्या तरी या किल्ल्यावरील चौथा गणेशदरवाजा या दुर्गप्रेमींनी समोर आणला आहे. या दरवाजावर गणपतीची मूर्ती असल्यामुळेच त्याचा उल्लेख गणेश दरवाजा करण्यात आला आहे.

गडाचा इतिहास त्याचे स्थापत्य यादृष्टीने गडावरील जंगलात अवशेष शोधण्यासाठी हे पथक निघाले. या भागात दरवाजाचे अवशेष असण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यानुसार शोध मोहीम सुरू होती. दुर्गसेवकांच्या टीमने पळसगडावरील खोर मार्गे येणाऱ्या घळीतून वर चढाई केली, तेव्हा घळीच्या दोन्ही बाजूच्या कातळात तटबंदी आणि अर्ध वर्तुळाकार दगडी तुटलेली कमान दिसली. या कमानीवर डाव्या बाजूला 30 फूट उंच नृत्य प्रकारात गणपती मूर्ती शिल्प कोरलेले आहे. तर कमानीच्या वरच्या बाजूला म्हणजेच पळसगडाच्या दिशेला मातीने बुजलेल्या 8 पायऱ्या दिसल्या तर त्याच्या थोडे वर जात्याच अर्ध भाग पडला होता. त्यापुढील वाट पळसगड येथे जाते. गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेला एक दरवाजा दुर्गप्रेमींच्या प्रयत्नामुळे उजेडात आला आहे. खोर गावातून येणाऱ्या वाटेवर गडाच्या महादरवाजा प्रमाणेच या दरवाजावर लहान दगडी तुटलेली कमान आहे. अर्धी कमान हि मातीत आणि दगडात गाडली गेली होती. संस्थेच्या सदस्यांनी कमानी खालचे दगड काढले. सध्या कमानीची उंची ही 4.5 फूट एवढी आहे. आणखी खाली गाळ माती काढली तर आणखी 5 फूट खोल एवढा दरवाजाचा खालचा भाग मोकळा होईल.

#दुर्गभंडार #रायगड #सह्याद्री #गडकोट

त्रिंगलवाडी गड, नाशिक 🚩🚩इगतपुरी परिसरातून सह्याद्रीची एक रांग पश्चिमेकडे पसरली अणि त्यातील एक त्रिंगलवाडी गड.गडाच्या पाय...
20/01/2026

त्रिंगलवाडी गड, नाशिक 🚩🚩

इगतपुरी परिसरातून सह्याद्रीची एक रांग पश्चिमेकडे पसरली अणि त्यातील एक त्रिंगलवाडी गड.

गडाच्या पायथ्याशी असणाया जैन लेण्यांवरून या गडाची निर्मिती साधारण 10व्या शतकात झाली असावी. लेण्यांच्या बाजूने गडावर वाट जाते. साधारण 15 मिनिटात आपण डोंगरसोंडेवर पोहोचतो. समोरच त्रिंगलवाडी गडाची कातळ टोपी दिसते. कातळटोपी खाली आल्यावर दोन वाटा दोन वाटा फ़ुटतात. कातळटोपीच्या उजवीकडून जाणारी वाट सोपी आहे. तर डावीकडून जाणारी वाट थोडी कठीण आहे. पण किल्ला चढतांना डावीकडून जावे आणि उतरतांना उजवीकडील वाटेवरून उतरावे. डावीकडून किल्ल्यावर जातांना पायर्‍यांच्या अगोदर एक छोटासा कातळटप्पा आहे. तो सहज चढून जाता येतो. किल्ल्यावर जाण्यासाठी कातळ फ़ोडून उंच पायर्‍या बनवलेल्या आहेत. शेवटच्या टप्प्यात पायर्‍यांना 90 अंशात वळण दिलेल आहे. पायर्‍या संपल्यावर समोरच एक 5फ़ूट उंच हनुमानाची मुर्ती आहे. उजव्या बाजूला कातळात कोरलेले अप्रतिम सुंदर प्रवेशव्दार आहे. त्यावर दोन कोपर्‍यात दोन शरभ कोरलेले आहेत. प्रवेशव्दारातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर आपण किल्ल्याच्या सर्वोच्च शिखराला वळसा घालून पुढे गेल्यावर वाड्याचा चौथरा दिसतो.

त्यापुढे डावीकडे गेल्यावर कातळाच्या पोटात कोरलेली एक मोठी गुहा दिसते. या गुहेत 20 ते 25 जणांना राहता येते. या टाक्यांपासून पुढे गेल्यावर शंकराचे मंदिर लागते. या मंदिरा समोरच्या कड्यावरून पूर्वेला कळसुबाई, उत्तरेला त्र्यंबकरांग, हरिहर असा परिसर दिसतो. मंदिराच्या मागुन गडाच्या सर्वोच्च शिखरावर जाण्यासाठी पायवाट आहे.

शिखर पाहून झाल्यावर आल्या मार्गाने परत फ़िरून दोन वाटा फ़ुटतात तिथ पर्यंत यावे. तिथून खाली उतरणार्‍या पायवाटेने गेल्यावर उजव्या बाजूस वाड्याचा चौथरा दिसतो. तो पाहून पायर्‍यांपाशी यावे. येथे पूर्वीच्याकाळी प्रवेशव्दार असावे आता फ़क्त तटबंदीचे अवशेष आहेत. पायर्‍या उतरतांना उजव्या बाजूला कातळात कोरलेली गुहा दिसते. तशीच एक गुहा पायर्‍या उतरल्यावर समोरच्या कातळात वर कोरलेली दिसते. या दोनही गुहा टेहळणीसाठी बनविण्यात आल्या होत्या. त्यांची रचना अषी केली होती की, वेगवेगळ्या भागावर नजर ठेवता येईल. गड फिरण्यास साधारण 1:30 तास लागतो.

#दुर्गभंडार

कावनई गड, नाशिक 🚩कावनई गडाच्या प्रवेशव्दारा पर्यंत पोहोचण्यासाठी दगडात कोरलेल्या पायर्‍या आहेत. प्रवेशव्दारा जवळील पायर्...
09/01/2026

कावनई गड, नाशिक 🚩

कावनई गडाच्या प्रवेशव्दारा पर्यंत पोहोचण्यासाठी दगडात कोरलेल्या पायर्‍या आहेत. प्रवेशव्दारा जवळील पायर्‍या उध्वस्त केल्यामुळे या ठिकाणी सध्या लोखंडी शिडी लावलेली आहे. या पाय‍र्‍या सुरु होतात, त्याठिकाणी उजव्या बाजूला एक पायवाट जाते. याठिकाणी एक गुहा आहे. या गुहेचा उपयोग टेहळणीसाठी होत होता. या गुहेच्या खालच्या बाजूस एक चौकोनी कोरडे टाके आहे. या दोन्ही गोष्टी पाहून पायर्‍या आणि शिडीच्या मार्गाने प्रवेशव्दारातून किल्ल्यावर प्रवेश करावा. प्रवेशव्दाराच्या बाजूला दोन बुरुज आहेत. प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर उजव्या बाजूला गुहा आहे. पाहारेकर्‍यांसाठी या गुहेचा देवडी म्हणून वापर होत असावा. गुहेत ४ ते ५ जणांना राहता येईल एवढी जागा आहे. गडमाथ्यावर पोहोचल्यावर समोर एक तलाव आहे. तलाव आजुबाजूला पडक्या वाड्यांचे अनेक अवशेष आहेत. काठावर एक पिंड आणि नंदी आहे. तलावाच्या काठी पार्वतीचे मंदिर आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला खोलगट भाग आहे. त्यात कातळात कोरलेले एक पाण्याचे टाके आहे. येथून पायवाटेने एक उंचवटा चढून गेल्यावर कड्याच्या बाजूला एक प्रशस्त टाके आहे.

या टाक्यापासून उजव्या बाजूची वाट प्रवेशव्दाराच्या वरच्या बाजूस बुरुजावर जाते. याठिकाणी काही वास्तूंचे अवशेष आणि बुरुजावर एक ध्वजस्तंभ आहे. हे पाहून आल्या वाटेने परत टाक्यापाशी येऊन पायवाटेने पुढे चालत गेल्यावर समोर कातळात कोरलेले टाके दिसते. या टाक्याकडे जाण्यापूर्वी उजव्या बाजूला वळून कड्यापाशी गेल्यावर एक कड्याच्या खाली कातळात कोरलेले छोटे टाके आहे. या टाक्यातील पाणी पिण्यालायक आहे. हे टाके पाहून पुन्हा माघारी वळून समोर दिसंणार्‍या टाक्याच्या बाजूने बुरुजावर जावे. या बूरुजा खालून डोंगराची एक सोंड खाली रस्त्यापर्यंत गेलेली दिसते. येथून एक पायवाट किल्ल्यावर येते. बुरुजावर चढून येण्यासाठी इथे एक शिडी लावलेली आहे. सध्या बुरुज ढासळल्यामुळे ही वाट वापरात नाही. हा बुरुज पाहून पुन्हा तलावापाशी आल्यावर आपली गडफ़ेरी पूर्ण होते. गडावरून कळसूबाई रांग, हरिहर गड, त्र्यंबक रांग, अलंग मदन कुलंग रांग, त्रिंगलवाडी असा सर्व परिसर दिसतो.

#दुर्गभंडार

Address

Igatpuri
422402

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when amol_kondapure posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category