Chhatrapati Shivaji Maharaj Photo Gallery

Chhatrapati Shivaji  Maharaj Photo Gallery Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Chhatrapati Shivaji Maharaj Photo Gallery, Ahmedabad.
(1)

छत्रपती शिवाजी महाराजांचे राजा म्हणून लोकांच्या मनात छत्रपतींनी अधिराज्य गाजवले आहे. अशा शिवरायांना कधीच विसरता येणार नाही. तुम्हालाही शिवरायांची ही कामगिरी पुढील पिढीपर्यंत जावी असे वाटत असेल तर तुम्ही ह्या पेज लाइक करा.

जगात जर यशाचा मार्ग असेल तर तो मी शोधीन, आणि नसेल तर मग स्वतः निर्माण करीन... ⛳जो स्वधर्माचं आणि स्वदेशाचं रक्षण करतो, त...
18/08/2026

जगात जर यशाचा मार्ग असेल तर तो मी शोधीन, आणि नसेल तर मग स्वतः निर्माण करीन... ⛳

जो स्वधर्माचं आणि स्वदेशाचं रक्षण करतो, तोच खरा योद्धा.

जय भवानी... 🚩
जय शिवाजी... 🚩

महारानी सईबाई, छत्रपती शिवाजी महाराज, बाळ संभाजी आणि हिंदवी स्वराज्य यांचा इतिहास हा अत्यंत भावनिक आणि मराठा साम्राज्याल...
17/08/2026

महारानी सईबाई, छत्रपती शिवाजी महाराज, बाळ संभाजी आणि हिंदवी स्वराज्य यांचा इतिहास हा अत्यंत भावनिक आणि मराठा साम्राज्याला दिशा देणारा एक महत्त्वाचा कालखंड आहे... ⛳

जय भवानी...🚩
जय शिवाजी... 🚩
जय संभाजीराजे... 🚩

👑 महारानी सईबाई: स्वराज्याची प्रेमळ सावली आणि पहिली पाटराणी...

शिवरायांच्या पहिल्या पत्नी: फलटनच्या निंबाळकर घराण्यातील महारानी सईबाई यांचा विवाह १६४० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांशी झाला. त्या शिवरायांच्या पहिल्या पत्नी आणि स्वराज्याच्या पहिल्या पाटराणी (मुख्य राणी) होत्या... ⛳

शिवरायांचा मुख्य आधार: स्वराज्य स्थापनेच्या सुरुवातीच्या अत्यंत संघर्षाच्या काळात सईबाईंनी शिवरायांना मानसिक आणि कौटुंबिक स्तरावर भक्कम साथ दिली. महाराज जेव्हा मोहिमांवर असत, तेव्हा जिजाऊ माँसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राज्याची जबाबदारीही चोख सांभाळली... ⛳

बाळ संभाजी आणि सईबाईंचे अकाली निधन📜

स्वराज्याचे पहिले युवराज: १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ल्यावर सईबाईंनी बाळ संभाजी (शंभूराजे) यांना जन्म दिला. संभाजी महाराज हे शिवरायांचे थोरले चिरंजीव आणि स्वराज्याचे होणारे वारसदार होते... ⛳

आईचे अकाली छत्र हरवणे: शंभूराजांच्या जन्मानंतर सईबाईंची प्रकृती खालावत गेली. बाळ संभाजी अवघे २ वर्षांचे असतानाच, ५ सप्टेंबर १६५९ रोजी राजगड किल्ल्यावर सईबाईंचे अकाली निधन झाले... ⛳

शिवरायांना मोठा धक्का: अफझलखानाचे संकट स्वराज्यावर घोंगावत असतानाच सईबाईंचे निधन झाले. या दुःखातून सावरत शिवरायांनी स्वराज्याचे रक्षण केले, परंतु सईबाईंची जागा त्यांच्या आयुष्यात नेहमीच रिक्त राहिली... 🚩

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक राजे नव्हते, तर ते सामान्यांच्या हक्काचे रयतेचे कैवारी आणि जाणता राजा होते. जातीभेद मिट...
17/08/2026

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक राजे नव्हते, तर ते सामान्यांच्या हक्काचे रयतेचे कैवारी आणि जाणता राजा होते. जातीभेद मिटवून आणि अन्यायाविरुद्ध लढून त्यांनी सर्वसामान्य जनतेला आपलेसे केले, म्हणूनच रयत त्यांना आपला देव मानत असे... ⛳

रयतेचा कैवारी.. 📜

"शत्रू हा गनिमाचा, कैवारी हा जनतेचा, जाणता राजा रयतेचा!..⛳

""रयतेचे भले ज्यात, तेच करणार ते, स्वराज्य म्हणजे जनितांच्या सुखाचा श्वास...⛳

""जो रयतेच्या दुःखात धावून जातो, तोच खरा छत्रपतीसाहेबांचा मावळा.""शिवबांच्या राज्यात स्त्री सन्मान आणि शेतकरी कल्याण हेच सर्वोच्च होते.".. ⛳

शिवबांच्या राज्यात स्त्री सन्मान आणि शेतकरी कल्याण हेच सर्वोच्च होते.".. 🚩

शिवराय आमचे देव आहेत तर शंभूराजे आमचा स्वाभिमान; एकाने स्वराज्य घडवले तर दुसऱ्याने स्वतःचे रक्त सांडून ते टिकवले!.. ⛳सह्...
17/08/2026

शिवराय आमचे देव आहेत तर शंभूराजे आमचा स्वाभिमान; एकाने स्वराज्य घडवले तर दुसऱ्याने स्वतःचे रक्त सांडून ते टिकवले!.. ⛳

सह्याद्रीच्या छातीतून एकच गर्जना घुमते—जय शिवराय, जय शंभूराय!

जय भवानी... 🚩
जय शिवाजी... 🚩
जय संभाजीराजे.. 🚩

शिवलिंगावर पाण्याचा अभिषेक करताना, छत्रपती शिवरायांनी बाळ संभाजी राजांना केवळ भक्ती नाही, तर स्वराज्याचे पवित्र संस्कार ...
17/08/2026

शिवलिंगावर पाण्याचा अभिषेक करताना, छत्रपती शिवरायांनी बाळ संभाजी राजांना केवळ भक्ती नाही, तर स्वराज्याचे पवित्र संस्कार दिले.".. ⛳

ज्यांच्या मस्तकावर महादेवाचा हात आणि हातात भवानी तलवार होती, अशा शिव-शंभूंच्या चरणी साष्टांग प्रणिपात!".. ⛳

जय भवानी... 🚩
जय शिवाजी... 🚩
जय संभाजीराजे... 🚩

संविधानाच्या 15 व्या भागामध्ये निवडणुकांशी संबंधित कायद्यांचं वर्णन आहे. त्या पानावर छत्रपती शिवाजी महाराज आणि गुरु गोवि...
16/08/2026

संविधानाच्या 15 व्या भागामध्ये निवडणुकांशी संबंधित कायद्यांचं वर्णन आहे. त्या पानावर छत्रपती शिवाजी महाराज आणि गुरु गोविंद सिंगजी यांचं चित्र आहे...⛳

या चित्रात छत्रपती शिवाजी महाराज आणि गुरु गोविंद सिंगजी यांच्या ऐतिहासिक कामगिरीचं चित्रण करण्यात आलं आहे. या पृष्ठावरील चित्रं धीरेंद्र कृष्ण देब बर्मन, नंद लाल बोस आणि किरपाल सिंग शेखावत यांनी काढलेली आहेत... 🚩

जय भवानी... 🚩
जय शिवराय.. 🚩

देवांचे जयघोष (नावाने चांगभलं)जोतिबाच्या नावानं चांगभलं! – दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाचा हा सर्वात लोकप्रिय जयघोष आहे....
16/08/2026

देवांचे जयघोष (नावाने चांगभलं)जोतिबाच्या नावानं चांगभलं! – दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाचा हा सर्वात लोकप्रिय जयघोष आहे... ⛳

जोतिबाच्या नावानं चांगभलं..🚩
जय भवानी...🚩
जय शिवाजी...🚩

पन्हाळा आणि विशाळगड सुरक्षित झाल्यानंतर, छत्रपती शिवाजी महाराजांनी कुलदैवत आणि या परिसराचे रक्षक म्हणून जोतिबा देवाचे आभार मानले होते. पुढे मराठा साम्राज्यात जोतिबा डोंगरावरील मंदिराच्या देखभालीसाठी आणि पूजेसाठी सनदा (जमिनी आणि उत्पन्न) बहाल करण्यात आल्या... ⛳

सन १६६० मध्ये जेव्हा सिद्दी जोहरने पन्हाळगडाला वेढा घातला होता, तेव्हा शिवाजी महाराज अनेक महिने त्या वेढ्यात अडकले होते. पन्हाळगड हा जोतिबा डोंगराच्या अगदी जवळ आहे.. ⛳

काळजात 'शिवराय' आणि श्वासात 'गणपती',अशा या मातीत जन्माला आलो,हाच आमचा सर्वात मोठा अभिमान!.. 🚩तुझे नाम ओठी, तुझा ध्यास चि...
16/08/2026

काळजात 'शिवराय' आणि श्वासात 'गणपती',अशा या मातीत जन्माला आलो,हाच आमचा सर्वात मोठा अभिमान!.. 🚩

तुझे नाम ओठी, तुझा ध्यास चित्ती तुझ्या दर्शनाने मिळे आत्मशांती विनायक चतुर्थी निमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा !

गणपती बाप्पा मोरया.. 🚩
जय शिवराय... 🚩

छत्रपती शिवाजी महाराजांची रात्रीची चढाई ही शत्रूला अचंबित करणारी गनिमी युद्धाची एक अत्यंत प्रभावी रणनीती होती. अंधाराचा ...
15/08/2026

छत्रपती शिवाजी महाराजांची रात्रीची चढाई ही शत्रूला अचंबित करणारी गनिमी युद्धाची एक अत्यंत प्रभावी रणनीती होती. अंधाराचा फायदा घेऊन किल्ले सर करणे, शत्रूच्या छावण्यांवर अचानक छापे टाकणे आणि कमी सैन्यानिशी मोठे विजय मिळवणे हे या रणनीतीचे मुख्य वैशिष्ट्य होते... ⛳

जय भवानी...🚩
जय शिवाजी...🚩

रात्रीच्या चढाईची वैशिष्ट्ये व तंत्र📜

गनिमी युद्ध: अंधाराचा व भौगोलिक परिस्थितीचा अचूक अंदाज घेऊन शत्रूवर अचानक तुटून पडणे...⛳

मावल्यांचे कौशल्य: रात्रीच्या वेळी डोंगराची कडे आणि अरुंद वाटा पार करण्यात मावरे पटाईत होते...⛳

गनिमी कावा व गुप्तता: चढाईची कुणकुणही शत्रूला लागू न देणे आणि गोंधळ निर्माण करणे...⛳

नियोजन: चंद्रहीन रात्री किंवा पहाटेचा अंधार (ज्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात) हल्ल्यासाठी निवडला जात असे... ⛳

15/08/2026

स्वराज्याचे खरे आणि मूळ हकदार छत्रपती शिवाजी महाराज...⛳

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ युद्धाच्या मैदानात जिंकणारे योद्धे नव्हते, तर दुष्काळ आणि संकटाच्या काळात रयतेच्या चुली पेटवणारे, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे दयाळू आणि जाणता राजा होते... 🚩

जय भवानी.. 🚩
जय शिवाजी..🚩

Address

Ahmedabad

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chhatrapati Shivaji Maharaj Photo Gallery posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Chhatrapati Shivaji Maharaj Photo Gallery:

Shortcuts

Share